Tag Archives: मराठी

‘फिट अँड फाईन’ लुकसाठी मोनालिसा बागल ने केले वजन कमी

काही महिन्यांपूर्वी मोनालिसाच्या एका नवीन सिनेमाचे शूटिंग सुरू झाले होते, नवीन वर्षाची नवी उमेद मिळाली होती आणि असं असताना लॉकडाऊनने

Actress Monalisa Bagal Photoshoot
Actress Monalisa Bagal Photoshoot

सिनेसृष्टीला देखील ब्रेक लावला. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा मोनालिसा बागल ने पुरेपूर वापर केला, स्वतःला वेळ दिला आरोग्याची काळजी घेतली. नवीन वर्षात सर्वकाही सुरळीत चालू होते, त्यावेळी तिने वजन कमी करण्याकडे विशेष लक्ष दिले. एका सिनेमासाठी ती वजन कमी करत होती आणि पुन्हा लॉकडाऊन आला. पण आता मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत, फिटनेसकडे पूर्णपणे लक्ष देत, योग्य डाएट करून मोनालिसा कमी केलेले वजन तसेच मेन्टेन करण्याकडे विशेष लक्ष देतेय.

Monalisa Bagal Photos
Monalisa Bagal Photos

 मोनालिसाने सोशल मीडियावर वजन कमी केल्या नंतरचे नवीन स्टायलिश आणि ट्रेडिशनल फोटो शेअर केले होते. अर्थात, तिचे नवीन फोटोज् आणि तिच्या या नवीन लूक साठी तिच्या चाहत्यांना खूपच भावले आहे.

‘भावार्थ माऊली’ – संत ज्ञानेश्वरांच्या कार्यावर आधारित भक्तिगीतांचा अल्बम

'Bhavartha Mauli' Lata Mangeshkarm Pt Hridaynath Mangeshkar
‘Bhavartha Mauli’ Lata Mangeshkarm Pt Hridaynath Mangeshkar

संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील महान कवी, तत्वज्ञ तसेच संत म्हणून ओळखले जातात. भागवत धर्माचा तसेच वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांनी त्यांच्या एकवीस वर्षांच्या आयुष्यात ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’, ‘चांगदेवपासष्टी’, ‘भावार्थ दीपिका’ यांसारखे अनेक अभंग व विरहिणी लिहिले.

सारेगामा प्रकाशित  ‘भावार्थ माऊली’ या नव्या भक्तीगीतांच्या अल्बमला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिले असून प्रत्येक गाण्याला लता मंगेशकर यांचे विशेष समालोचन आहे. दहा महत्त्वाच्या मराठी रचनांचा आध्यामिक काव्यप्रेमींना पुन्हा परिचय करून देण्यात आला आहे. प्रत्येक गाण्याचा खरा अर्थ सांगणारे एक भाष्यही यात सादर केले गेले आहे.

ह्या अल्बम बद्दल आपले मनोगत व्यक्त करतांना लता मंगेशकर म्हणाल्या की “महान संत ज्ञानेश्वरांचे काव्यात्मक साहित्य आजच्या पिढीसमोर सादर करण्याचा मला सन्मान मिळाला. ‘भावार्थ माऊली’ या अल्बमच्या माध्यमातून मी व माझ्या भावाने, हृदयनाथने प्रत्येक कवितेतील अध्यात्माचे सार उलगडत प्रत्येक गाण्याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे.”

‘भावार्थ माऊली’  हा अल्बम सारेगामाच्या युट्युब वाहिनीवर व इतर संगीतवाहिनीवर प्रदर्शित झाला आहे.

‘फक्त मराठी वाहिनी’च्या ‘देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी’ तिसऱ्या पर्वाचे शतक पूर्ण!

Devachiya Dwari , Fakt Marathi Channel
Devachiya Dwari , Fakt Marathi Channel

‘अभिमान भाषेचा वारसा कलेचा’ हे ब्रीद असलेल्या ‘फक्त मराठी’ वाहिनीवर विविध नवनवे विषय असलेल्या मनोरंजक कार्यक्रमांची शृंखला सुरु आहे. ‘देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी’ या अनोख्या सामाजिक कार्यक्रमाची निर्मिती करून आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाने नुकतीच शंभरी पार केली आहे.

