News

अजय देवगण म्हणतोय ‘चला हवा येऊ द्या’

Ajay Devgan Kajol Devgan Shivaay

Ajay Devgan and Kajol for promotion ‘Shivaay’

बॉलिवुडचा अॅक्शन हिरो आणि संवेदनशील अभिनेता अजय देवगण आपल्या ‘शिवाय‘ या चित्रपटाच्या प्रमोशन साठी ‘चला हवा येऊ द्या‘च्या मंचावर आला होता. अजय देवगण या कार्यक्रमात काजोलसह सहभागी झाला होता. त्यांच्यासोबतीने संगीतकार मिथुनसुद्धा उपस्थित होते.‘चला हवा येऊ द्या’च्या मंचाद्वारे आजवर अनेक मराठी नाटक चित्रपटांना प्रसिद्धीचं हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता पाहून बॉलीवूड मधील अनेक सुपरस्टार्सनी ह्या कार्यक्रमात हजेरी लावली आहे.

चला हवा येऊ द्या’ च्या या भागात थुकरटवाडीच्या मंडळीनी या दोघांसोबत भरपूर धम्माल करत विविध हास्यरंग उधळले. अजय देवगण यांच्या तुफान लोकप्रिय झालेल्या ‘सिंघम‘ चित्रपटाला आपल्या स्टाईलमध्ये सादर करत या मंडळीनी एकच धम्माल उडवून दिली. यावेळी कलाकारांचा अतरंगीपणा बघून अजय आणि काजोल दोघांचीही हसून हसून पुरेवाट लागली. या भागाचं वैशिष्ट्य म्हणजे यात काजोलने मराठी भाषेत संवाद साधला. अजयनेही मराठी बोलण्याचा प्रयत्न केला ज्याला उपस्थित प्रेक्षकांनी दाद दिली.

येत्या २४ आणि २५ ऑक्टोबरला रात्री ९.३० वा. झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.

Most Popular

To Top