सुलतान झळकणार ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये

Sultan Movie Promotion, Salman Khan, Chala Hawa Yeu Dya
Sultan Movie Promotion, Salman Khan, Chala Hawa Yeu Dya

लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या‘ ची हवा आता केवळ मराठी मनोरंजनसृष्टीपुरती मर्यादित राहिली नाहीये. यात सहभागी झालेल्या कलाकारांची आणि त्यांच्या कलाकृतीची हमखास चर्चा होणार हे ठरलेलं आहे. या कार्यक्रमाची हीच लोकप्रियता बघून यात आता बॉलिवुडची मंडळीही हजेरी लावत आहेत. आजवर या कार्यक्रमात शाहरूख खान, रितेश देशमुख, सोनम कपूर सारख्या अनेक लोकप्रिय हिंदी स्टार्सने हजेरी लावत या कार्यक्रमाला चार चांद लावले आणि या यादीत आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. बॉलीवुडचा सुपरस्टार सलमान खानही या कार्यक्रमात सहभागी झाला निमित्त होतं त्याच्या सुलतान या आगामी प्रदर्शित होणा-या चित्रपटाचं. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच ४ आणि ५ जुलैला रात्री ९.३० वा. सलमान खान सोबत थुकरटवाडीतील मंडळींनी केलेली धम्माल बघायला मिळणार आहे.

या कार्यक्रमाचं सर्वात मोठं आकर्षण ठरणार आहे ते सलमानचं मराठमोळं रूप. या पूर्ण कार्यक्रमात सलमानने जास्तीत जास्त मराठीतच बोललाय.  यावेळी कलाकारांच्या विनंतीवरून सलमानने झिंगाट आणि शांताबाई या गाण्यावर अगदी मराठमोळा ठेकाही धरला.