Tag Archives: मराठी

ऑनलाईन लग्नाची सुपरफाईन गोष्ट – ‘शुभमंगल ऑनलाईन’ कलर्स मराठीवर

आपल्या संस्कृतीत जीवन म्हणजे अनंत उत्सवांनी नटलेला सोहळा आणि त्यामधील आनंदाचा परमोच्च क्षण म्हणजे ‘लग्न सोहळा’! सगळ्यांच्याच आयुष्यातील अविभाज्य भाग. त्यात लगीनघाई म्हणजे आपल्याकडे जिव्हाळ्याचा विषय. पण, सद्यस्थिति लक्षात घेता तरुण पिढी काय तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील डिजिटलचे महत्व काही औरच होऊनं बसले आहे.

Suyash Tilak, Sayali Pankaj in 'Shubh Mangal Online' Marathi Serial
Suyash Tilak, Sayali Pankaj in ‘Shubh Mangal Online’ Marathi Serial

शंतनू आणि शर्वरीचे व्हिडिओ कॉलवर भेटीगाठी, बोलण सुरू झालं आणि या दोघांचे हे गोड नातं ऑनलाईनच हळूहळू फुलू लागलं… यानंतर रंगलेला लॉकडाउन दरम्यानचा ऑनलाईन लग्नसोहळा आणि ऑनलाईन लग्नाची तारेवरची कसरत म्हणजे कलर्स मराठीवरील नवीन मालिका ‘शुभमंगल ऑनलाईन’. मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अशाप्रकारचा लग्नसोहळा रसिक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.  शंतनू आणि शर्वरीचा हा ऑनलाईन लग्न सोहळा कसा पार पडेल ? काय गंमती जमती होतील ? हे बघण्यासाठी तुम्ही देखील सहभागी व्हा या न्यू नॉर्मल, आगळया वेगळ्या लगीनघाईमध्ये… सुबोध भावे (कान्हाज् मॅजिक) निर्मित आणि वैभव चिंचाळकर दिग्दर्शित ‘शुभमंगल ऑनलाईन’ कलर्स मराठीवर २८ सप्टेंबरपासून रात्री ९.३० वा. सुरू होत आहे .

अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या सुकन्या कुलकर्णी – मोने, अमिता खोपकर, सायली संजीव, सुयश टिळक, आनंद इंगळे, मिलिंद फाटक, अंकिता पनवेलकर या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

२८ सप्टेंबरपासून ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिका रात्री १०.०० वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिध्दीचा वाढदिवस थाटामाटात साजरा

'Jiv Zala Yeda Pisa' Marathi Serial, Siddhi Birthday Celebration
‘Jiv Zala Yeda Pisa’ Marathi Serial, Siddhi Birthday Celebration

‘जीव झाला येडापिसा’ मालिकेमध्ये बर्‍याच घटना बघायला मिळत आहे. आत्याबाईंनी शिवाशी धरलेला अबोला कायम आहे. तर मालिकेमध्ये चंपा नावाचे नवे पात्र आल्याने एक वेगळीच कलाटणी मिळणार आहे असे दिसून येत आहे . हिच्या येण्याने सिद्धी – शिवाच्या आयुष्यात कोणते नवे वादळ येणार? हे कळेलच. हे सगळे घडत असतानाच शिवाच्या सोबतीने संपूर्ण कुटुंब सिद्धीला एक गोड सरप्राईझ देणार आहेत. लष्करे कुटुंबात आपल्या लाडक्या सिद्धीचा वाढदिवस थाटामाटात साजरा होणार आहे .

