मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्यांसाठी इंडस हेल्थप्लसचा उपक्रम

Snehal Ambekar, Mayor Mumbai
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्यांसाठी इंडस हेल्थप्लस प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा कंपनीने  नुकतेच एक अनोखे शिबीर आयोजित केले होते, या शिबिराचे उद्घाटन मुंबईच्या मा. महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या आरोग्य शिबिरात  सिरम बिलिरुबिन, सिरिम क्रीएटीनाईन, ग्लायकोसायलेटेक, हिमोग्लोबिन, संपूर्ण कोलेस्ट्रोल, एमआय, पल्मनरी फंक्शन, आहार तज्ञ अशा विविध चाचण्यांचा समावेश करण्यात आला होता.

सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते, अभिनेत्री, कॅमेरामन, दिग्दर्शक, निर्माते आणि स्पॉट बॉईज अशा एकूण १२० जणांनी या शिबिरात आपली आरोग्य तपासणी करून घेतली.  अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, तसेच संचालक मंडळ इंडस हेल्थ प्लसचे जॉईन्ट मॅनेजिंग डायरेक्टर पर्णल देखणे , गव्हनींग कौन्सिलमंदार नाईकवडी व या उपक्रमाचे समन्वयक लिड मिडियाचे विनोद सातव, प्रमुख पाहुणे पु. ल. देशपांडे प्रकल्प संचालक मा. आशुतोष घोरपडे हे देखील उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे आशुतोष घाटपांडे यांनीदेखील या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले. व अशा विषयांवर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.