News

कलर्स मराठीवरील चाहूल आणि सरस्वती मालिकेमध्ये साजरी होणार वटपौर्णिमा

 Marathi Serial 'Chahool'

Marathi serial ‘Chahool

ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. कलर्स मराठीवरील ‘चाहूल‘ आणि ‘सरस्वती‘ या मालिकेमध्ये देखील शांभवी आणि सरस्वतीने वटपौर्णिमा साजरी केली.

चाहूल‘ मालिकेमध्ये वाड्यातील सगळ्या बायका उत्साहात वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी जाणार असून शारदा, जानकी शांभवीला देखील त्यांच्यासोबत वटपौर्णिमेच्या पूजेला घेउन जाणार आहेत. याचदिवशी शांभवीच्या मनामध्ये असलेला मोठा प्रश्न सोडवला जाणार आहे, तिला वाड्यामध्ये असलेल्या भुताच्या रहस्याबद्दल एक चाहूल लागणार आहे आणि या रहास्यामागे असलेला एक प्रश्न सुटणार आहे, हे सगळ होत असतानाच शांभवीच्या लक्षात येत कि, वाड्यामधील भूत हे कोणी पुरुष, लहान मुल नसून एक स्त्री आहे. हे कळल्यामुळे आता शांभवीचा निर्मला पर्यंत पोहचण्याचा प्रवास सुरु झाला आहे हे नक्की.

याच बरोबर ‘सरस्वती‘ मालिकेमध्ये राघव परतल्यावर सरस्वतीचा आनंद द्विगुणीत झाला आहे. सरस्वतीची वटपौर्णिमेची पूजा निर्विघ्नपणे पार पडणार देखील आहे पण अचानक असे काही घडणार आहे ज्यामुळे तिला धक्का बसणार आहे. कारण याचदिवशी सरस्वती समोर राघवचे एक वेगळे रुप समोर येणार आहे. पण, राघव असे का वागत आहेत ? मोठे मालक इतके कसे बदलले ? नक्की यामागचे कारण काय आहे ? या मागच कारण शोधण्याचा नक्कीच सरस्वती प्रयत्न करेल यात शंका नाही.

Most Popular


Parse error: syntax error, unexpected ':' in /home/mmw2016/public_html/sourceassets/themes/mmw101401/footer.php on line 12