Category Archives: Television

अंतरा आणि अंतराची ‘हमसफर’ आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द

Saurabh Choughule, Yogita Chavan, Humsafar
Saurabh Choughule, Yogita Chavan, Humsafar

 कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला (Jiv Majha Guntala)’ मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. अंतरा (Yogita Chavan) मोठ्या संकटात अडकली असून या सगळ्यामध्ये तिला मल्हारची (Saurabh Choughule) साथ मिळणार आहे. लग्नानंतर अंतराशी भांडणार, तिच्यावर तितकासा विश्वास नसणार मल्हार आता अंतराच्या बाजूने लढताना प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या प्रवासात मल्हारला मिळाली आहे नवी “हमसफर”. अंतरा आणि अंतराची हमसफर आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहेच. पण आता मल्हारदेखील हमसफर चालवताना मालिकेमध्ये दिसणार आहे. त्याच सीनचे शूटिंग सुरू असताना काढलेले काही फोटोज.

Jeev Majha-Guntala Serial Lead actress Yogita Chavan
Jeev Majha-Guntala Serial Lead actress Yogita Chavan

आता मल्हारने हमसफरची मदत का घेतली? नक्की काय झालं ? हे मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. अंतराला चित्राकाकीने ड्रग्सच्या केस मध्ये अडकवले खरे पण, यानिमित्ताने कुठेतरी अंतरा आणि मल्हारच्या नात्याला नवे वळण तर मिळणार नाही ना ? असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये येऊन गेला असणार. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या प्रोमोमध्ये मल्हारने अंतराला शब्द दिला जेव्हा बाजू सत्याची असते तेव्हा शंकेला जागा नसते, तुला निर्दोष सोडवणे आता माझी जबाबदारी असे म्हणताना तो दिसला. बघूया मल्हार अंतराला दिलेला शब्द कसा पाळणार.

सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेचे १०० भाग पूर्ण

महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात आजही अस्तित्वात असलेल्या भक्तिसंप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. ज्ञानेश्वर ते ज्ञानेश्वर माउली हा प्रवास सोनी मराठीवरच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळतं आहे.

Varun Bhagwat in 'Dnyaneshwar Mauli' Marathi serial
Varun Bhagwat in ‘Dnyaneshwar Mauli’ Marathi serial

 ज्ञानेश्वर माउलींवर पहिल्यांदाच मालिकेची निर्मिती झाली आणि नेहमीचं वेगळ्या धाटणीच्या आणि विषयाच्या मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणाऱ्या सोनी मराठी वाहिनीने तो विडा उचलला. दिगपाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर अशा दिगज्ज मंडळींकडून ही कलाकृती घडतेय. प्रेक्षकांची ही ‘ज्ञानेश्वर माउलीं (Dyaneshwar Mauli)’ या मालिकेला खास पसंती मिळतेय.

 या मालिकेतून ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा  उलगडत आहे. भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचत आहे.

१७ जानेवारीला या मालिकेचे १०० भाग पूर्ण होत आहेत. मालिकेत पैठणच्या धर्मसभेतून शुद्धिपत्र मिळवून माउली आणि भावंड आपल्या आजोळी म्हणजेच आपेगांवी पोचली आहेत. आपल्या दिव्यत्वाची प्रचिती देत माउली आणि भावंडांची गोष्ट हळूहळू पुढे जात आहे. येत्या काही भागांमध्ये नरबळी आणि अंधश्रद्धा यांना माउलींनी कसा विरोध केला हे पाहायला मिळणार आहे.

‘तुझ्या रूपाचं चांदन’ मालिकेत सुरेखा कुडची यांची एंट्री

Surekha Kudchi Actress in Marathi Serial 'Tuzhya Roopacha Chandana'
Surekha Kudchi Actress in Marathi Serial ‘Tuzhya Roopacha Chandana’

कलर्स मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘तुझ्या रूपाचं चांदन(Tujhya Rupacha Chandana)’  मालिकेला प्रेक्षकांचा ऊतम प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत काही दिवसांआधीच दत्ताची एंट्री झाली. रोहित चंद्रा ही भूमिका साकारत असून त्याच्या लुकची चर्चा सगळीकडेच आहे. नक्षत्राला नरकच्या दारातून खेचून, नक्षत्राचं दु:ख दूर कसे करेल, तिचं रक्षण कसं करेल हे मालिकेत बघायला मिळणार आहे. दत्ता आणि नक्षी आता संकट अडकले असून ते या संकटातून कसे बाहेर पडतील हे लवकरच कळेल.

