News

‘अनान’ चित्रपटात शिल्पा तुळसकर एका नवीन भूमिकेत

 Shilpa Tulaskar actress

Shilpa Tulaskar actress

मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचे ठसे उमटवत कधी सुजाता तर कधी देवकीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनेत्री शिल्पा तुळसकर.
देवकी‘, ‘डोंबिवली फास्ट‘, ‘कालचक्र‘ आणि आता ‘बॉईज‘ यांसारखे चित्रपट असो, ‘दिल मिल गए‘, ‘देवों के देव- महादेव‘ यांसारख्या मालिका असो वा जावई माझा भला, लहानपण देगा देवा यांसारखी नाटके असोत सिनेमा, मालिका आणि नाटक या तीनही क्षेत्रात आपल्या उत्तोमोत्तम अभिनयाने नेहमीच स्वतःला सिद्ध केलेले आहे. आता ‘अनान‘ या आगामी मराठी चित्रपटातून ६४ कलांचं महत्त्व जगाला पटवून देणाऱ्या या भारत देशातील संगीताची संस्कृती पिढ्यांपिढ्या पुढे सुरु ठेवणाऱ्या पंडीत वसुंधरा या भूमिकेत शिल्पा तुळसकर आढळून येणार आहेत.

‘रोहन थिएटर्स’ च्या रौनक भाटीया आणि हेमंत भाटीया यांनी ‘अनान‘ या चित्रपटाची निर्मिती केलेली असून कथा आणि क्रिएटीव्ह डायरेक्शन हेमंत भाटिया यांचं आहे. दिग्दर्शन राजेश कुष्टे यांनी केलेलं आहे तर पटकथा–संवाद राजेश कुष्टे आणि मुकेश जाधव यांनी लिहिले आहेत.
येत्या २२ सप्टेंबर ला ‘अनान‘ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन तो बघायला विसरू नका.

Most Popular


Parse error: syntax error, unexpected ':' in /home/mmw2016/public_html/sourceassets/themes/mmw101401/footer.php on line 12