News

सुप्रिया विनोद यांना आली आशा काळेंची आठवण

Marathi serial 'Goth'

Shalaka Pawar, Supriya Vinod and Rupal Nand , Marathi serial ‘Goth

एक सीन शूट करताना अभिनेत्री सुप्रिया विनोद यांनी आशाताईंच्या अभिनयाला सलाम केला. जुन्या काळातल्या मराठी चित्रपटांमध्ये आशाकाळे हे भारदस्त नाव.  त्यांचा अभिनय आजहीप्रेक्षकांच्या स्मरणात आहे. स्टार प्रवाहच्या ‘गोठ‘ या मालिकेच्या सेटवर आशाताईंची आठवण आली.

सुप्रिया म्हणतात, ‘तुळशीला हात जोडण्याचा सीन केला ‘गोठ‘मध्ये. आशाताई काळेंचीआठवण आली. अशा प्रसंगात पूर्णकन्व्हिक्शनने काम करण्यात त्या सर्वोत्तम. तसं जमेलच असं नाही. पण एक प्रामाणिकप्रयत्न… त्यांना सलाम!

स्टार प्रवाहवरील ‘गोठ‘ या मालिकेत ‘कांचन’ याभूमिकेचं वर्णन सुप्रिया करतात, “मालिकेत भूमिका करण्याचा एक मोठा फायदा असतो. खूप वेगवेगळ्या छटा  साकार करायला मिळतात. चित्रपट किंवा नाटक आपल्याला जास्तीत जास्त तीन तास एक भूमिका रंगवायची संधी देतात. ‘गोठ ‘ मलिकेने मला कांचन म्हणून जगायची सुंदर संधी दिली आहे. खूपअन्तर्मुख, दबलेली,साध्या साध्या आनंदांपासूनही वंचित, मानसिकदृष्टया दुर्बल…एक वेगळी सुंदर भूमिका …खूप छटा असलेली“. त्यांची भूमिका आणि आशा काळेयांच्या गाजलेल्या भूमिकांमध्ये हेच साम्य आहे.

Most Popular

To Top