आजपर्यंत या कार्यक्रमात महाराष्ट्रातील संतपरंपरा, महाराष्ट्र संस्कृती, सण – उत्सव, स्त्री भ्रूण हत्या, वृक्षारोपण अश्या विविध विषयांना या कार्यक्रमात विशेष महत्व देण्यात आले आहे. पुढेही या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयांवर सादरीकरण होणार असून महाराष्ट्रातील अभिजात संत साहित्य, मौखिक, अध्यात्मिक कलागुणांनी संपन्न अश्या दिग्गज कीर्तनकारांचा सहभाग आणि त्यांचे बहारदार सादरीकरण यामुळे प्रेक्षकांचे सखोल ज्ञानार्जनही होणार आहे. दिग्गज कीर्तनकारांची मधुर वाणी, साधी सोप्पी बोलीभाषा यामुळे प्रेक्षक ‘देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी’ सोबत एकरूप होतात.
Surabhi Hande, Jay malhar

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरभी हांडे करीत आहेत. या कार्यक्रमाचं दिग्दर्शन मंगेश खरात यांचे असून निर्मिती राजू पी. दियलानी यांच्या ‘न्यू टीआरपी’ या संस्थेची असून ‘न्यू टीआरपी’ साठी प्रोजेक्ट हेड निलेश पटवर्धन आहेत. ‘फक्त मराठी वाहिनी’वर आवर्जून पहा दररोज सकाळी ७:०० वाजता आणि पुनर्प्रक्षेपित सकाळी ६:०० वा.

‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेमध्ये रंगणार होळी

Shivani Sonar, Maniraj Pawar in Serial 'Raja Ranichi Ga Jodi' on colors Marathi
Shivani Sonar, Maniraj Pawar in Serial ‘Raja Ranichi Ga Jodi’ on colors Marathi


सगळीकडे रंगपंचमी आणि होळीची तयारी सुरु झाली आहे. रंगपंचमीच्या दिवशी सगळी लोकं त्यांच्यातील वैर विसरून एकमेकांना रंग लावून जुने राग रोष विसरून जातात तर होळीला वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय होतो असे म्हंटले जाते. कलर्स मराठीवरील मालिका ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेमध्ये रंगणार होळी. मालिकेमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. संजु – रणजीत आणि संपूर्ण ढाले पाटील परिवार हा सण एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे. रंगपंचमी विशेष भाग देखील रंगणार आहे .

 Shivani Sonar, Actress in 'Raja ranichi ga jodi

Shivani Sonar, Actress in ‘Raja ranichi ga jodi

संजुचं PSI होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती दिवस रात्र मेहनत  करत आहे, आणि आता तर तिला रणजीतची खंबीर साथ देखील मिळाली आहे पुढे मालिकेमध्ये काय घडणार जाणून घेण्यासाठी बघत रहा ‘राजा रानीची गं जोडी’ कलर्स मराठीवर  राजा रानीची गं जोडी – होळी विशेष  भाग येत्या शुक्रवार आणि शनिवार संध्या ७.०० वा. कलर्स मराठीवर !

शेमारू मराठीबाणावर ‘गर्लफ्रेंड’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

yatin-karyekar-amey-wagh-sai-tamhankar-kavita-lad-girlfriend
‘व्हॅलेंटाईन्स डे’ 
निमित्ताने शेमारू मराठीबाणावर रोमँटिक चित्रपटांची जंगी मेजवानी सुरु होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यात सर्वात प्रमुख आकर्षण आहे सई ताम्हणकर आणि अमेय वाघ यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘गर्लफ्रेंड’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर! १४ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता तुमच्या भेटीला येणार ‘गर्लफ्रेंड फक्त शेमारू मराठीबाणा या चित्रपट वाहिनीवर! प्यारवाली लव्ह स्टोरी‘, बस स्टॉप, फोटोकॉपी‘, यंटम, ‘लग्न मुबारक‘, मितवा‘ आणि अशा अनेक मनोरंजक चित्रपटांचा आनंद सहकुटुंब घेता येणार आहे.

Amey Wagh, Sai Tamhankar in Marathi film 'GirlFriend'
Amey Wagh, Sai Tamhankar in Marathi film ‘GirlFriend’

गर्लफ्रेंड मिळवण्याच्या बाबतीत कमनशिबी ठरलेल्या नचिकेतच्या आयुष्यात गर्लफ्रेंड नसणे हा सर्वात ऐरणीचा मुद्दा ठरलाय. यावर तो एक नामी युक्ती करतोअलिशा नावाची सुंदर तरुणी आपली गर्लफ्रेंड असल्याची बतावणी तो करू लागतो. नचिकेतला एरव्ही ज्याचे खूप आकर्षण वाटत असते तो परिकथेतील रोमान्स त्याच्या जीवनात प्रत्यक्ष येतो तेव्हा मात्र त्याची अवस्था बिकट होऊन जाते. नचिकेतला त्याच्या स्वप्नांची राणी खरोखरीच मिळणार की त्याच्या एरव्ही सुरळीत चाललेल्या साध्या आयुष्यात वादळ निर्माण होणारया आगळ्यावेगळ्या ‘गर्लफ्रेंड’चे नेमके काय होणार हे पाहण्यासाठी शेमारू मराठीबाणावर हा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पहायला विसरू नका.