शिवा चंपाला लष्करेंच्या जेंव्हा घरी आणतो तेंव्हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो ही बाई नक्की कोण आहे ? आणि तिचा आत्याबाईंशी नक्की काय संबंध आहे. पण जेंव्हा सिद्धी या विषयाच्या खोलात जाते तेंव्हा शिवा तिला बाजावून सांगतो आत्याबाई ते बघून घेतील आपला याच्याशी काही एक संबंध नाही आहे. सिद्धी आणि मंगल या दोघींच्या मनात हाच प्रश्न आहे. सिद्धी या संदर्भात जलवाशी देखील बोलते. चंपाचे अचानक रुद्रायतमध्ये येण्याचे कारण काय आहे ? यामागे नक्की कोणत गूढ आहे ? हे सिध्दीला कळेल ? चंपा आत्याबाईंकडून बोलता बोलता सगळं सत्य काढून घेते ज्यामध्ये तिला कळते सरकार आत्याबाईंचा मुलगा नाहीये. अजून पुढे मालिकेमध्ये काय होईल ?
बघत रहा जीव झाला येडापिसा रात्री ८.०० वा. कलर्स मराठीवर.

मराठी चित्रपट ‘विकून टाक’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर

सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येते. १६ ऑगस्टला सोनी मराठी वाहिनीवर ‘विकून टाक’ या विनोदी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर होणार आहे. विनोदातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. शिवराज वायचळ, रोहित माने, राधा सागर, समीर चौघुले, ऋजुता देशमुख, हृषीकेश जोशी, जयवंत वाडकर, वर्षा दांदले आणि चंकी पांडे यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात आहेत.

'Vikun Tak' Movie, Hrishikesh Joshi, chunky pandey, Comedy Movie, on Sony Marathi
‘Vikun Tak’ Movie, Hrishikesh Joshi, chunky pandey, Comedy Movie, on Sony Marathi

‘विकून टाक’ या चित्रपटात चंकी पांडे यांची एक विनोदी भूमिका असून ते एका शेखची व्यक्तिरेखा साकारत आहेत. गेली अनेक वर्षं चंकी पांडे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत विविध व्यक्तिरेखा साकारून नावलौकिक मिळवला आहे. चंकी पांडे यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

‘सोनी मराठी’ वाहिनीवर १६ ऑगस्ट, रविवारी चंकी पांडे यांचा पहिला मराठी चित्रपट ‘विकून टाक’ या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वा. होणार आहे.

‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेमध्ये संग्राम समेळची एंट्री

‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेमधील अनु – सिद्धार्थची केमिस्ट्री पुन्हाएकदा नव्याने प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. त्यांच निस्वार्थी नात, एकमेकांनमधील विश्वास आणि प्रेम, तसेच एकमेकांच्या मिळालेल्या खंबीर साथीमुळे संकटावर त्यांनी केलेली मात. हे सगळ एकदा पुन्हा अनुभवता येणार आहे नव्या घटनासोबत. अनु – सिद्धार्थच्या आयुष्यात गोड बातमी येता येता राहून गेली. अनुसमोर सत्य आले की ती कधीच आई होऊ शक्त नाही आणि यामध्ये आता अनुच्या मनात पुन्हा मातृत्वाची भावना जागवण्यासाठी सिद्धार्थ प्रयत्न करतो आहे.  हे सगळं सुरू असतानाच आता तत्ववादी कुटुंबात अजून एका सदस्याची एंट्री झाली आहे आणि ती म्हणजे सम्राट तत्ववादी. सम्राटची भूमिका संग्राम समेळ साकारत आहे..

Samgram Samle, sukhachya sarini he man baware Cast, Actress
Samgram Samle, sukhachya sarini he man baware Cast, Actress

सम्राटने अनु – सिद्धार्थ आणि संपूर्ण तत्ववादी कुटुंबाला एक धक्का दिला जेंव्हा त्याने सान्वीची ओळख त्याची बायको म्हणून करून दिली..सान्वी आणि सम्राटच्या येण्याने आता मालिकेमध्ये पुढे काय बघायला मिळणार आहे ? सान्वी बदली आहे का ? कुठली नवी खेळी ती खेळणार आहे ? अनु – सिद्धार्थ तिच्यावर पुन्हा विश्वास ठेऊ शकतील ? हे बघणे रंजक असणार आहे.

