News

‘तू माझा सांगाती’ मालिकेत ऋजुता देशमुख साकारणार आवलीची भूमिका

Rujuta Deshmukh in Marathi serial 'Tu Majha Sangati'

Rujuta Deshmukh in Marathi serial ‘Tu Majha Sangati

संसार आणि अध्यात्म यांचा सुयोग्य मेळ साधत, मनामनाला भक्तीचा संदेश देणारे संत म्हणजे विठुरायाचे भक्तश्रेष्ठ – संत तुकाराम. तुकोबांच्या अभंगवाणीने प्रत्येक मराठी मनात अभंग स्थान मिळवलं आहे. याच संतश्रेष्ठाचा जीवनप्रवास कलर्स मराठीवरील ‘तू माझा सांगाती ‘ मालिकेत रेखाटण्यात येत आहे. आठशेहून अधिक भागांचा टप्पा यशस्वीपणे पार केलेली ही मालिका आता भक्तीच्या परमोच्च बिंदूवर येऊन ठेपली आहे. संत तुकारामाची भूमिका वठवणाऱ्या चिन्मय मांडलेकर वर तसेच या भूमिकेवर अवघ्या महाराष्ट्राने भरभरून प्रेम केले म्हणूनच हि मालिका इतके भाग पूर्ण करू शकली यात शंका नाही. आता या मालिकेद्वारे कलर्स मराठीवर ऋजुता देशमुखची खूप वर्षांनंतर एन्ट्री होणार आहे. ऋजुता या मालिकेमध्ये आवलीची भूमिका साकारणार आहे.

तू माझा सांगाती या मालिकेमध्ये आवलीची भूमिका करणे तसे आव्हानात्मक आहे. तुकाराम हे स्वभावाने अगदी साधे, विठोबाच्या भक्तीमध्ये स्वत:ला झोकून टाकलेले असे आणि अगदी त्याविरुध्द आवली… “आवली हि स्वभवाने स्पष्टव्यक्ती तसेच व्यवहारी अशी होती अश्याप्रकारची भूमिका निभावण हे खरच खूप आव्हानात्मक आहे पण मी या भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे “, असे ऋजुता देशमुख म्हणाली. ऋजुता ‘सावर रे’ या मालिकेनंतर तब्बल तीन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुन्हा येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आपल्या लाडक्या ऋजुताला एका नव्या आणि वेगळ्याच भूमिकेत बघायला नक्कीच आवडेल यात शंका नाही.

तेंव्हा बघायला विसरू नका ‘तू माझा सांगाती ‘ सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वा. कलर्स मराठीवर.

Most Popular

To Top