 व्हॅलेंटाइन्स डेला आपल्या प्रिय व्यक्तीसोबत हा सिनेमा शेमारू मराठीबाणा वाहिनी  बघायला मिळणार आहे 

महाराष्ट्राची हास्यजत्राने गाठला 300 भागांचा पल्ला!

सोनी मराठी वरील मजेदार आणि दर्जेदार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.

Sai Tamahankar, Maharashtrachi hasya Jatra on Sony Marathi
Sai Tamahankar, Maharashtrachi hasya Jatra on Sony Marathi

आणि अशा या सगळ्यांच्या लाडक्या हास्यकत्रेचे ३०० भाग पूर्ण होत आहेत. ही अतिशय आनंद आणि समाधानाची बाब आहे की गेली २.५ वर्ष संपूर्ण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम सगळ्यांना खळखळून हसवते आहे.हसणं हा सगळ्यावरचा रामबाण उपाय आहे असं म्हटलं जात आणि हे हसवणं गेले चार सीजन सातत्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा आपल्या प्रेक्षकांना देत आहे. नवनवीन संकल्पना, आपलेसे वाटणारे विषय, भन्नाट टाईमिंग, हवीहवीशी वाटणारी पात्र आणि कमाल विनोद या सगळ्यांचा मिलाफ म्हणेज महाराष्ट्राची हास्यजत्रा.

सुप्रसिद्ध तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या टीमनी.मालिकेतील जेठालाल, भिडे, पोपटलाल, माधवी भाभी, कोमल भाभी आणि मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी हे ३०० नाबादच्या या सोहळ्याला हजर होते. अनेक वर्षांनी एवढं हसलो अशी प्रतिक्रिया या वेळी मालिकेत आत्माराम भिडेंची भूमिका साकारणाऱ्या मंदार चांदवडेकर यांनी दिली. तर इथली सर्व ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या मालिकेतही ती आणण्याचा प्रयत्न करू असं मालिकेचे निर्माते असित कुमार म्हणाले.

हा विनोदाचा विशेष सोहळा येत्या १७ आणि १८ फेब्रुवारीला रात्री ९ वा. प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.

विराट शक्तीला भेदून आर्या काळुबाईचं देऊळ उघडणार का?

सोनी मराठी वाहिनीवरची ‘आई माझी काळुबाई’ सध्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला आहे. सोशल मिडियावर त्याची चर्चा होताना दिसते.

Veena Jagtap in Marathi serial 'Aai Mazi Kalubai'
Veena Jagtap in Marathi serial ‘Aai Mazi Kalubai’

‘आई काळुबाई’ हे सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं देवस्थान आहे.  मालिकेतली गोष्ट ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची गोष्ट आहे. या मालिकेतल्या आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते.

पाटलांच्या घरात कोणीतरी सुरुंग स्फोट घडवण्याचं कारस्थान करतं, पण आर्या मात्र ते कारस्थान हाणून पाडते आणि आर्या काहीतरी करणार असल्याचा अंदाज विराटला येतो. तो आणि पाटील कुटुंब तिच्यावर नजर ठेवू लागतं आणि आर्या घराबाहेर कशी पडणार हा प्रश्न निर्माण होतो. आर्या (वीणा जगताप) आता विराट शक्तीला भेदून गावातलं काळुबाईचं देऊळ उघडणार का, हे येत्या रविवारी, ७ फेब्रुवारी, संध्या. ७ वा. सोनी मराठी वाहिनीवर ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या महाएपिसोड मधे प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

हसणं अनलॉक करण्यासाठी येत आहे कॉमेडीची सुपरफास्ट एक्सप्रेस्

Actor Sumeet Raghavan
Actor Sumeet Raghavan

गेल्या वर्षभरात कित्येकांना अनेक ताणतणावांना सामोरं जावं लागलं तर कित्येकांच्या चेहऱ्यावरचं हास्यही निमालं.  ‘कोरोना’ नामक वादळाने गेलं वर्षभर जगाला हादरवून सोडलं . पण आता निराशेची ही सगळी मरगळ झटकून नव्या वर्षात सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायला सज्ज झालाय. अतरंगी कलाकारांची सतरंगी धमाल घेऊन कलर्स मराठी दर्जेदार आणि निखळ मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहेएका धम्माल विनोदी शो सह. ‘सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस्’ ७ फेब्रुवारीपासून दर रविवारी संध्या ७.०० वा.