भूमिकेविषयी बोलताना संग्राम समेळ म्हणाला, “मला खूप वर्षांपासून मंदार देवस्थळी यांच्यासोबत काम करायची इच्छा होती… त्यांची काम करण्याची पध्दत अप्रतिम आहे. आणि ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेद्वारे ती संधी मिळाली. लॉकडाउननंतर चांगली सुरुवात आहे, चांगल काम करण्याचा प्रयत्न आहे आणि आशा आहे रसिक प्रेक्षकांना ते आवडेल”.

तेंव्हा बघायला विसरू नका बघा ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ सोम ते शनि रात्री ९.०० वा. कलर्स मराठीवर.

‘चला हवा येऊ द्या’ नंतर निलेश साबळे दिसणार ‘लाव रे तो विडिओ’ या कार्यक्रमात

 ‘झी युवा’वाहिनी आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहे, एक नवाकोरा, जबरदस्त टैलेंट ने भरलेला  कार्यक्रम, ‘लाव रे तो विडिओ’ .  या नव्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आहेत अवघ्या महाराष्ट्राचे लाडके संयोजक डॉ. निलेश साबळे. महत्वाचे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र  या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो. घरबसल्या, अवघ्या महाराष्ट्राचे मनोरंजन करण्याची संधी, ‘झी युवा’मुळे महाराष्ट्रातील असंख्य कलाकारांना  मिळणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या अप्रतिम कार्यक्रमाचे सूत्रधार, डॉक्टर निलेश साबळे, आता ‘झी युवा’ वाहिनीवर सुद्धा, कल्ला करण्यासाठी सज्ज झाले  आहेत. अवघ्या महाराष्ट्राचं मनोरंजन करू शकेल, सगळ्यांना पोट धरून हसायला लावेल, असं टॅलेंटचा सध्या शोध सुरु आहे . पण या कार्यक्रमाच आणखी एक खास सरप्राईज सुद्धा आहे . डॉ . नीलेश साबळेंबरोबर आणखी एक सेलिब्रिटी प्रत्येक भागात सहभागी होणार आहे. आणि तुमचे टैलेंट वर त्यांची आवड निवड सांगणार आहेत .

Actor, writer, director, Dr Nilesh Sable
Actor, writer, director, Dr Nilesh Sable

लॉकडाऊनमुळे आलेली मरगळ, कंटाळा, वैताग या सगळ्या गोष्टींवर मात करून खळखळून हसण्यासाठी, आता आपल्याला सगळ्यांना सज्ज व्हायचं आहे. ‘लाव रे तो विडिओ’ या कार्यक्रमातून, महाराष्ट्रातील लोकांचे छुपे टॅलेंट जे आजवर केवळ मोबाईल किंवा इंटरनेट वर अड्कले होते आता लाखो करोडो लोकानां  टीव्हीवर पहायला मिळेल आणि संपूर्ण महाराष्ट्राचे  हमखास मनोरंजन होईल. एक आगळीवेगळी संकल्पना, प्रेक्षकांचा स्पर्धक म्हणून थेट सहभाग यामुळे, या कार्यक्रमाची रंगत अधिक  वाढणार आहे.

ज्येष्ठ दिग्दर्शक कांचन नायक यांच निधन

‘कळत नकळत’ ह्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक कांचन नायक  ह्यांचे आज पुण्यात प्रदीर्घ आजाराने निधन झाले.  कौटुंबिक, भावनात्मक कथा हळुवार पद्धतीने हाताळणारा दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती.   कांचन नायक हे यांनी गेली साडेचार ते पाच दशके चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. जब्बार पटेल, राजदत्त, प्रभाकर नायक, दिनकर डी पाटील अश्या मराठी चित्रपटसृष्टीतील मोठं-मोठी ख्यातनाम दिग्दर्शकांसोबतही त्यांनी काम केलं होतं. चित्रपटांसोबतच त्यांनी अनेक उत्तमोत्तम मालिका व माहितीपटांचंही दिग्दर्शन केलं आहे.

