‘चौक द रियालिटी’ या सिनेमाचा मुहूर्त संपन्न

'Chowk The Reality' Marathi Film Muhurat
‘Chowk The Reality’ Marathi Film Mahurat

गाव असो कि शहर कित्येक उलढालीचा जणू माहेर. मात्र काही ठिकाणी हाच चौक गुन्हेगार बनविण्याची आणि बनण्याची शाळा होऊन बसल्याच दिसत. अश्या  संवेदनशील विषयावर भाष्य करणारा, चिंतामणी निर्मित ‘चौक द रियालिटी’ या नवीन मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यात पार पडला.

आजच्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर युवा वर्गाला संबोधित करण्यासाठी संदेश भोंडवे आणि नरेश भोंडवे यांनी चित्रपटाची निर्मिती करत आहेत . ‘चौक द रियालिटी’ चित्रपटाची कथा,पटकथा आणि संवाद भरत महाडिक यांनी लिहिले असून दिग्दर्शनही भरत महाडिक हेच करणार आहेत. चित्रपटात नवोदित कलाकार राज शेटे, राजू उघडे, संतोष शिंदे, अमित देवकर हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या  चित्रिकरणास लवकर सुरुवात करण्यात येणार आहे.

Leave a Reply