चित्रपुष्प मराठी चित्रपट महोत्सव २०१५

Marathi Film Festival
पुण्यात येत्या ७ तारखेपासून, एन के इंटरप्राईजेस प्रस्तुत अनघा इवेन्ट्स च्या वतीने चित्रपुष्प  मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेले आणि येणाऱ्या काळात प्रदर्शित होणारे चित्रपट दाखवण्यात येतील .या मध्ये अगबाई अरेच्चा२, युद्ध , ढोल ताशे,  म्हैस , सत ना गत हे पाच प्रदर्शित झालेले आणि भविष्यात प्रदर्शित होणारे बाबांची शाळा , ७ रोशन व्हिला, वाक्या, तिचा उंबरटा, वन टू थ्री फोर  हे चित्रपट दाखविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांच्या संदर्भातील कलाकार,दिग्दर्शक,निर्माते ,संगीतकार आणि तंत्रज्ञ यांच्या समवेत चित्रपट जाणून घेण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध होईल.

या चित्रपट महोत्सवात चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे . प्रदर्शित आणि येणाऱ्या काळात प्रदर्शित होणाऱ्या अश्या दोन्ही विभागाकरिता पुरस्कार चित्रपटाना प्रदान करण्यात येईल. दिनांक ७, ८ आणि ९ ऑगस्ट २०१५ या तीन दिवसा मध्ये हा मराठी चित्रपट महोत्सव आर्काइव्ह थेटर ,लॉ कॉलेज रोड पुणे येथे प्रेक्षकांसाठी सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत सुरु असणार आहे .

प्रवेशिका खालील ठिकाणांवरून मिळतील.
१) अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, पुणे
२) सिद्धांत मिडिया अँन्ड पब्लिसिटी, पुणे
३) पर्पल, पुणे
४) नेक्स्ट जेनरेशन न्यूज, पुणे
५) इन ऑरबीट मॉल पुणे