‘पिंडदान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!!

Pindadaan Marathi Film
Marathi movie ‘Pindadaan’

मराठी चित्रपटात अलीकडे सातत्याने वेगवेगळे विषय नाविन्यपूर्ण मांडणीतून आपणास पाहायला मिळत आहेत , अशीच एक वेगळी कथा ‘पिंडदान‘ ह्या आगामी चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या नावावरून चित्रपट गंभीर असल्यासारखे वाटते पण ह्या चित्रपटात  एक सुंदर प्रेमकथा आहे जी पिंडदानाच्या निमित्ताने उलगडत जाते. ह्या चित्रपटात सध्याचा आघाडीचा लाडका अभिनेता ‘सिद्धार्थ चांदेकर’ मुख्य भूनिकेत असून त्याच्या बरोबर ‘मानवा नाईक’ हि अभिनेत्री दिसणार आहे.  या  दोघांची जोडी प्रथमच आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

फॅशन इंडस्ट्रीतील अनेक  वर्षांच्या  अनुभवानंतर प्रशांत पाटील पिंडदानाच्या माध्यमातून आपल्या दिग्दर्शकीय कारकीर्दीचा प्रारंभ करत आहे. चित्रपटातली गीते वैभव जोशी आणि मंदार चोळकर ह्यांनी लिहिली असून सागर धोटे याने ती संगीतबद्ध केली आहेत. चित्रपटाची कथा पटकथा संवाद हे अविनाश घोडके यांनी लिहिले आहेत. फॅशन फोटोग्राफीमध्ये विशेष ग्लॅमर आणि प्रसिद्ध असलेला बंटी देशपांडे याने चित्रपटाचे छायाचित्रीकरण केले आहे.

उदय पिक्चर्स निर्मित आणि सारथी एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असलेला  ‘पिंडदान‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Leave a Reply