Kanchan Nayak, Director
Kanchan Nayak, Director

भावनाप्रधान चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणारे कांचन नायक यांनी भोजपुरी भाषेतला ‘पिंजडेवाली मुनिया’‘दणक्यावर दणका’ असे विनोदी विषयही चित्रपटाचे दिग्दर्शन करताना लीलया हाताळले. शं.ना. नवरे यांच्या कथेवर केलेली टेलिफिल्म ‘त्या तिथे पलीकडे’ हा नर्मविनोदाचा एक उत्तम नमुना आहे. कांचन नायक ह्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘राजू’ या संगीतमय चित्रपटाने रौप्यमहोत्सवाबरोबर राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या तिसऱ्या पारितोषिकासह एकूण सात पारितोषिके पटकावली होती.

‘नेक्स्ट स्टेप’ या अनोख्या उपक्रमाअंतर्गत नवोदित कलाकारांना मार्गदर्शन 

टेलिव्हिजन आणि सिनेमाक्षेत्रात प्रवेश करू पाहणाऱ्या नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी,  जयंत पवार यांनी  ‘नेक्स्ट स्टेप’ हा अनोखा उपक्रम आयोजिला आहे.  ह्या क्षेत्रात काम कराचे असेल तर फक्त अभिनय असणे गरजेचं नसून त्या बरोबर अनेक तांत्रिक बाबींचा सुद्धा अभ्यास असणे गरजेचा असतो. ह्या वेबिनार मध्ये, प्रत्यक्षात कॅमेऱ्या समोर उतरल्यावर नक्की काय करायचं? मोबाईल कॅमेरा आणि फिल्म कॅमेरा यात फरक असतो? या आणि अशा अनेक गोष्टींबद्दल जाणत्या, अनुभवी दिग्गजांकडून जाणून घ्यायला मिळणार आहेत.

'Next Step' Online Webinar
‘Next Step’ Online Webinar

 

स्वरूप रिक्रिएशन्स अँड मीडिया  प्रा.लि. ने आजवर अनेक मराठी चित्रपटांची, नाटकांची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे.  त्यांच्या द्वारे ३१ मे  ते ६ जून या कालावधीत ‘नेक्स्ट स्टेप’   ह्या वेबमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या वेबमिनार मध्ये अभिनेता प्रसाद ओक, कॅमेरामन वासुदेव राणे,दिग्दर्शक मंदार देवस्थळी, दिग्दर्शक गिरीश  मोहिते, असे अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. वेबमिनारच्या अधिक माहितीसाठी ९००४७८८५७२ या क्रमांकावर संपर्क साधावा

अभिनेत्री अदिती येवले सोशल मीडियाच्या माध्यमातून सादतीये संवाद

सध्या लॉकडाऊन मुळे चित्रपट व्यवसाय ठप्प आहे. चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण देखील थांबले आहे, अनेक हिंदी, मराठी कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांच्या संपर्कात राहताना आपल्याला दिसतायेत. कुणी योगा करतानाचे आपले फोटो शेअर करताना  दिसतायेत तर कुणी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपले जुने फोटो शेअर करताना दिसतायेत.

Actress Aditi Yewale Jadhav
Actress Aditi Yewale Jadhav

‘रुंजी’,एक नंबर’, ‘कुलस्वामिनी’ अश्या अनेक मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अदिती येवले देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी  संवाद सादतीये, विविध पदार्थांच्या रेसिपी ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून चाहत्यांना शेअर करताना दिसते. अभिनयाबरोबरच तिला विविध रेसिपी बनवायला आवडतात.

‘वेलकम जिंदगी’, ‘विकून टाक’, ‘नेबर्स’ अश्या चित्रपटांमधून देखील तिने आजवर महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मराठी कलाकार एकत्र येऊन म्हणताय ‘पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ’

इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधितांची सध्या संख्या कमी असली तरीदेखील हा आकडावाढतच चालला आहे, याचा परिणाम म्हणून अनेकांच्या मनामद्धे नकारात्मकता वाढत आहे. याच धर्तीवर लोकांमध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी अनेक  मराठी कलाकारांनी एकत्र येऊन ‘पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ’ हे प्रेरणादायी गाणं तयार केले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.   या गाण्याचे ध्वनिमुद्रण आणि चित्रीकरण हे दोन्ही सर्व मराठी कलाकार घरातून मोबाईलच्या साहाय्याने केले असून, तांत्रिक बाबींच्या साहाय्याने शक्य तितकं स्टुडिओ ध्वनिमुद्रणाच्या बरोबरीचं करण्याचा प्रयत्न केला आहे.

