News

‘तुमचं आमचं सेम नसतं’ विनोदी नाटक १५ मार्चला रंगभूमीवर

‘यश क्रिएशन’ आणि ‘परीस प्रॉडक्शन’ निर्मित ‘तुमचं आमचं सेम नसतं’  या नव्याकोऱ्या  विनोदी  नाटकाची निर्मिती सौ. अर्चना निलेश चव्हाण आणि के.प्रतिमा करीत असून दिग्दर्शन नितीन कांबळे करताहेत. प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करण्याच्या उद्देशाने निर्मित  ‘तुमचं आमचं सेम नसतं’ या नाटकातून हरहुन्नरी विनोदी अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण हा रंगभूमीवर पदार्पण करतोय.

Tumacha Aamcha same Nasata, Varad Chavan, Siddharth Pagare, Gauri Joglekar, Kavita Magare,

Tumcha Aamcha same Nasata, Varad Chavan, Siddharth Pagare, Gauri Joglekar, Kavita Magare,

प्रेम म्हणजे प्रेम असतं… तुमचं आमचं सेम असतं.. अस कितीही म्हटलं तरी बऱ्याचदा ते तसं कधीच नसतं.. हे सांगणारं ‘तुमचं आमचं सेम नसतं’ ह्याचे लेखन सुद्धा   नितीन कांबळे यांचेच आहे, संगीत व पार्श्वसंगीताची साथ तृप्ती चव्हाण यांनी दिली असून गायक साईराम अय्यर, तृप्ती चव्हाण, करण यांनी ती गायली आहेत.

वरद चव्हाण बरोबर सिद्धार्थ पगारे, गौरी जोगळेकर, नितीन कुर्लेकर, कविता मगरे, आदित्य भालेराव, अभिजीत दुलगज आदि कलाकारांचा हयात समावेश आहे.

या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग बुधवार १५ मार्चला सायं. ४:३० वा. विष्णुदास भावे नाट्यगृहात रंगणार आहे.

Most Popular


Parse error: syntax error, unexpected ':' in /home/mmw2016/public_html/sourceassets/themes/mmw101401/footer.php on line 12