‘नवरा असावा तर असा’ कार्यक्रम प्रेक्षकांची मने जिंकत आहे

Marathi serial 'Navra Asava Tar Asa'
Harshada Khanvilkar, Marathi serial ‘Navra Asava Tar Asa

आजपर्यंत आपण गृहलक्ष्मींना त्यांच्या इच्छापूर्तीसाठी खेळताना बघितलं पण आता पहिल्यांदाच आपल्या लाडक्या गृहलक्ष्मीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे नवरे या खेळात भाग घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा खानविलकर करत आहेत. नुकताच सुरु झालेला हा कार्यक्रम प्रेक्षकांची मने जिंकत आहे. कार्यक्रमामध्ये आलेल्या जोड्या हर्षदा ताईशी मनमोकळे पणे गप्पा मारतात, त्यांच्या कडू-गोड आठवणी, त्यांचा प्रवास सांगतात. प्रेक्षकांनी दिलेल्या पसंती आणि प्रेमानेमुळेच ‘नवरा असावा तर असा‘ या कार्यक्रमाने नुकतेच ५० भाग पूर्ण केले आहेत.

नवरा असावा तर असा‘ कार्यक्रमामध्ये बायको नवऱ्यासाठी आव्हान ठरवते आणि नवरा हे आव्हान पूर्ण करतो आणि जो पूर्ण करतो तोच त्या भागाचा विजेता ठरतो. यामध्ये गंमत अशी आहे कि, जिंकतो नवरा आणि बक्षीस मिळते बायकोला. या आगळ्यावेगळ्याने संकल्पनेमुळे हा कार्यक्रम अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहे.
अशीच धम्माल मस्ती, संसारगाथा आणि प्रेमकाहाणी हर्षदा ताई तुमच्यासाठी घेऊन येणार आहे कलर्स मराठीवर

Leave a Reply