‘पसंत आहे मुलगी’ मालिकेतून रेशम प्रशांत आणि अभिषेक देशमुख ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीस

Pasant Ahe Mulagi Marathi TV Serial
Abhishek Deshmukh and Resham Prashant In ‘Pasant Aahe Mulagi’

लग्नाच्या गाठी स्वर्गातच जुळतात पण खाली त्या गाठी जुळवण्यासाठी अनेकजण आधार घेतात ते जन्मपत्रिकेचा आणि पंचागांचा. मुला मुलीच्या राशींपासून ते त्यांच्या कुंडलीत असणा-या ग्रहांची आणि गुणांची तपासणी करूनच लग्नाची ही बोलणी पुढे सरकते. परंतु ज्यांचं लग्न होणार आहे त्या दोघांची मने जुळलेली असतील तर मग पत्रिका जुळण्याची गरज खरंच उरते का ? पत्रिकेतील ग्रह एखाद्याच्या नात्याचं भविष्य ठरवू शकतात का ? या प्रश्नांवरच आधारित एक नवी मालिका ‘पसंत आहे मुलगी ’ झी मराठी ह्या वाहिनीवर २५ जानेवारीपासून दाखल झाली असून सोमवार ते शनिवार रात्री ८.०० वा. ही प्रसारित होणार आहे.

पसंत आहे मुलगी ’ या मालिकेतून उर्मी आणि वासूच्या भूमिकेतून रेशम प्रशांत आणि अभिषेक देशमुख ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याशिवाय मालिकेत डॉ. गिरीश ओक, मेघना वैद्य, पद्मनाभ बिंड, केतकी सराफ, नम्रता कदम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नितीन वैद्य आणि निनाद वैद्य यांच्या दशमी क्रिएशन्सची निर्मिती, समीर विद्वांस यांची संकल्पना असलेल्या या मालिकेचे दिग्दर्शन राजू सावंत यांनी केलं आहे.