News

‘कुठे हरवून गेले…’ गाणे केतकी माटेगावकरच्या सुरेल आवाजात

Marathi movie 'What’sUp लग्न'

Singer Ketaki Mategaonkar , Marathi movie ‘What’sUp लग्न’

कर्णमधुर संगीत.. आणि मंत्रमुग्ध करणारा तरल आवाज हे प्रत्येक यशस्वी चित्रपटाचे गमक मानलं जातं. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच त्यातील गाणी जेव्हा रसिकांच्या ओठी रुळतात तेव्हा त्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच शिगेला पोहचते. सध्या अशीच उत्सुकता मराठी चित्रपटसृष्टीत पहायला मिळतेय, ती म्हणजे ‘What’s Up लग्न‘ या चित्रपटाच्या निमित्ताने.
क्षितीज पटवर्धन यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘कुठे हरवून गेले..’ या हृदयस्पर्शी गीताला केतकी माटेगावकरच्या सुरेल आवाजाची साथ लाभली आहे तर ट्रॉय-आरिफ यांनी आपल्या जादुई संगीताने या गाण्याला चारचाँद लावलेत असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

कुठे हरवून गेले‘ या गाण्याची उत्सुकता ताणून ठेवत निर्माते-दिग्दर्शकांनी या गाण्याचा चित्रपटातील व्हिडियो प्रसिद्ध न करता त्यासाठी एक खास व्हिडियो अल्बम बनवला आहे. ‘डान्स प्लस’ या गाजलेल्या रिअॅलिटी शोमधील पल्लवी आणि ऋषभ ही जोडी अल्बमसाठी निवडली गेली. फुलवा खामकर यांच्या नृत्यदिग्दर्शनखाली या गाण्यावर सेन्शुअस कंटेम्परी डान्स स्टाईल कोरिओग्राफ केली आहे .
फिनक्राफ्ट मीडिया निर्मित, जाई जोशी आणि व्हिडीओ पॅलेस प्रस्तुत ‘What’s Up लग्न‘ या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले आहे. वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहेरेची ही लव्हेबल केमिस्ट्री लवकरच तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत पाहू शकाल.

Most Popular


Parse error: syntax error, unexpected ':' in /home/mmw2016/public_html/sourceassets/themes/mmw101401/footer.php on line 12