Marathi Serial 'Tuzhya Roopacha Chandana'
Marathi Serial ‘Tuzhya Roopacha Chandana’

मालिकेमध्ये मयूर मोरे याची भूमिका आपल्या सगळ्यांचा लाडका सुशांत शेलार साकारात आहे. तर आता मालिकेमध्ये अजून एक नवीन एंट्री होणार आहे आणि ती म्हणजे महेश्वरी यांची ही भूमिका सुरेखा कुडची साकारणार आहे. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “आतापर्यंत तुम्ही मला बर्‍याच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. याचसोबत कलर्स मराठीवर्ल बिग बॉस मराठी पर्व तिसरेमध्ये तुम्ही मला भरभरून प्रेम दिले. आणि या घरातून बाहेर पडल्यावर मी आता पुन्हाएकदा येते आहे तुमच्या भेटीला एका नव्या भूमिकेत. दत्ताच्या आईची ही भूमिका असून महेश्वरी पाटील ही भूमिका करताना मला मनापासून खूप आनंद होतो आहे. या भूमिकेत एक वेगळेपणा आहे कारण ही स्त्री राजकीय क्षेत्रामध्ये आहे.विषय थोडा वेगळा आहे तुम्हांला हे बघताना नक्कीच कळेल.”

आळंदीच्या चैतन्य देवढेला मिळाली पार्श्वगायनाची संधी!

Chaitanya Devadhe, Singer Indian Idol Marathi
Chaitanya Devadhe, Singer Indian Idol Marathi
‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमात महाराष्ट्राला टॉप १० स्पर्धक मिळाले असून विजेतेपदासाठी त्यांच्यात आता सुरांची टक्कर होतांना बघायला मिळते.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडलेल्या या स्पर्धकांपैकी एक नाव म्हणजे आळंदीचा चैतन्य देवढे (Chaitanya Devadhe).  ‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ हे तंतोतंत लागू पडणारा चैतन्य आयडलच्या मंचावर ‘माउली’ म्हणून लोकप्रिय आहे. इंडियन आयडल हा मंच स्वप्नपूर्तीचा आहे. चैतन्यला आता  पार्श्वगायक  होण्याची संधी मिळणार आहे.

Ajay Atul, Sadhana Sargam in Indian Idol Marathi
Ajay Atul, Sadhana Sargam in Indian Idol Marathi
गोड गळ्याचा चैतन्य ऑडिशन राउंडपासून परीक्षकांची मनं जिंकतो आहे. त्याच्या खेळकर स्वभावाने त्याने प्रतिस्पर्धी स्पर्धकांनाही अल्पावधीतच आपलेसे केले. तिथून ते टॉप १० पर्यंत चैतन्यने गाण्याच्या आणि आवाजाच्या साथीने परीक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलंय. माउलींचा आशीर्वाद, घरून अर्थातच बाबांकडून लाभलेला सांगीतिक वारसा आणि मेहनत या सगळयांच्या साथीने ‘इंडियन आयडल मराठी’च्या पहिल्या पर्वाचा विजेता होण्यासाठी चैतन्य जिद्दीने रियाज करतोय.

Vishal Nikam is ‘Bigg Boss Marathi Season 3′ Winner

Actor Vishal Nikam, Bigg Boss Marathi winner
Actor Vishal Nikam, Bigg Boss Marathi winner

Each one of the 17 participants in Big Boss Marathi Season 3 had entered the house of Big Boss with big hopes. And they very well knew that only one of them will be declared the final winner to walk with the trophy. For 100 days the audience from different parts of Maharashtra were witness to the internal fights and changing relationship among the participants.

Actor Vishal Nikam
Actor Vishal Nikam

The final round of this competition was held recently in Mumbai and Vishal Nikam was declared the Winner of this Big Boss Season 3 final round. He became richer with an award of Rs. 20 lakh besides a Trophy. Jai Dudhane bagged the second place. Vishal was the favourite in this competition, because of his Sporting Spirit, determination to achieve the given task and straight forward attitude. He got an opportunity to be one of the participants and he proved his mettle.

‘आई – मायेचं कवच’ उद्या पासून रात्री १०.०० वा. कलर्स मराठीवर

या संपूर्ण जगामध्ये आईचं प्रेम हे सर्वोच्च असते कारण ते निस्वार्थी असते. या प्रेमाची बरोबरी करण अशक्यचं ! पुत्र कुपुत्र असू शकतो पण माता कुमाता असूच शकतं नाही. आई आपल्या मुलांना मायेच्या उबदार पंखात, आपल्या प्रेमाच्या कोषात सुरक्षित ठेवू पाहते आणि या दुष्ट जगापासून त्यांचे रक्षण करू पाहते.

Anushka Pimputka, Bhargavi Chirmuley in Marathi Serial 'AAI' on Colors Marathi
Anushka Pimputka, Bhargavi Chirmuley in Marathi Serial ‘AAI’ on Colors Marathi

कलर्स मराठी वाहिनीवर येत्या २७ डिसेंबर पासून ‘आई- मायेचं कवच’ ही नाविकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटिस येत आहे. आजवर आई आणि मुलाचं नातं दर्शविणार्‍या अनेक मालिका येऊन गेल्या पण ‘आई’ या मालिकेतून पहिल्यांदा “सिंगल पेरेंट”आणि तिचा प्रवास या अतिशय नाजुक विषयाला हातळण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसणार आहे.

Actress Anushka Pimputkar
Actress Anushka Pimputkar

एका स्वाभिमानी, शिस्तप्रिय आईचा आणि तिच्या मुलीचा प्रवास म्हणजेच ही मालिका. या कथेला झालर आहे एका गूढ रहस्याची. असं काय घडतं आई मुलीच्या आयुष्यात ज्यामुळे त्या दोघींचे संपूर्ण आयुष्यं बदलून जाते हे बघण रंजक असणार आहे. अनुष्का पीमपुटकर आणि  भार्गवी चिरमुले हिची हयात महत्वाच्या मध्यवर्ती भूमिकेत आपलायला दिसणार असून मालिकेचीनिर्मिती महेश कोठारे ह्यानी केली आहे.

२७ डिसेंबरपासून सोम ते शनि रात्री १०.००वा. कलर्स मराठीवर  ‘आई’ - मायेचं कवच ही मलिका बघायला विसरु नका.

‘इंडियन आयडल मराठी’ या मंचावर येणार गायिका साधना सरगम

Ajay Atul, Sadhana Sargam in Indian Idol Marathi
Ajay Atul, Sadhana Sargam in Indian Idol Marathi

दोन दशकं बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम , सोनी मराठी वाहिनीवर ‘इंडियन आयडल मराठी’ ह्या कार्यक्रमाच्या यंदाच्या आठवड्यात विशेष पाहुण्या म्हणून येणार आहेत. इंडियन आयडल हा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत होतो आहे. कार्यक्रमाची निर्मिती आराधना भोला यांच्या फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. या संस्थेने केली आहे.  या कार्यक्रमाचे परीक्षक अजय-अतुल असल्याने कार्यक्रमाची रंगत वाढते आहे. सर्वोत्तम १४ स्पर्धकांमधून महाराष्ट्राला ‘इंडियन आयडल मराठी’चा पहिला विजेता/विजेती मिळणार आहे

१९८२ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘विधाता’ या चित्रपटातली ‘सात सहेलियां खडी खडी’ हे गाणे गाऊन साधना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनी आत्तापर्यंत ३४ भाषांमध्ये १५ हजारांहून अधिक गाणी गायली आहे. ‘सातसमंदर पार मैं तेरे पीछे पीछे गई’ या गीताने ९० च्या दशकात धूम केली होती. हे गीत गाणाऱ्या साधना सरगम यांच्या अनेक गाण्यांनी लाखो चाहते घायाळ आहेत. ‘हर किसी को नहीं मिलता’, ‘मैं तेरी मोहोब्बत में’, ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार’ आणि ‘नीले नीले अंबर पर’ या गाण्यांतून रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या साधनाने तब्बल ३४ भाषांत गीतं गायली. कल्याणजी-आनंदजी जोडीपासून ए. आर. रहमानपर्यंत प्रत्येकानी त्यांचं कौतुक केलं. उदित नारायण यांच्याबरोबर ‘जो जीता वही सिकंदर’ या सिनेमातलं गाजलेलं गाणं ‘पहला नशा पहला खुमार’ गाऊन प्रसिद्धीझोतात आलेल्या साधना सरगम या ‘इंडियन आयडल मराठी’ या मंचावर स्पर्धकांचं मनोबल वाढवून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत.

विकास आणि सोनालीमध्ये यावरून झाले मतभेद, सोनाली पाटील विकासवर भडकली

Bigg Boss Marathi Season3, actress Sonali Patil
Bigg Boss Marathi Season3, actress Sonali Patil

बिग बॉस मराठीच्या सदस्यांचे वादविवाद, एखाद्या विषयावरून होणारे मतभेद, त्यांच्यातील भांडण, मारामारी हे आपण बघतच असतो. आज असंच काहीसं झाले विकास आणि सोनालीमध्ये. एका मुद्द्यावरून या दोघांमध्ये मतभेद होताना दिसणार आहेत. नक्की कशावरून ही चर्चा सुरू झाली हे आजच्या भागामध्ये कळेलच.

 Actress Mira Jagannath, Contestants of bigg boss Marathi 3

Actress Mira Jagannath, Contestants of bigg boss Marathi 3

विकासचे म्हणणे आहे, मागील आठवड्यात आणि त्याआधी पण बोले होते. बाकी काही असलं तरी एकमेकांना loyal तरी आहेत. loyalty आली की तुमची जरा गडबड होते. सोनाली पाटील त्यावर म्हणाली, loyalty च्या बाबतीत मी मीनलवर कधीच अविश्वास दाखवणार नाही कारण आतापर्यंत ती फक्त आपल्यासाठी खेळली आहे, स्वत:साठी खेळली आहे. त्यामुळे अविश्वास दाखवणं, loyalty न दाखवणं हा विषय येतंच नाही. संभाषण सुरू असताना सोनालीने विकासला खडसावून सांगितले तू चेष्टेवारी घेणार असशील तर मी बोलत नाही. विकास त्यावर म्हणाला, तू आता दोन contradictory statement केलेस ना आता… सोनालीचे म्हणणे आहे ते महत्वाचे नाही आता मी बोलते महत्वाचे ते आहे. कुठेनाकुठे तू अविश्वास दाखवतो आहेस… आणि पुढे या दोघांची चर्चा अशीच सुरू राहिली.

 

Makers of ‘Ajunahi Barsat Aahe’ celebrate 100 episodes

Mukta Barve, Umesh Kamat in Marathi Serial 'Ajunahi Barsat Aahe' on Sony Marathi
Mukta Barve, Umesh Kamat in Marathi Serial ‘Ajunahi Barsat Aahe’ on Sony Marathi

Produced by Vidydhar Pathare and directed by Kedar Vaidya, the popular Marathi TV serial which was premiered on 12th July 2021 has now completed 100 episodes. Recently, in the latest episode we saw the wedding of the lead pair Mukta Barve and Umesh Kamat taking place in a dream sequence. So, it is expected that their characters Dr. Meera and Dr. Aadiraj will get married soon in the coming episodes.

Mukta Barve Ajunahi Barasat Aahe, Marathi Serial
Mukta Barve Ajunahi Barasat Aahe, Marathi Serial

At present we are watching Dr. Aadiraj’s father Dr. Sudhir Pathak in deep trouble and is being helped by his friend Dr. Vaishampayan, who in return is demanding the marriage of his daughter Sanika to Dr. Aadiraj. At the same time we find Dr. Meera’s friend Dr. Nikhil trying to help Dr. Vaishampayan in his mission, so that he could marry Dr. Meera. But, will this happen, when Dr. Aadiraj and Dr. Meera are made for each other? Let us wait and watch. One thing is sure that the big team of versatile artistes comprising of Rajan Bhise, Uma Sardeshmukh, Rajan Tamhane Suhita Thatte, Mihir Rajda, Samidha Guru, Sachin Deshpande, Sharmila Shinde, Sanket Karlekar, Purva Phadke, Vidyadhar Joshi, Prajakta Datar, Nikhil Rajeshirke, Smita Sarode Pallavi Vaidya and Mugdha Godbole ( guest appearance) have given their best performances to support the talented lead pair of Mukta and Umesh.

Gripping Screenplay by Rohini Ninave , good dialogues by Mugdha Godbole and appealing music by Ashok Patki are the other plus points of this serial for gaining popularity

Baahubali in Marathi will be special Diwali release on Shemaroo MarathiBana

Shemaroo MarathiBana, the Marathi movie TV channel, have announced a Special Diwali  treat for their Marathi viewers, with the Marathi version of the blockbuster action epic franchise, ‘Baahubali’. The film will be aired on 4th November exclusively on Shemaroo MarathiBana. Highlight of this Marathi version is that leading artistes  of Marathi film and theatre Dr. Amol Kolhe, Pravin Tarde, Sonalee Kulkarni, Gashmeer Mahajani, Uday Sabnis, Sanskruti Balgude, and other popular artists have lent their voices to the eponymous characters. So, with  their voices, ‘Baahubali’ will come to life in Marathi ensuring a rare treat this Diwali .

Bahubali in Marath, Meghana Erande, Pravin Tarde, Sonalee Kulkarni, Sanskruti Balgude, Shamaroo Marathi
Bahubali in Marath, Meghana Erande, Pravin Tarde, Sonalee Kulkarni, Sanskruti Balgude, Shamaroo Marathi

Further, to give it a perfect Marathi look, Shemaroo  have paid attention on Marathi songs with the help of . Famed Marathi music director, Kaushal Inamdar , who has recreated the tracks without  losing the classical instrumentation and gravitas of the original, while popular singers Hamsika Iyer, Avadhoot Gupte, Sanjeev Chimmalgi, Bela Shende, Adarsh Shinde, Hrishikesh Kamerkar, Ketki Mategavkar and Mugddha Karhade have lent their voices to the melodious songs. The songs have been translated to Marathi by writer and lyricist Vaibhav Joshi, Milind Joshi & Asmita Pandey ensuring that the original flavour and meaning is retained.

Watch Baahubali in Marathi on Shemaroo MarathiBaba this Diwali.