Tag Archives: मराठी

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा आगामी चित्रपट ‘सरसेनापती हंबीरराव’

शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणार्‍या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या यशा नंतर लेखक, दिग्दर्शक, प्रविण विठ्ठल तरडे हे प्रेक्षकांसाठी ‘सरसेनापती हंबीरराव’ हा एक अतिशय भव्य ऐतिहासीक चित्रपट घेऊन येत आहेत . या अतिभव्य ऐतिहासीक चित्रपटाच्या संहितेचे पूजन हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडावर महाराष्ट्रातील पाच शेतकर्‍यांच्या हस्ते करून प्रविण तरडे यांनी पुन्हा एक आदर्श पायंडा पाडला आहे. या प्रसंगी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” च्या घोषणांनी रायगडचा आसमंत दुमदुमला, भगव्या रंगाच्या फेट्यांनी वातावरण उल्हासीत झाले होते. तत्पूर्वी चित्रपटाच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या अतिभव्य ऐतिहासीक मराठी चित्रपटाची निर्मिती उर्विता प्रॉडक्शन्स यांची आहे.

'Sarsenapati Hambirrao' Marathi Movie muhurat
‘Sarsenapati Hambirrao’ Marathi Movie muhurat

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती होण्याचा बहुमान हंबीरराव मोहिते यांनी मिळवला. रायगडावर रंगलेल्या या मंगलमय सोहळ्याला चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, संदीप रघुनाथराव मोहिते पाटील, धर्मेंद्र सुभाष बोरा व सौजन्य सुर्यकांत निकम  यांच्यासह विविध गावातील शेतकरी, माजी सैनिक आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीडचे ग्रामस्थ आणि चित्रपटाचे कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.

Sarsenapati Hambirrao Movie Poster
Sarsenapati Hambirrao Movie Poster

‘सरसेनापती हंबीरराव’ या अतिशय भव्यदिव्य मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते तसेच बहिर्जी नाईक, सोयराबाई, औरंगजेब, संताजी धनाजी आणि सर्जाखान या महत्वाच्या भूमिका पडद्यावर कोण साकारणार याबद्दल औत्सुक्य निर्माण झाले आहे, तसेच लवकरच चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होणार असून २०२० मध्ये ‘सरसेनापती हंबीरराव’ प्रदर्शित होणार आहे.

सोनी मराठीवर अनुभवा जिजा-शहाजीच्या लग्नाचा शाही थाट

हिंदवी स्वराज्य उभं करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र त्यांना घडवणाऱ्या माऊलीचा इतिहास तितकासा परिचयाचा नाही . अवघ्या ८ व्या वर्षी न्यायाच्या बाजूने उभी राहणारी जिजा लहानपणापासूनच कर्तबगार होती. शिवबांवर झालेल्या स्वराज्याच्या संस्कारांचा पाया जिजाच्या बालपणीच घातला गेला होता. स्वराज्याच्या मोहिमेचा मानबिंदू ठरला तो जिजा शहाजी यांचा विवाह सोहळा. जाधव आणि भोसले या राजघराण्यांमध्ये झालेली सोयरीक ही इतिहासातली खूप मोठी राजकीय घडामोड होती असे म्हणायला हरकत नाही. १५०० सालचा तो  काळ त्याकाळची अनिश्चित अशी परस्थिती आणि त्यात पार पडलेला एक ऐतिहासिक आणि अजरामर सोहळा.  सनई -चौघंड्यांचे सूर, केळीचे खांब आणि झेंडूच्या फुलांनी नटलेला दिव्य मंडप, शाही पक्वांन्नांनी सजलेलं ताट, दागिने, रोषणाई, सजावट, उंची वस्त्र असा शाही थाट होता जिजा-शहाजीच्या लग्नाचा.

