News

दुर्गाच्या येण्याने सरस्वती मालिकेमध्ये सुरु होणार नवा अध्याय

Marathi serial 'Saraswati'

Marathi serial ‘Saraswati

सरस्वतीने देविकाला निव्वळ तिच्या मोठ्या मालकांसाठी स्वीकारले, मोठ्या मनाने तिला आपलसं केलं, भैरवकरांच्या वाड्यामध्ये जागा दिली. राघव आणि देविकाचे लग्न होण्यामागे विद्युलचाच हात होता हे सरस्वतीला कळून सद्धा तिने संयम राखला. विद्युलच्या विरोधात तिने भैरवला काहीच सांगितले नाही. याच दरम्यान भैरवकरांचा वाडा आणि संपत्ती सरस्वतीच्या नावावर आहे हे विद्युलला कळाले. संपत्ती मिळविण्यासाठी रचलेले कारस्थान सरस्वतीने जर राघवला सांगितले तर राघव आपल्याला या वाड्यामधून काढून टाकेल या भीतीने विद्युलने भुजंगच्या मदतीने सरस्वतीला मारण्याचे षड्यंत्र रचले.

विद्युलने सरस्वतीचा काटा काढून टाकला पण तिला मारल्यानंतर हे कळाले कि, जोपर्यंत सरस्वतीचं प्रेत मिळत नाही तो पर्यंत वाडा दुसऱ्या कुणाच्याही नावावर होऊ शकत नाही आणि जर हे प्रेत मिळाले नाही तर त्यांना सात वर्ष थांबाव लागेल यामुळे विद्युलसमोर एक नवीन समस्या उभी राहली.
सरस्वती‘ मालिकेमध्ये दुर्गाचा लूक सरस्वतीच्या लूक पेक्षा अगदीच वेगळा आहे. वेगळ्याप्रकारची साडी, गॉगल, रांगडी भाषा, आंबाडा, असा लुक असून जो सरस्वती पेक्षा अगदीच वेगळा आहे. आता सरस्वती सारख्याच दिसणाऱ्या दुर्गाच्या येण्याने राघव, देविकाच्या आयुष्यात काय घडेल हे बघणे रंजक असणार आहे. तसेच वाड्यामध्ये मज्जा, मस्ती आणि ड्रामा देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

Most Popular


Parse error: syntax error, unexpected ':' in /home/mmw2016/public_html/sourceassets/themes/mmw101401/footer.php on line 12