स्टाईलिश ‘गुरु’ २२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस

ankush-chaudhary-guru-movie-still

मराठी सिनेमासृष्टीत दर वर्षी नवीन नवीन विषयांवर आणि वेग वेगळे प्रयोग होताना आपल्याला दिसतायेत. त्यातील अनेक सिनेमांना प्रेक्षेकांची चांगली पसंती मिळतीये. शिवाय मराठी तिकीट बारीवर सुपरहिट सिनेमांची सख्या सुद्धा वाढतीये.

दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, तू ही रे यांसारखे रोमँटिक सिनेमे देणारे संजय जाधव ह्या वर्षाची सुरवात आपल्या ‘गुरु‘ ह्या सिनेमाने करत आहेत. अंकुश चौधरीची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा अॅक्शन, रोमँटिक, ड्रामा असणार आहे . नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. इरॉस इंटरनॅशनल, बॅगपायपर सोडा आणि ड्रीमिंग ट्वेंटी फोर सेव्हन यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे. दुनियादारी नंतर, डबल सीट, दगडी चाळ अश्या सिनेमांतून ,  प्रेक्षेकांमध्ये स्टाईल आयकॉन म्हणून  विषेश प्रसिद्ध असलेला अंकुश चौधरीची  गुरूच्या ट्रेलरमधून आपली वेगळी ‘स्टाईल’ असल्याचे दिसून येते आहे.

अगदी साउथ तडका अॅक्शन सिक्वेन्स आपल्याला ह्यात दिसतो.  अंकुश सोबतचा उर्मिला कानेटकर हीचा मँगोडॉली लूक ही आपल्याला यातून पाहायला मिळतो आहे. येत्या २२ जानेवारीला गुरु हा सिनेमा महाराष्ट्रासह सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. एंटरटेनमेंटचं कमप्लीट पॅकेज असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचे  निखळ मनोरंजन करून, सर्वाधिक कमाई करत लोकप्रिय होईल अशी आशा करूया .