News

‘हृदयांतर’ साठी शामक दावरने केले नृत्यदिग्दर्शन

Vikram Phadnis Mukta Barve Sonali Khare, Hrudayantar

Vikram Phadnis, Mukta Barve, Sonali Khare and Shamak Davar, Marathi Film ‘Hrudayantar’

विक्रम फडणीस प्रॉडक्शन, यंग बेरी एन्टरटेन्मेट ह्यांच्या ‘हृदयांतर‘ ह्या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे ह्यांच्या मुख्य भुमिका आहेत. ‘हृदयांतर‘ हा एक भावनिक चित्रपट आहे. गेली तीन दशकं सिनेसृष्टीत कोरिओग्राफर-गायक म्हणून नावारूपाला आल्यावर शामक दावर आता मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदाच नृत्यदिग्दर्शन करताना दिसणार आहेत.

हृदयांतर‘ ह्या चित्रपटात शामक दावर एक कॉन्सर्ट गाणं कोरिओग्राफ करतोय. शामक दावर आणि विक्रम फडणीस ह्यांचा अनेक वर्षांचा ऋणानुबंध असल्याकारणाने विक्रमच्या चित्रपटासाठी नृत्यदिग्दर्शन करणे, शामकसाठी चांगला अनुभव आहे. नुकतंच ह्य़ा गाण्याचे चित्रीकरण सुंदररित्या पूर्ण झाले आहे. चित्रीकरणानंतर सेटवर शामक ने विक्रम ला नटराजाची मूर्ती भेट म्हणून दिली.

सिनेमाचे दुसरे शेड्युल सुद्धा नुकतेच मुंबईत पूर्ण झाले असून, चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .

Most Popular


Parse error: syntax error, unexpected ':' in /home/mmw2016/public_html/sourceassets/themes/mmw101401/footer.php on line 12