Swarajya Janani Jijamata Serial on Sony Marathi
Swarajya Janani Jijamata Serial on Sony Marathi

या शाही सोहळ्याचं पान इतिहासात आपण  वाचलं  ही असेल पण  सोनी मराठीवर सुरू असलेल्या ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेच्यानिमित्ताने पहिल्यांदा पाहायला मिळणार आहे.

‘स्वराज्य जननी जिजामाता’ हा कार्यक्रम पाहताना तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा विवाह तर संपन्न होईल पण ही सप्दपदी ऐतिहासिक का ठरावी. तुमचं उत्तर मालिकेच्या शीर्षकातच आहे. महाराष्ट्राच्या सर्वश्रेष्ठ माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिजामाता यांचा हा विवाह सोहळा आहे. या विवाह सोहळ्यानंतरच महाराष्ट्राच्या त्या वैभवशालीन इतिहासाला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. त्यामुळे हा विवाहसोहळा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचा मानबिंदू ठरतो. तसेच ज्या आईने महाराष्ट्राच्या शौर्यवान मराठ्याला जन्म दिला. जिच्या संस्कारांचे गोडवे आजही पोवाड्यांतून गायले जातात त्या जिजामातेची मनस्थिती अवघ्या आठव्या वर्षी कशी बरं असेल हे पाहणे फारच रंजक आणि स्फूर्तीदायक ठरणार आहे.

अमोल कोल्हे निर्मित ‘स्वराज्य जननी जिजामताा’ विवाह सप्ताह  ४  नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता पहा सोनी मराठीवर.

वेदश्री खाडिलकरने साकारली निरागस ‘खारी’

येत्या शुक्रवारी , १ नोव्हेंबर रोजी  ‘खारी बिस्कीट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ह्या चित्रपटात पाच वर्षांच्या गोंडस पण अंध मुलीची, ‘खारी’ची प्रमुख भूमिका साकारलीये  वेदश्री खाडिलकर हिने. चित्रपटाच्या प्रोमोला  प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटाचे टायटल सॉंग अतिशय लोकप्रिय झाले आहे.

Vedashree Khadilkar, 'Khari Biscuit' Marathi
Vedashree Khadilkar, ‘Khari Biscuit’ Marathi

निरागस, अंध खारीचं कास्टिंग हा या चित्रपटाचा एक फार महत्वाचा भाग होता आणि आव्हानही होतं. सुमारे ३५० मुलींच्या ऑडिशन्सनंतर खारी म्हणजेच वेदश्री मिळाली. खारी हे कॅरेक्टर अंध असल्यामुळे तिला आर्टिफिशिअल लेन्स लावण्यात येणार होत्या. खारीचं वय ५ वर्षे असल्यामुळे शूटिंग दरम्यान पाठांतरसुद्धा महत्वाचे होते. चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी वेदश्री करून तीन महिन्याच्या ब्लाइंडनेस ट्रेनिंग वर्कशॉपमधून तयारी करून घेण्यात आली.

‘खारी बिस्कीट’चे दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, “वेदश्री शिवाय दुसरी खारी होणं शक्य नाही. खारी बिस्कीट ही फिल्म माझ्यासाठी फार स्पेशल आहे आणि त्यात खारीचं कास्टिंग अत्यंत महत्वाचं होतं.” चित्रपटास सर्व रसिक प्रेक्षकांकडून भरघोस प्रेम आणि तिकीट बारीवर मोठे यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केले.

स्पृहा जोशी चे वेगळ्या लुकमधील ‘विक्की वेलिंगकर’चे नवीन पोस्टर

अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार व प्रणय चोकसी आणि डान्सिंग शिवा प्रस्तुत मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’ चे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले.  या पोस्टरमध्ये अभिनेत्री स्पृहा जोशी दिसत असून तिचा वेगळा लूक पाहायला मिळत आहे. ‘विक्की वेलिंगकर’ हा मराठी चित्रपट ६ डिसेंबर रोजी होणार प्रदर्शित होणार आहे.

Actress Spruha Joshi in Film 'Vicky Velingkar'
Actress Spruha Joshi in Film ‘Vicky Velingkar’

‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून तो एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते, तिची ही कथा आहे, त्याचबरोबर स्पृहा जोशी या चित्रपटामध्ये विद्या नावाचे पात्र साकारत आहे.  नक्की स्पृहाची भूमिका काय आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना ६ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल’ आहे. ‘मिकी व्हायरस’ आणि ‘7 अवर्स टू गो’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले  दिग्दर्शक सौरभ वर्मा ह्यांनी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

सोनाली कुलकर्णी ही या चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार असून तिच्याबरोबर स्पृहा जोशी देखील या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.  सौरभ वर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती जीसिम्सचे अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार तसेच प्रणय चोकसी, डान्सिंग शिवा प्रॉडक्शनचे अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा आणि लोकीज स्टुडीओचे सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची आहे.

जागतिक पर्यटन दिनी पल्लवी पाटील ने जागवल्या ‘हंपी’ भेटीच्या आठवणी

२७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ‘क्लासमेट्स’ आणि ‘बॉइज’ फेम अभिनेत्री पल्लवी पाटीलने नुकत्याच हंपीला दिलेल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला.

अभिनेत्री पल्लवी पाटील म्हणते, “जगातल्या सर्वोत्तम स्थळांमधलं एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून हंपीची गणना केली जाते. मी आर्किटेक असल्याने ह्या ऐतिहासिक पर्यटन स्थळाला भेट देण्याची इच्छा मला कॉलेजमध्ये असल्यापासून होती. पण ही इच्छा नुकतीच पूर्ण झाली.”

Actress Pallavi Patil
Actress Pallavi Patil

पल्लवी हंपीच्या आठवणी जागवताना म्हणते, “तुंगभद्रा नदीच्या किनारी असलेली सुंदर शिल्पं, मंदिरे पाहताना, त्यांच्यावर केलेलं कोरीव काम बघताना आपल्या प्राचीन संस्कृतीची, कलासौन्दार्याची प्रचीती येते. हंपीमध्ये भटकंती करताना प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा असलेल्या ह्या हंपीच्या सौंदर्याच्या आपण प्रेमात पडतो.”

‘युवा सिंगर एक नंबर’ पहा बॉलीवूड स्टाईल

‘झी युवा’ या वाहिनीवरील ‘युवा सिंगर एक नंबर’ हा गाण्याचा रियालिटी शो प्रेक्षकांमध्ये पसंत पडतोय.
या कार्यक्रमाचे  श्रोते मंत्रमुग्ध होऊन गाण्यांचा आस्वाद घेतात. या मालिकेचे परीक्षक वैभव मांगले हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्याच्या सोबतीने शास्त्रीय संगीत नसानसामध्ये  भरलेली उत्कृष्ट गायिका सावनी शेंडे
परीक्षण करताना आपणस दिसते. हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आणखी एक उत्कृष्ट मेजवानी घेऊन येत आहे.

Vaibhav Mangle,in  Reality show 'Yuva Singer Ek Number'
Vaibhav Mangle,in Reality show ‘Yuva Singer Ek Number’

‘युवा सिंगर’च्या बॉलीवूड स्पेशल आठवड्यात, प्रेक्षकांना उत्तोमोत्तम हिंदी गाणी ऐकण्याची संधी या बुधवारी व गुरुवारी मिळणार आहे. स्पर्धक छानशा रेट्रो कपड्यांमध्ये मंचावर आलेले पाहायला मिळतील. बॉलीवूडची जुनी, गाजलेली गाणी स्पर्धक सादर करतील. या सदाबहार गाण्यांचे सादरीकरण करतांना, स्पर्धकांचा कस लागणार आहे. हा खास भाग अनुभवण्यासाठी दिग्दर्शक संजय जाधव सुद्धा युवा सिंगरच्या मंचावर हजर असतील. परीक्षकांच्या बरोबरीने तेदेखील या विशेष आठवड्याचा आनंद घेताना दिसतील. ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’, ‘ये मेरा दिल, प्यार का दिवाना’,  मेहबुबा, मेहबुबा’ अशी हिंदी चित्रपट सृष्टीतील एव्हरग्रीन गाणी ऐकण्यासाठी ‘झी युवा’वर येत्या बुधवारी आणि गुरुवारी रात्री ९. वाजता पाहायला

कलर्स मराठीवर पहा ‘लक्ष्मी नारायण’ यांचा अलौकिक विवाह सोहळा!

न भूतो न भविष्यति असा हा लक्ष्मीनारायणाचा विवाह सोहळा  “श्री लक्ष्मीनारायण” मालिकेमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे… “श्री लक्ष्मी – नारायण” यांची अद्भुत महागाथा पहिल्यांदाच कलर्स मराठीने प्रेक्षकांच्या भेटीला आणली… ज्यामध्ये प्रेक्षकांना नुकतेच समुद्रमंथन पहायला मिळाले. हे समुद्र मंथन विष्णु आणि लक्ष्मीच्या दृष्टीकोनातून प्रेक्षकांना बघायला मिळाले. नारायण आणि लक्ष्मी यांची भेट व्हावी आणि त्यांचा विवाह संपन्न होण्यासाठी समुद्रमंथन घडून येणे अत्यावश्यक होते.

Laxmi - Narayan Vivah Sohala, on Colors Marathi
Laxmi – Narayan Vivah Sohala, on Colors Marathi

लक्ष्मी नारायण यांचा विवाह विधीयुक्त पार पडणार असून यामध्ये सीमांत पूजन, गौरीहर या विधीसाठी साक्षात महादेव आणि पार्वती विष्णुलोकामध्ये अवतरणार आहेत, तर मंगलाष्टकांसाठी फुलांचा आंतरपाट, फुल- दिव्यांच्या रोषणाईमध्ये सजलेला दरबार आणि मंडप असा दिव्य सोहळा पार पडणार आहे … परंतू, या लग्नात अनेक विघ्ने येणार आहेत.. लक्ष्मी आणि नारायण यांच्या विवाहाच्या अलक्ष्मी मात्र विरोधात आहे. श्री विष्णुशी विवाह करण्याची अलक्ष्मीची असलेली इच्छा तिने व्यक्त देखील करून दाखविली होती, पण ती आता सत्यात उतरणे कठीण आहे हे समजताच अलक्ष्मीचा क्रोध अनावर झाला…  त्यामुळे लक्ष्मी नारायण यांच्या मंगलमय विवाह सोहळ्यामध्ये अलक्ष्मी कुठले विघ्न तर आणार नाही ना ?  हे बघणे रंजक असणार आहे… तेंव्हा नक्की बघा श्री लक्ष्मी – नारायण यांचा अलौकिक विवाह सोहळा २ ऑगस्ट संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

वीणा जगताप आणि रुपाली भोसलेमध्ये रंगणार कॅप्टनसी टास्क

कलर्स मराठीवरील रिअलिटी शो ‘बिग बॉस २’ मधील वीकेंडचा डावमध्ये रुपाली आणि वीणाची चांगलीच शाळा घेतली गेली. यावरूनच वीणाने आपली खंत महेश मांजरेकरांजवळ व्यक्त केलीकारण वीणाला महेश मांजरेकर म्हणाले तू माझी फेव्हरेट सदस्य होती. काल घरामधून कोणीच बाहेर पडले नाही… रुपाली आणि माधव डेंजर झोनमध्ये आले असे सांगितल्यावर वीणा आणि नेहाला जरा टेंशन आले होते खरे पण, महेश मांजरेकर यांनी जेंव्हा जाहीर केले कि, या आठवड्यात सगळे सेफ आहेत तेंव्हा सगळ्यांनाच खुप आनंद झाला. 

Veena Jagtap, Rupali Bhosale, Bigg Boss Marathi
Veena Jagtap, Rupali Bhosale, Bigg Boss Marathi

आज घरामध्ये रुपाली भोसले आणि वीणा जगतापमध्ये कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. घराचा कॅप्टन बनणे हि खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर कॅप्टन बनलेल्या सदस्याला आठवड्याची इम्युनिटी देखील मिळते… त्यामुळे हा टास्क जिंकून कॅप्टन बनणे हे प्रत्येक सदस्यासाठी खूप महत्वाचे असते… आता या टास्कमध्ये रुपाली आणि वीणा मध्ये कोण जिंकणार हे बघणे रंजक असणार आहे.

घरात आता महिलांची मेजोरिटी पहायला मिळतेय . बिग बॉस’च्या घरामध्ये शिवानी सुर्वेची एन्ट्री झाल्यामुळे नेहा आणि माधवला आता धीर मिळाला आहे. तेव्हा येणाऱ्या काळात ‘बिग बॉस’ मधील हा खेळ अधिक होणार हे नक्की. रुपाली आणि वीणाला कोणा कोणाचा पाठींबा मिळणार? ते आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर पहायला मिळेल.

झी युवा वाहिनीवर ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ ही एक अनोखी मालिका

आदेश बांदेकर यांच्या ‘सोहम प्रोडक्शन’ची निर्मिती असलेली हलकी फुलकी मनोरंजक असलेली ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ हि नवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Nikhil Damle, Guari Kulkarni, 'Almost Sufal Sampurna' Marathi serial
Nikhil Damle, Guari Kulkarni, ‘Almost Sufal Sampurna’ Marathi serial

या मालिकेविषयी बोलताना निर्माते आदेश बांदेकर म्हणाले, “मालिका ‘सुफळ संपूर्ण’ होण्यासाठी सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाची गरज आहे. संपूर्ण टीमवर भरभरून प्रेम करा. प्रत्येकचकुटुंबाला ही कथा आपली वाटेल याची खात्री आम्हाला आहे. ‘सोहम प्रोडक्शन’ने नेहमीच रसिकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. ‘झी युवा’वरील ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेच्या माध्यमातूनसुद्धा आमचा हाच प्रयत्न असेल. आपलं प्रेम आणि आशीर्वाद सदैव सोबत असतील अशी मी अपेक्षा करतो.”

‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ ही नवी मालिका १५ जुलैपासून सोमवार ते शनिवार, रात्री ८ वाजता, ‘झी युवा’वर पाहता येईल.

माधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”

charudatta-deochake-madhav-deochake
“फादर्स डे”
 निमित्ताने बिग बॉस मराठीच्या घरात असलेल्या अभिनेता माधव देवचकेचे वडील चारूदत्त देवचके ह्यांच्याशी संवाद साधला असता  ते म्हणाले, “लहानपणापासूनच माधवमध्ये समंजसपणा आम्हांला दिसून आलाय. ब-याचदा मुलांची ओळख त्यांच्या वडिलांमूळे असते. पण माझी ओळख माधवच्या लहानपणापासूनच ‘माधवचे वडिल’ अशी होती. मी नाट्यनिर्माता असल्यामूळे माझ्या ओळखीचा फायदा माधवला करीयरमध्ये कधी ना कधी व्हावा, अशी माझी इच्छा होती. पण माधवने कुठेही माझी ओळख न वापरता स्वत:च्या ताकदीवर आपलं करीयर घडवलं, याचा मला अभिमान आहे. अभिनेत्याच्या करीयरमध्ये ब-याचदा आर्थिक उतार-चढाव होत असतात, पण अशावेळेसही मी देऊ केलेली मदत स्वावलंबी माधवने स्विकारली नाही.”

 बिग बॉसमध्ये माधव खूप चांगलं खेळतोय. असे मत व्यक्त करून त्यांनी माधवला शुभेच्छा  दिल्यात.