राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा

Science Based One Act Play Competition

मराठी विज्ञान परिषद व सांस्कृतिक कार्यसंचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसहभाग वाढावा हा त्यामागील उद्देश आहे. वेज्ञानिक आणि शोध या मध्यवर्ती संकल्पनेवर हि स्पर्धा घेण्यात येत आहे.  वेज्ञानिक आणि शोध यात शास्त्रीय शोधाच्या जन्मकथावर आधारित एकांकिकेचा समावेश यात असावा . शात्रज्ञांना संशोधन करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले अनेक प्रकारच्या विचारांची घालमेल व अथक प्रयत्न यांच्यावर आधारित एकांकिका असावी . हे  शात्रज्ञांचे  जीवनचरित्र नसावे.

हि स्पर्धा दोन गटात होणार असून पहिला गट हा आठवी ते पदवी तर दुसरा गट खुला आहे. दोन्ही गटासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिके देण्यात येणार असून प्रथम क्रमांकाला रुपये ३१ हजार द्वितियला रुपये २१ हजार तर तृतीयला रुपये ११ हजार अशी आणि लेखन, दिगदर्शन, अभिनेता, अभिनेत्री, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत यासाठीहि रोख रकमेसह बक्षिसे देण्यात येणार आहेत  काही कारणाने प्राथमिक फेरीसाठी पुरेशा प्रवेशिका उपलब्ध न झाल्यास हि फेरी झोनल विभागात होईल . अधिक माहितीसाठी संपर्क मराठी विज्ञान परिषद- वि ना पूरव मार्ग, सायन चुनाभट्टी पूर्व मुंबई ४०००२२, ई-मेल :- office@mavipamumbai.org, संपर्क क्रमांक : – ०२२-२४५४७२०/ २४०५७२६८

Leave a Reply