News

झी युवावर ‘संगीत सम्राट’ची महा अंतिम फेरी

Finalist of 'Sangeet Samraat'

Finalist of ‘Sangeet Samraat’

झी युवा वरील संगीत सम्राट च्या पहिल्या पर्वातील अंतिम भेरी उद्या रविवार, ०६ ऑगस्ट २०१७ रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  ‘संगीत सम्राट‘ या अनोख्या संगीतमय कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांवर संगीताची मोहिनी घातली आहे.  महाराष्ट्राचा आघाडीचा गायक आदर्श शिंदे याने सूर ताल आणि लय या मुद्द्यांद्वारे कलाकारांचे परीक्षण केले तर मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची नायिका क्रांती रेडकर वानखडे कलाकारांच्या परफॉर्मन्स किती मनोरंजनात्मक आहेत हे पहिले. त्याच प्रमाणे तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊत आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांनी निवेदनाची भूमिका उत्तम सांभाळली.

आता ‘संगीत सम्राट‘ कार्यक्रम त्याच्या अंतिम चरणावर पोहचला आहे. सर्व स्पर्धकांमधून सर्वप्रथम १५० स्पर्धक निवडले गेले , त्यांनतर ६० , २४ , १२ असे उत्तमोत्तम स्पर्धकी निवडले गेले आणि आता या सर्वांमधून नंदिनी अंजली , इशिता विश्वकर्मा , मानस गोसावी , संगीत फॅक्टरी , इमोशन्स बँड , प्रथमेश मोरे , रवींद्र खोमणे आणि दंगल गर्ल्स हे ८ फायनलिस्ट निवडले गेले आहेत . या ८ उत्कृष्ट स्पर्धकांतून महाराष्ट्राचा पहिला संगीत सम्राट निवडला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र ज्याची वाट बघत आहेत तो अंतिम महा सोहळा दिनांक ६ ऑगस्ट ला संध्याकाळी ७ वाजता झी युवावर पाहायला मिळेल .

Most Popular

To Top