दीपाली सय्यद, मनोज जोशी, किशोरी शहाणे, मकरंद अनासपुरे, रेणुका शहाणे, शिल्पा अनासपुरे, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, शरद पोंक्षे, वर्षा उसगावकर, मानसी नाईक, गायत्री दातार, नितीश चव्हाण, स्मिता शेवाळे, देवदत्त नागे, किरण गायकवाड
दीपाली सय्यद, मनोज जोशी, किशोरी शहाणे, मकरंद अनासपुरे, रेणुका शहाणे, शिल्पा अनासपुरे, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, शरद पोंक्षे, वर्षा उसगावकर, मानसी नाईक, गायत्री दातार, नितीश चव्हाण, स्मिता शेवाळे, देवदत्त नागे, किरण गायकवाड

.

‘पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ’  या गाण्यात आपल्याला दीपाली सय्यद, मनोज जोशी, किशोरी शहाणे, मकरंद अनासपुरे, रेणुका शहाणे, शिल्पा अनासपुरे, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, शरद पोंक्षे, वर्षा उसगावकर, मानसी नाईक, गायत्री दातार, नितीश चव्हाण, स्मिता शेवाळे, देवदत्त नागे, किरण गायकवाड असे कलाकार एकत्र दिसतात. गाण्याचे दिग्दर्शन व संकलन मकरंद शिंदे यांनी केले असून, संगीत जीवन मराठे यांनी दिले आहे.

गाण्याची संकल्पना अभिनेत्री दीपाली सय्यद यांची असून हे गाणं रसिकांसमोर आणण्यासाठी श्रीनिवास कुलकर्णी, अमोल घोडके, राजेंद्र अनासपुरे यांनी पुढाकार घेतला.

‘जय जय महाराष्ट्र माझा’ मधून महाराष्ट्राच्या शिलेदारांना मानवंदना

विविध कलागुणांनी संपन्न अशा महाराष्ट्राचे हे कलागुण अंगी जपत जगभरात महाराष्ट्राचा झेंडा उंच फडकवणाऱ्या शिलेदारांना समर्पित आहे, या आठवड्यातील जय जय महाराष्ट्र माझा’चा विशेष भाग. या भागात आपल्यातील कलागुणांना खतपाणी घालून महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार्या कलाकारांना सलाम केला जाणार आहे. याशिलेदारांमध्ये दादा कोंडके, आशा भोसले, भालजी पेंढारकर, स्मिता पाटील, अरूण दाते, लक्ष्मण देशपांडे, व्ही शांताराम आणि सुरेश वाडकरांसारख्या दिग्गजांच्या कलाकृतींचं सादरीकरण होणार आहे.

Subodh Bhave in 'Jai Jai Maharashtra Maza' on Sony Marathi
Subodh Bhave in ‘Jai Jai Maharashtra Maza’ on Sony Marathi

मराठी सिनेमांमध्ये या सगळ्यांचं योगदान अपार आहे. या सिनेमांमधील नभ उतरू आलं, आला आला वारा, झुंजुर मुंजुर, भातुकली, या जन्मावर, आधा है चंद्रमा सारख्या गाण्यांतून यांच्या कारकीर्दीला सलाम केला जाईल. त्यांशिवाय दादा कोंडकेंच्या विच्छा माझी पुरी करा तर नाट्यकर्मी लक्ष्मण देशपांडेच्या वऱ्हाड निघाले लंडनलाचं सादरीकरण या भागात होईल. मराठी सिनेसृष्टीला भरभरून दिलेल्या या मंडळींच्या कलाकृतींनी नटलेला असेल, ‘जय जय महारष्ट्र माझा’चा हा भाग येत्या २३ आणि २४ मार्च ला  सोनी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे