Tag Archives: मराठी

‘६ व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाची’ घोषणा

Ambarnath Marathi Film Festival 2021
Ambarnath Marathi Film Festival 2021

‘अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव’ हा नगरपालिका क्षेत्रामध्ये सलग ५ वर्षे आयोजित केला गेलेला हा एकमेव चित्रपट महोत्सव असून मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये या महोत्सवाने मानाचे स्थान प्राप्त केले आहे. २०२० मध्ये निर्मिती झालेले प्रदर्शित/ अप्रदर्शित मराठी चित्रपट या महोत्सवासाठी पात्र असतील व त्यांचे परिक्षण झाल्यावर नामांकन यादी जाहीर करण्यात येईल. सर्वसाधारण निकषांसोबतच चित्रपट निर्मितीशी निगडित विविध तंत्रज्ञांचा समावेशही पुरस्कार नामांकनांमध्ये केला जातो. या संदर्भात चित्रपटसृष्टीमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणाऱ्या  स्पॉट दादांचा‘ सन्मान हे या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

यावर्षीचा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव हा ‘कोविड नियम संकेतानुसार’ आयोजित करण्यात येत आहे.दरवर्षीप्रमाणेच मराठी मनोरंजन सृष्टीतील  नामवंत कलाकारांच्या उपस्थितीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण होणार आहे.

२०२१ चे विशेष घोषित पुरस्कार पुढील प्रमाणे :
जीवन गौरव पुरस्कार: ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर
कारकीर्द सन्मान विशेष पुरस्कार: श्रीकांत मोघे
तंत्रज्ञ गौरव पुरस्कार:  ज्येष्ठ संकलक व्ही एन मयेकर
सिने पत्रकारिता गौरव पुरस्कार: गणेश आचवल

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या सेटवर राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त वृक्षारोपण

सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान मिळवलं आहे. महाराष्ट्राच्या अभिमानाची यशोगाथा, जिजाऊंचे संस्कार या मालिकेद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.

Neen Kulkarni, Dr Amol Kolhe, Sayaji Shinde, while tree plantation on set

Neen Kulkarni, Dr Amol Kolhe, Sayaji Shinde, while tree plantation on set

12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांची जयंती. त्या निमित्ताने स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या सेटवर वृक्षारोपण करण्यात आले. स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या टीमने 150 रोपटी लावली. या कार्यक्रमाला डॉ. अमोल कोल्हे, नीना कुळकर्णी आणि सयाजी शिंदे हे उपस्थित होते.

शिवजयंती निमित्ताने शिरूर येथे बायोडायव्हर्सिटी प्लांटची उभारणी करणार असल्याचे डॉ. कोल्हेनी या वेळी सांगितलं. शिवभक्तांबरोबर या वृक्षारोपणाची हिरवी मशाल, या वृक्षारोपणाचा विचार घेऊन या वेळी शिवनेरीवर देखील जाऊ असंही ते म्हणाले.जिजाऊ माँ साहेबांच्या जयंती निमित्त मी सगळ्यांना हे आव्हान करतो की झाडांना पण एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे मान द्या तरच लोक त्यांना जपतील.

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील अभिमन्यू आणि लतिका यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस

Akshaya Naik, Sameer Paranjape, Sundara Manamadh Bharali-'serialcast
Akshaya Naik, Sameer Paranjape, Sundara Manamadh Bharali-‘serialcast

 कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’  या मालिकेमध्ये  सध्या अभिमन्यू आणि लतिकाचे मालिकेध्ये वेगळे नाते बघायला मिळत आहे. त्यांच्यात कितीही मतभेद असले तरीदेखील संकटामध्ये ते एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहतात.  आपल्यात कितीही भांडण असले तरीदेखील तुझे स्वप्न करण्यात मी तुझी साथ नक्कीच देणार असे लतिकाने अभिला सांगितले आहे. अभिमन्यूला लतिकाचा खंबीर आधार मिळाला आहे आणि येत्या महारविवारमध्ये लतिकाला मिळणार आहे अभिची साथ.

प्रेक्षकांच्या मिळणार्‍या उदंड प्रतिसादामुळे मालिकेने नुकतेच १०० भाग पूर्ण केले… मालिकेतील पात्र, अभिमन्यू आणि लतिका यांची जोडी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अभीची आई म्हणजेच अतिशा नाईक, अभिची वाहिनी तसेच कामिनी, सज्जनराव यांची भूमिका देखील प्रेक्षकांची मने जिंकत आहे. सध्या मालिकेमध्ये शर्यतीचा मुद्दा सुरू आहे ज्यात दौलतने अभिमन्यूला भाग घेण्याचे आव्हान दिले आहे. पण, अभीचे वडील याच्या पुर्णपणे विरोधात आहेत. अभिमन्यू लतिकाच्या साथीने कसा वडिलांचा होकार मिळवणार ? आणि तो शर्यतीत भाग घेणार का ? हे जाणून घेण्यासाठी बघत रहा सुंदरा मनामध्ये भरली रात्री ९.०० वा. कलर्स मराठीवर.  

मराठीतील नव्या चित्तथरारक वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू

लॉकडाऊन दरम्यान सर्व सिनेमा हॉल बंद असल्यामुळे नविन चित्रपट चाहत्यांसाठी ऑनलाइन हे एकमेव मुख्य माध्यम होते- दरम्यानच्या काळात ह्या  प्लॅटफॉर्म वरील प्रेक्षकांच्या संखेत वाढ झाल्याचे आपल्याला दिसते,  त्यामुळे ह्या  ओटीटी प्लॅटफॉर्मसमुळे वेबसिरीजना सुगीचे दिवस आले आहेत असेच म्हणावे लागेल.

Tejas Lokhande, Chandraprakash Yadav, Aajinkya Thakur
Tejas Lokhande, Chandraprakash Yadav, Aajinkya Thakur

सध्याच्या काळात सिनेमांच्या आणि वेबसिरीजच्या चित्रीकरणासाठी सरकारने परवानगी दिली. त्यामुळे अनेक सिनेमांचे आणि मराठी वेबसिरीज चे चित्रीकरण सुरू करण्यात आले. नवोदित दिग्दर्शक तेजस लोखंडे याने नव्या वेबसिरीजच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. वेबसिरीजच्या शुटिंग दरम्यानचा एक फोटो नुकताच त्याने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. ‘चंद्र फिल्म ॲंड एंटरटेन्मेंट’, चंद्रप्रकाश यादव आणि प्रशांत सावंत हे या वेबसिरीजची निर्मिती करत आहेत. या वेबसिरीजचे सहनिर्माते प्रशांत मधुकर राणे आहेत. तर शिवराज सातार्डेकर हे डिओपी आहेत. यातील कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

‘अंजली’, ‘दुहेरी’, ‘नकळत सारे घडले’ या लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक तेजस लोखंडे त्याच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगतो, ”ही माझी पहिलीच वेबसिरीज असल्याकारणाने मी खूप उत्सुक आहे.  या वेबसिरीजचा विषय माझ्या अत्यंत जवळचा आहे. ही वेबसिरीज करण्यापूर्वी मी ब-याच वेबसिरीज पाहिल्या त्यांचा अभ्यास केला. माझ्या नव्या वेबसिरीजसाठी  देवाचे आणि तुमचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू देत. हीच सदिच्छा.

चंद्र फिल्म ॲंड एंटरटेन्मेंट, चंद्रप्रकाश यादव आणि प्रशांत सावंत ह्यांची निर्मिती असलेली, तेजस लोखंडे दिग्दर्शित आणि अजिंक्य ठाकूर लिखित या नव्या मराठी वेबसिरीजचे चित्रीकरण दणक्यात सुरू झाले आहे. यात कोणकोणते कलाकार असणारं आहेत याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतेय.

‘अस्सं माहेर नको गं बाई’ ७ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

Swanandi Tilekar, Pushkaraj Chirputkar 'Ass Maher Nako ga bai'
Swanandi Tilekar, Pushkaraj Chirputkar ‘Ass Maher Nako ga bai’

स्वानंदी टिकेकर आणि पुष्कराज चिरपुटकर ही जोडी या आधीही काही मालिकांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.  आता हीच जोडी पुन्हा एकता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे,  सोनी मराठी वाहिनीवर. ७ डिसेंबरपासून  ‘अस्सं माहेर नको गं बाई‘ ह्या मालिकेतुन. लग्न झालेल्या मुलीला कोणती गोष्ट सर्वात प्रिय असेल तर ती म्हणजे तिचं माहेर, आणि याच माहेरी नवऱ्याबरोबर जाऊन राहण्याची संधी तिला मिळालीतर?

अशीच कथा आहे सोनी मराठी वाहिनीवर नवीन येणाऱ्या ‘अस्सं माहेर नको गं बाई’ मालिकेची. सखी आणि कुणाल हे सुखी दाम्पत्य आपल्या कामानिमित्त सखीच्या माहेरी जाऊन राहत पण माहेरी सगळं आपल्या मनासारखं होईल असं वाटणाऱ्या सखीच्या अपेक्षकांवर तिच्या आईच्या जावयावरील प्रेम आणिश्रद्धेमुळे पाणी पडत.

या मालिकेत स्वानंदी आणि पुष्कराज बरोबर सुप्रिया पाठारे आणि राजन भिसे हे कलाकार प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ७ डिसेंबरपासून सोम.-शनि. रात्री १०:३० वा. प्रेक्षेपित होणारी ही विनोदी मालिका आणि सखीच जगावेगळं माहेर सर्व प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास निर्मात्याना आणि मालिकेच्या संपूर्ण टीमने व्यक्त केलाय.

अभिनेत्री शिवानी सोनार झळकणार वेबसिरीज मध्ये

Actress Shivani Sonar in 'one by two' webseries
Actress Shivani Sonar in ‘one by two’ webseries

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील प्रमुख अभिनेत्री शिवानी सोनार हिच्या अभिनयाचे कौतुक होत असून, हि मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे आपल्याला दिसतं . छोटया पडद्यवरून आता शिवानी हि  डिजिटल विश्वात पदार्पण करत आहे.  कॅफेमराठी प्रस्तुत आणि बाप फिल्म्स, रिझॉन्स स्टुडिओ निर्मित ‘वन बाय टू’ हि मराठी
वेबसिरीज मध्ये  एक वेगळ्या अशा भूमिकेत शिवानी सोनार दिसतीये.
.

कोणत्याही  रिलेशनशिप मध्ये दोन्ही बाजू जर लॉयल असतील तर ते रिलेशन खूप चांगलं टिकतं असं म्हणतात. पण जर त्याच लॉयलटीची माँ कि आँख झाली तर? काय-काय मजा मस्ती आणि घडामोडी घडतात, हेच या सिरीजमध्ये बघायला मिळेल.  या वेब सिरीजचे लेखन निशांत गजभे आणि रोहित निकम यांनी केले असून दिग्दर्शक निशांत गजभे आहे. या वेब सिरीजमध्ये रोहित निकम, शिवानी सोनार, अनामिका डांगरे, श्रेयस गुजार, आदित्य हविले, आरोही वकील, रवींद्र बंदगार आणि अभय महाजन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘वन बाय टू’ हि मराठी वेबसिरीज नुकतीच एमक्स प्लेअर, एअरटेल एक्सट्रिम आणि व्हीआय मूव्हीज म्हणजेच वोडाफोन प्ले या ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज झाली आहे.

सर्पसंकटातून ‘आर्या’ कशी वाचवेल स्वतःला? पहा सोनी मराठी वाहिनीवर

'Aai Mazi Kalubai' serial, Alka Kubal, Veena Jagtap
‘Aai Mazi Kalubai’ serial, Alka Kubal, Veena Jagtap

सोनी मराठी वाहिनीवरच्या ‘आई माझी काळुबाई’या मालिकेतली गोष्ट ही ‘आर्या‘ (विणा जगताप) ह्या मुख्य पात्राच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची आहे. या मालिकेत आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते.  आपल्या भावाला, संकेतला शोधण्यासाठी म्हणून आर्या माधवराजेंची अट मान्य करून त्यांच्या मुलाशी, अमोघशी लग्न करते. पाटील घरात आल्यापासून आर्या तिच्या भावाचा म्हणजेच संकेतचा शोध घेताना वेगवेगळ्या जीवघेण्या संकटात सापडते,त्यापैकीच एक संकट म्हणजे  विषारी सापाशी तिचा सामना होतो. आर्यावर आलेले हे सर्पसंकट नेमके कसे आले आणि कोणी घडवून आणले ,त्यातून आर्या कशी मार्ग काढते, त्यात तिला आई काळुबाईचा काय संकेत मिळतो. याची उत्कंठावर्धक गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

‘आई काळुबाई’ हे साताऱ्या जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असfलेलं देवस्थान आहे. या मालिकेचं चित्रीकरण साताऱ्यातच होत असल्यानं मालिकेला मातीतला अस्सलपणा आणि दृश्यश्रीमंती लाभली आहे. सोनी मराठी वाहिनीवर सोम.-शनि., संध्या. ७ वा. ही मालिका प्रदर्शित होते। सध्या मराठी प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद या मालिकेला लाभत आहे. मालिकेविषयी  चर्चा सोशल मीडियावर सातत्याने होताना दिसते.

‘चिर्रर्रर्र बुंगाट’ मध्ये योगेश तवार व उर्मिला जगताप हि नवी फ्रेश जोडी

Urmila Jagtap, Yogesh-Tawar
Urmila Jagtap, Yogesh-Tawar

योगेश तवार आणि उर्मिला जगताप यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारं एक नवं फ्रेश गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याची निर्मिती योगेश अनिल तवार यांनी केली असून झी युवा संगीत सम्राट या पर्वाचा महाविजेता ठरलेल्या रवींद्र खोमणे यांनी हे गीत गायले आहे, तर प्रसाद गाढवे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीताला विपुल कदम यांनी संगीत दिलं आहे. याअगोदर योगेश तवार यांनी निर्मिती केलेलं तसेच युवा गायक रोहित राऊत यांनी गायलेलं मन मन हे गाणं सर्वांनाच आवडलं होतं.


योगेश तवार व उर्मिला जगताप हि एक नवी फ्रेश जोडी या गाण्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळनार आहे. ह्या गाण्याची कमालीची गोष्ट म्हणजे अभिनयासोबतच योगेश अनिल तवार यांनी गाण्याचं कथानक व दिग्दर्शनाची धुरा देखील सांभाळली आहे, गाण्याच्या लोकशन पासुन ते फ्रेश लूक येण्यासाठी गाण्याच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे.

गाण्याचं छायाचित्रण व संकलन ह्या दोन गोष्टी राहुल झेंडे यांनी सांभाळल्या असून, लाईटस अक्षय वाघमोडे यांनी तर मेकअप हर्षद खुळे यांनी केला आहे, बाकी सर्व तांत्रिक जबाबदारी अशोक घुले व अक्षय कडू यांनी सांभाळली आहे.

कोरोनायोध्द्या डॉक्टरांमधल्या ‘दैवी’रूपाला तेजस्विनी पंडितने दिला ट्रिब्यूट

Tribut to corona warriors poster by actress Tejaswini Pandit
Tribute to corona warriors poster by actress Tejaswini Pandit

अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे नवरात्री स्पेशल फोटोशूट तिच्या चाहत्यांमध्ये आणि सिनेसृष्टीमध्ये चर्चेचा विषय असतो.  २०१७ पासून तेजस्विनी पंडित दरवर्षी एका नव्याविषयासह नवरात्रीचे फोटोशूट करत असते.  दरवर्षी वैविध्यपूर्ण कल्पनांव्दारे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तेजस्विनी आपले फोटोशूट घेऊन येते. यात कधी स्त्रीशक्तीला सलाम असतो, तर कधी अदिशक्तीला आदरांजली असते तर कधी सद्यस्थितीवर केलेले भाष्य असते.

यंदा तेजस्विनी आपल्या फोटोशूटमधून कोरोनायोध्द्यांना सलाम करत आहे.नवरात्रीच्या पहिल्या दिवशी डॉक्टर बनून पीपीई किट घातलेली रूग्णांना जीवनदान देणारी देवी तेजस्विनीने साकारलेली आहे. आपल्या ह्या फोटोशूटविषयी तेजस्विनी पंडित म्हणते, “ रूग्णांचे प्राण वाचवणं ही विज्ञानाने डॉक्टरांना दिलेली ‘दैवी’ देणगी आहे. कोणत्याही संकटकाळी आपण देवाचा धावा करतो. आणि पहा ना. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्यसेवेशी निगडीत कर्मचारी कसे देवासारखे धावून आले. आपली वैयक्तिक सुखदु:ख विसरून अहोरात्र रूग्णसेवा करणा-या डॉक्टरांमधल्या दैवी कर्माला ह्या फोटोव्दारे वाहिलेली ही आदरांजली आहे.”

‘स्वामिनी’ मालिकेतील रंजक वळण, काय करेल आता रमा?

'Swamini' serial, Revati Lele, Srushti Pagare
‘Swamini’ serial, Revati Lele, Srushti Pagare

कलर्स मराठीवरील ‘स्वामिनी’ ही मालिका आता रंजक वळणावर येऊ पोहचली आहे. निरागसपणे वाड्यात बागडत, हसण्याने सार्‍यांना मोहात पाडात, आणि पेशवाई संस्कारात घडत आपल्या रमाबाई मोठ्या झाल्या आणि शनिवारवाड्यात आल्या. शनिवार वाड्यातील रमाबाईंचा प्रवास तसा कठीणच. गोपिकाबाईंसोबतच आता त्यांना माधवरावांचे देखील मन जिंकायचे आहे. या प्रवासामध्ये अनेक आव्हानांना त्यांना सामोरी जावे लागले, आणि अजूनही जावे लागते आहे. त्यांच्यासमोर आलेल्या अनेक कठीण प्रसंगामधून आजवर रमाबाई नेहेमीच बाहेर पडल्या.

माधवरावांचा अबोला, गोपिकाबाईंची नाराजगी आणि आनंदीबाईंची कट कारस्थान ज्याविषयी रमाबाई अनभिज्ञ आहेत, पण कधी पार्वतीबाई तर कधी सावित्रबाईंच्या मदतीने आजवर रमाबाईंनी यातून मार्ग काढण्याचा सतत प्रयत्न केला… आणि यामध्येच आता रमाबाईंची सगळयात मोठी कसोटी लागणार आहे… माधवरावांवर अचानक हल्ला होणार असून रमाबाई माधवरावांना कश्या वाचवतील ? त्या आपल्या सौभाग्याच रक्षण कसे करतील ? हे बघणे रंजक असणार आहे. या प्रसंगानंतर रमाबाई – माधवराव यांच्यातील दुरावा मिटेल ? गोपिकाबाईंचे मन रमाबाई जिंकू शकतील ? हे लवकरच कळेल. तेंव्हा नक्की बघा स्वामिनी मालिका सोम ते शनि रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर. माधवरावांच्या मनामध्ये असलेले रमाबाईबद्दलच्या भावना ते व्यक्त करू शकतील का?

या घटनेनंतर गोपिकाबाई आणि रमाबाई यांचे नाते कोणते वळण घेईल ? माधवराव रमाबाईं यांच्यात प्रेम फुलेल का ? हे जाणून घेण्यासाठी बघत रहा ‘स्वामिनी’ मालिका कलर्स मराठीवर.