News

‘शौर्य – गाथा अभिमानाची’ कथा पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची

Shourya Marathi serial, zee yuva

Shourya Marathi serial, zee yuva

पोलिसांची शौर्य गाथा हि कायम त्यांच्या धाडसाची प्रचिती देणारीच असते.  कधी शक्ती श्रेष्ठ असते तर कधी शक्ती पेक्षा युक्ती. या आठवड्यात येणारे दोन्हीही भाग, हे महाराष्ट्र पोलिसांचे शौर्य आणि युक्तीचे प्रदर्शन करेल. येत्या आठवड्यात येणारी पहिली कथा आहे उपविभागिय पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांची, त्यांनी निर्भयतेने राम आणि शाम या रायगड पट्ट्यातील अट्टल खुनी आणि दरोडेखोरांना कसे कंठस्नान घातले याची. रायगड पट्ट्यात जवळ जवळ ६००० पोलीस ,२२ वर्षे त्यांचा शोध घेत होते आणि दुसरी गोष्ट आहे पोलीस अधिकारी भोसले यांच्या जिद्दीची कर्तव्यदक्षतेची, त्यांनी कश्या प्रकारे त्यांना मिळालेल्या एका छोट्याशा माहितीवरून, मुंबईतील प्रसिद्ध व्यवसायिक दवे यांच्या मुलाच्या अपहरणकर्त्यांना हुशारीने पकडले याची. ह्या दोन्ही कथा आपल्याला झी युवावर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री ९ वाजता झी युवावर पाहता येतील.

या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंट चे शिवाजी पदमजा, तर लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे, कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे.

Most Popular

To Top
  • News Alert Subscription
  •