News

‘हिरो’ ते ‘रिअल हिरो’ – जॅकी श्रॉफ यांचा प्रवास

Jackie Shroff

Jackie Shroff

झी मराठी वाहिनीवरील ‘द रिअल हिरो कथा समृद्धीच्या’ या कार्यक्रमातून आपण अनेक विशिष्ट आणि मान्यवर व्यक्तींना भेटलो.  आगामी भागात आपणास ‘जग्गू दादा’ म्हणजेच अभिनेता जॅकी श्रॉफ हे भेटायला येणार असून त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाबद्दल अधिक जाणून घेता येणार आहे. ‘जग्गू दादा’ ते ‘स्टार जॅकी श्रॉफ’ हा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. मात्र आपल्या अभिनयाच्या आणि हिमतीच्या बळावर त्यांनी चित्रपटसृष्टीत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. असंख्य सिनेमांतील आपल्या बहारदार अदाकारीने त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.

जॅकी श्रॉफ यांचा रील व रिअल लाईफ प्रवास त्यांच्याकडून जाणून घेणं हा प्रेक्षकांसाठी समृद्ध करणारा अनुभव असणार आहे. कार्यक्रमातील वेगळे जॅकी दादा आणि त्यांचे सामाजिक काम नक्की अनुभवा आर ए फाउंडेशन प्रस्तुत ‘द रिअल हिरो कथा समृद्धीच्या’ या कार्यक्रमात, ३ डिसेंबरला सकाळी ११.३० वा. झी मराठी वाहिनीवर

Most Popular

To Top
  • News Alert Subscription
  •