News

निर्मलाचं अतिरेकी प्रेम घेणार सर्जाच्या शरीराचा ताबा

Akshar Kothari In Chahul Marathi Serial

Akshar Kothari , Actor

चाहूल’ मालिकेला लवकरच एक वेगळे वळण मिळणार आहे. कारण मालिकेमध्ये सर्जाला म्हणजेच अक्षर कोठारीला भुताने झपाटल्याचे प्रेक्षकांना बघयाला मिळणार आहे. निर्मलाच सर्जावर जीवापाड प्रेम आहे त्यामुळे जेनी असो वा शांभवी तिने कोणालाच सर्जाच्या जवळ येऊ दिले नाही. तिने सर्जाला आपलसं करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या, सर्जाला सत्य कळू नये म्हणून तिने शांभवीला अनेकदा नवीन नवीन जाळ्यामध्ये अडकवले. पण, आता निर्मलाच हे अतिरेकी प्रेम सर्जा वर हावी पडणार आहे.

शांभवी सध्या वाड्यामधील भुताच्या शोधात असून तिला वटपौर्णिमेच्या दिवशी वाड्यातील भूत हे एक स्त्री आहे हे कळले आहे. आता निर्मला हे कळल्यापासून अजूनच सतर्क झाली आहे. सर्जाला वाड्यातील भुताने झपाटले आहे. त्यामुळे सर्जा स्वत:ला मारण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे शांभवी समोर अजून एक आव्हान आहे सर्जाला बरे करण्याचे. तसेच वाड्यातील भुताची अजून एक गोष्ट देखील शांभवीला कळणार आहे. हे सगळ बघणे रंजक ठरणार आहे.

Most Popular

To Top