News

प्रेम रंगात रंगणाऱ्या राधेची प्रेमकथा ‘राधा प्रेम रंगी रंगली’

Marathi Serial 'Radha Prem Rangi Rangli'

Veena Jagtap & Sachit Patil , Marathi Serial ‘Radha Prem Rangi Rangli

प्रेमाचं स्थान प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ असतं पण तरीही प्रेमाचा रंग प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमिकांची कथा आपण आजवर अनेकवेळा बघितली आहे पण ‘राधा प्रेम रंगी रंगली‘ या मालिकेच्या माध्यमातून अपघाताने लग्नबंधनात अडकलेल्या प्रेम आणि राधाची कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. एकासाठी लग्न म्हणजे केवळ एक व्यवहार आहे आणि दुसऱ्यासाठी लग्न म्हणजे संसार ! कसा रंगेल या प्रेमकहाणीचा करार ? महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री कविता लाड – मेढेकर, शैलेश दातार, सचित पाटील, वीणा जगताप, अक्षया गुरव, निरंजन नामजोशी, गौतम जोगळेकर, ऋग्वेदी प्रधान, अपर्णा अपाराजीत मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

राधा ही आजची कार्यक्षम, स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी आहे जिचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. तर प्रेम व्यवहारचातुर्याने वागणारा, वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळणारा आणि ज्याचं लग्न, कुटुंब, प्रेमं याच्यावर मुळीच विश्वास नाही असा मुलगा आहे. अशी दोन परस्परविरोधी स्वभावाची ही दोन पात्र लग्नबंधनामध्ये अडकतात आणि त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते.
राधा प्रेम रंगी रंगली‘ मालिकेचे दिग्दर्शन वीरेंद्र प्रधान करणार आहेत. आघाडीचे कलाकार आणि वेगळा विषय यामुळे आम्हाला खात्री आहे ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. तेंव्हा बघायला विसरू नका प्रेम रंगात रंगणाऱ्या राधेची ही कथा, ‘राधा प्रेम रंगी रंगली‘ २४ नोव्हेंबरपासून सोम ते शनि रात्री ९.०० वा. कलर्स मराठीवर.

Most Popular


Parse error: syntax error, unexpected ':' in /home/mmw2016/public_html/sourceassets/themes/mmw101401/footer.php on line 12