Neha Joshi,actress

“मला वाचनाची खूप आवड आहे” – नेहा जोशी

Neha Joshi,actress

तिच्या अभिनयाची सुरवात ‘क्षण एक पुरे’ ह्या प्रायोगिक नाटका पासून, तर छोट्या पडद्यावर ‘उन पाउस’ ह्या मालिके द्वारे झली . ‘पोष्टर बॉयज’ मधील कडक, मध्यमवर्गीय पत्नीची भूमिका असो, किंवा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम मॉल ‘ ह्या सिनेमात तिची मुख्य भूमिका असो, प्रत्येक भूमिकेला आपल्या अभिनयाने पूर्ण न्याय देत, तिने प्रेक्षकंवर छाप सोडलीय . ‘ड्रीम मॉल ‘ सिनेमातील तिच्या अभिनयाचे तर सर्वानीच कौतुक केले आहे. शिवाय, सध्या चालू असलेल्या  ‘का रे दुरावा‘, मालिकेत आणि ‘वाडा चिरेबंदी ‘ नाटकातील तिचा अभिनय सुद्धा उल्लेखनीय आहे.चेहऱ्याच्या योग्य हावभावाद्वारे , तितकाच सहज अभिनय करणारी अभिनेत्री म्हणून तिची सध्या ओळख आहे. तर, अश्या या नेहा जोशी सोबत केलेली, ही खास बातचीत.

‘ड्रीम मॉल’ चित्रपटातील तिच्या भूमिकेबाद्धाल बोलताना, नेहा सांगते, “‘ड्रीम मॉल ‘ ह्यात माझी मुख्य भूमिका होती .खूप वेगळा आणि आव्हानात्मात रोल होता. अभिनेत्री म्हणून खूप काही शिकले.” .

हल्ली समाजात मुलींच्या बाबतीत अत्याचाराचे जे प्रकार वाढतायेत, यावर जेंव्हा नेहाला तिचे मत प्रदर्शित करावयास सांगितले,  तेंव्हा ती म्हणाली, “खरंतर पालकांनी मुलींना विश्वासात घेतले पाहिजे . त्यांना मदत, शिक्षण दिले पाहिजे. पण, काही ठिकाणी, चित्र उलटे असते आणि त्या मुली अश्या प्रसंगांना तोंड देताना, जास्त घाबरतात, अबोल राहतात . जर पालकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला, तर नक्कीच त्यांचातील आत्मविश्वास वाढेल. आपल्या पर्स मध्ये नेल कटर सारखे अनेक साहित्य असते, त्यांचा वापर आपण स्वरक्षणासाठी करू शकतो. प्रत्येक मुलीने शाररीक आणि मानसिक दृष्ट्या भक्कम राहणे, गरजेचे आहे.”

neha-joshi-picture

‘पोष्टर बॉयज’ बद्धल बोलताना, ती म्हणाली, “‘पोष्टर बॉयज’ खरतर विनोदी सिनेमा होता, पण तो विनोद अगदी सहज, खरा करणे, हे त्यात महत्वाचे होते. शिवाय त्या चित्रपटात खूप महत्वाचा सामाजिक संदेश होता. आजकाल, जन्माला येणार बाळ, हा मुलगाच हवा, असा अट्टाहास असतो. असा भेदभाव आपण करायला नको. शिवाय ,कुटुंब नियोजनाच्या महत्वाच्या विषयवार तो सिनेमा होता . दिग्दर्शक समीर पाटील, दिलीप प्रभावळकर, ह्रीशिकेश जोशी , अनिकेत, अश्या सर्वांसोबत काम करायला मज्जा आली , शिकायलाही मिळाले .”

आता पर्यंत केलेल्या भूमिकेतील, सर्वात जास्त तुला आवडलेली भूमिका कुठली ?
या प्रश्नावर, नेहा उत्तरली, “मला सर्वच भूमिका आवडल्यात. कुठल्या एका भूमिकेचं नाव घेतल, तर इतर भूमिकांवर अन्याय करण्या सारख आहे.” सध्या नेहा  ‘वाडा चिरेबंदी ‘ ह्या नाटकात काम करत आहे.  या अनुभावाबद्धल बोलताना, ती म्हणाली, “हे माझे पहिलेच व्यावसायिक नाटक आहे. सर्वच कसलेले कलाकार. शिवाय, चंद्रकांत कुलकर्णीच दिग्दर्शन, त्यांच्या बरोबर काम करायला मज्जा येते आणि खूप काही शिकायला मिळते.” नेहाच्या मते, तिच्या अभिनयाच्या प्रवासातील, सर्वच क्षण हे अविस्मरणीय होते. पण विशेष म्हणजे, जेव्हा एखादा सीन तिला अवघड वाटतो, आणि मग तो मी करूनदाखवल्यावर , समोरच्या व्यक्ती करून मिळणारी दाद तिला महत्वाची वाटते.

‘का रे दुरावा ‘ मालिकेतील टीम वर्क बद्धल, नेहा सांगते, “सुरुची , सुयेश ,सुबोध सर्वच छान काम करतात. मज्जा येते, एकत्र काम करताना. शिवाय, काम करताना मैत्री होते आणि आम्ही वेग वेगळ्या विषयावर गप्पा मारतो .” लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘लालबाग ची राणी ‘ या आगामी चित्रपटामध्ये, नेहाची एक वेगळी भूमिका आहे. त्याबद्धल नेहा म्हणते, “मला खात्री आहे, की नक्कीच या भूमिकेचे, प्रेक्षेकांक्डून कौतुक होईल. याशिवाय, जालिंदर कुंभार दिग्दर्शित एक मराठी चित्रपट सुद्धा मी करत आहे. दोन्ही चित्रपट लवकरच येतील.”

अभिनया व्यतिरिक नेहाला काय आवडते? व ती सुट्टी कशी घालवते ? या बद्धल नेहा सांगते, “मला वाचनाची खूप आवड आहे . हल्ली जास्त वाचन होत नाही, पण, मी चित्रपट खुप पाहते. आठवड्यातून मी किमान ३ – ४ चित्रपट पाहते . सर्व प्रकारचे विविध भाषेतील सिनेमे पाहायला, मला आवडतात .”