News

कलर्स मराठी वरील ‘सख्या रे’ मालिकेत सुयशचे दोन वेगळे लुक

 Suyash Tilak in Serial Sakhya Re

Actor Suyash Tilak in serial ‘Sakhya Re

सख्या रे‘ हि कलर्स मराठी वरील एक रहस्यमय मालिका आहे. प्रेम आणि विश्वासाभोवती निर्माण होणारं संशयाचं वलय आणि त्यातून रंगत जाणा-या नात्यांच्या संघर्षाचा प्रवास म्हणजे ‘सख्या रे‘ हि मालिका. या मालिकेमध्ये प्रेक्षकांचा लाडका आणि ज्याला प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळाले सुयश टिळक मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
सख्या रे‘ या मालिकेतील प्रोमोमध्ये सुयश दोन वेगवेगळ्या पोशाखा मध्ये दिसत आहे. एका पोशाखमध्ये म्हणजेच मालिकेमधील समीरचा ड्रेस कोड अगदीच आजच्या तरुण पिढीशी साधर्म्य साधणारा आहे. त्याने टीशर्ट, जीन्स,शर्ट आणि शूज असे घातले आहे. सुयशचा हा लुक सध्या ट्रेंड मध्ये देखील आहे. गंमत त्याच्या दुसऱ्या पोशाखात आहे. म्हणजेच मालिकेतील रणविजय हा राजघराण्यातील आहे असे समजते त्यामुळे त्याने शेरवानी, मोजडी, चष्मा असा पोशाख घातला आहे. सुयशच्या या दोन वेगळ्या लुक्समुळे प्रेक्षकांना संभ्रमात टाकले आहे हे नक्की.

या लुकवर बोलताना सुयश टिळक म्हणाला, “ह्या मालिकेत पहील्यांदाच मला दोन पात्र करायची संधी मिळाली आहे आणि दोन्ही भूमिका करताना फारंच मज्जा आणि शिकायला मिळतंय. समीर हा बॉय नेक्स्ट डोअर तरूणाई पैकी कोणालाही रिलेट होईल असा पाहीजे. इंजिनिअर असला तरी कॅस्यूअल कपडे जिन्स घालणारा. पण त्या उलट रणविजय आहे. व्यवस्थित टापटीप कपडे, शिस्त असलेला व राजघराण्याचा असल्याने त्याच्या दिसण्यात सुद्घा एक आदब आहे“.
सुयश टिळकला एका वेगळ्या लुक मध्ये बघायला नक्कीच प्रेक्षकांना आवडेल.

Most Popular


Parse error: syntax error, unexpected ':' in /home/mmw2016/public_html/sourceassets/themes/mmw101401/footer.php on line 12