‘रुस्तम’च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये

Akshay Kumar, in 'Chala Hawa Yeu Dya'
Akshay Kumar

बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमार आपल्या आगामी ‘रूस्तम‘ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या‘ या कार्यक्रमात सहभागी होणार आहे . आज दि. ८ आणि उद्या ९ ऑगस्टला रात्री ९.३० वा. हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत..

अक्षयच्या उपस्थितीतही ‘चला हवा येऊ द्या‘ मधील कलाकारांनी अक्षय कुमारच्या सुप्रसिद्ध ‘हेरा फेरी‘ चित्रपटाची आपली वेगळी आवृत्ती सादर केली ज्याला अक्षयनेही भरभरून दाद दिली. याचसोबत अक्षयच्या  गाजलेल्या गाण्यांवर ‘चला हवा येऊ द्या‘ च्या कलाकारांनी ठेका धरला. या सर्व कलाकारंचे हे धम्माल परफॉर्मन्स बघून मग अक्षयनेही त्यांना साथ देत ‘झिंगाट‘ च्या ठेक्यावर डान्स करत एकच धम्माल उडवून दिल्याची आपल्याला पाहायला मिळणार आहे .

Leave a Reply