या ‘सुपरफास्ट कॅामेडी एक्सप्रेस्’  ची सूत्रं सांभाळणार आहेरसिकांचा लाडकाअष्टपैलू अभिनेता सुमीत राघवन. हिंदी चित्रपटमालिका तसंच नाटकाच्या मंचावरून आजवर सुमीतने रसिकांची मनं काबीज केलीयत. यापूर्वी मराठी टेलिव्हिजन वर सोहळ्यांचा सूत्रसंचालक म्हणूनही तो रसिकांच्या भेटीला आला होता. मात्र एखाद्या मराठी शो चा सलग सूत्रसंचालक म्हणून या शो द्वारे कार्यक्रमाची एकहाती धुरा सुमीत पहिल्यांदाच सांभाळणार आहे.

या कार्यक्रमाची निर्मिती संहिता क्रिएशन्स करत असून आशिष पाथरे याने या शोचं लेखनदिग्दर्शन सांभाळणार आहे.

‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेने गाठला १०० भांगाचा पल्ला

subodh bhave with his wife celebrating success of 'Shubhmangal online''
subodh bhave with his wife celebrating success of ‘Shubhmangal online”


कलर्स मराठीवरील शुभमंगल ऑनलाईन मालिका सुरू होण्याआधी बरीच चर्चेत होती. मालिकेचा विषय खूपच वेगळा
, सुयश – सायलीची जोडी देखील पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीस होणार होती, सुकन्या कुलकर्णी मोने या देखील कलर्स मराठीवर परतणार होत्या.

Subodh Bhave, Suyash Tilak selfie
Subodh Bhave, Suyash Tilak selfie


सुबोध आणि मंजिरी भावे यांची निर्माते म्हणून पहिलीच मालिका आणि बर्‍याच गोष्टी. सद्यस्थिति लक्षात घेता तरुण पिढी काय तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील डिजिटलचे महत्व काही औरच होऊनं बसले आहे ! आतापर्यंत एका व्हिडिओ कॉलवर सार्‍या भेटीगाठी पार पडत
मन जुळतमैत्री होत असे. पणआता मात्र ऑनलाईन लग्नाच्या गाठी देखील जुळल्या.

Sameedha Guru, Sukanya Mone, Sayali Sanjeev
Sameedha Guru, Sukanya Mone, Sayali Sanjeev

शंतनू -  शर्वरीच्या विवाहसोहळा तर पडला पण त्यांच्या आयुष्यात अचानक ऐश्वर्याच्या येण्याने बरीच उलथापालथ होते आहे. आता शर्वरीच्या साथीने शंतनूला कुटुंबाची साथ कशी मिळेल ? शर्वरी त्याला साथ देईल ? ऐश्वर्याचा नक्की हेतु काय आहे ? तिचा खेळ शर्वरी – शंतनू उधळून लावू शकतील ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे..

'Shubhmangal Online'
‘Shubhmangal Online’

नुकताच मालिकेने १०० भागांचा पल्ला गाठला. प्रेक्षकांच्या मिळणार्‍या उदंड प्रतिसादामुळे हे शक्य होऊ शकले. मालिकेतील पात्र, विषय, जोडी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेच्या संपूर्ण टीमने एकत्र येऊन याचे सेलिब्रेशन केले. सुकन्या कुलकर्णी मोने, सायली संजीव, सुयश टिळक, सुबोध भावे, मंजिरी भावे यांच्या आणि संपूर्ण टिमच्या उपस्थितीत केक कट करून, सेल्फी काढत या सगळ्यांनी आनंद व्यक्त केला.

‘बस्ता’ २९ जानेवारीला झीप्लेक्स वर प्रदर्शित

Sayali Sanjeev in Basta Marathi movie
Sayali Sanjeev in Basta Marathi movie

लग्न म्हटलं, की बस्त्याची खरेदी स्वाभाविकपणे येते. बस्त्याची खरेदी ही एक गंमतीशीर गोष्ट असते.  श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्मस् प्रस्तुत, सुनील फडतरे आणि वर्षा मुकेश पाटील यांनी ‘बस्ता’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. तानाजी घाडगे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अरविंद जगताप यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी गीतलेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव, सुरज पवार, अरबाज शेख, पल्लवी पाटील अशी उत्तम स्टारकास्ट आहे.

मुंडावळ्या बांधलेली, चेहऱ्यावर आनंद असलेली सायली संजीव या पोस्टरवर दिसत आहे. अतिशय लक्षवेधी असं हे पोस्टर आहे. त्यामुळेच हा चित्रपट नक्कीच मनोरंजक आणि वेगळी गोष्ट सांगणारा असेल यात शंका नाही.   हा रंगतदार ‘बस्ता’ चित्रपटाच्या माध्यमातून २९ जानेवारीला प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं.