Tag Archives: Colors Marathi

जगाची सावली, माझी स्वामीराज माऊली- ‘जय जय स्वामी समर्थ’ कलर्स मराठीवर!

‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ किंवा ‘अशक्यही शक्य करतील स्वामी” हा अमृतमय संदेश देणाऱ्या असाधारण सिध्दपुरुषाचे, ‘श्री स्वामी समर्थां’चे जीवनचरित्र जय जय स्वामी समर्थ‘ या कलर्स मराठीवरील नवीन मराठी मालिकेद्वारे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

Jay Jay Swami Samarth, Marathi Serial
Jay Jay Swami Samarth, Marathi Serial

 आपल्या भवतालच्या प्रत्येक गोष्टीत परमेश्वर आहेपरमेश्वराच नाव घेत स्वत: परमेश्वर व्हा असे सांगणारे थोर सिद्धपुरुष अठराव्या शतकात होऊन गेले ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. गाणगापुराचे नृसिंह सरस्वती कर्दळीवनात गुप्त झाल्यानंतर तब्बल ३०० वर्षांचा काळ उलटला आणि एक दिवस कर्दळीवनात लाकडं तोडणार्‍या एका इसमाच्या हातून कुर्‍हाड निसटली आणि तिथल्या वारुळावर पडली. तिथून रक्ताची धार लागली आणि अडसर दूर केल्यानंतर श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. इथून खर्‍या अर्थाने प्रवास सुरू झाला.  श्री स्वामी समर्थ यांनी भारतभर भ्रमण केले. त्यांचे अनुयायी आज संपूर्ण भारतभर नाही तर जगभर पसरलेले आहेत. हिमालयभारत – चीन सीमाकाशीत्रिविक्रम सरोवर असे भ्रमण करून ते अक्कलकोट येथे स्थिरावले. स्वामी समर्थ यांचं शेकडो वर्षांचं वास्तव्यसुरस लीला आणि उपदेश यांनी भरलेली कथा असामान्य आणि प्रेरणादायी आहे.

 

 अन्यायाला मोडीत काढत आणि मार्गातल्या असंख्य लोकांचा उध्दार करीतत्यांना उपदेश करीत स्वामी समर्थ कसे सोलापूर येथील अक्कलकोट येथे पोहचले. कशी लोकांना त्यांच्या महानतेची प्रचिती येत गेलीअक्कलकोट येथील चोळप्पाशीसेवेकरी सुंदराबाईअक्कलकोटचे राजे मालोजीरावया भक्तांनी स्वामीलीला अनुभवली आणि कृतार्थ झाले त्यांचे कसे नाते होते आणि या मार्गात आणखी कोणकोणती माणसं श्री स्वामी समर्थांच्या मार्गात आली हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेमध्ये बघयाला मिळणार आहे. अक्कलकोट येथे स्वामींच्या वास्तव्याने वटवृक्षाखाली दोन दशके चैतन्य ऊर्जा नांदली ती कशी हे देखील ‘ जय जय स्वामी समर्थ’ ह्या मालिकेतून ,  २८ डिसेंबरपासून सोम ते शनि संध्या. ९.३० वा. कलर्स मराठीवर  प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

ऑनलाईन लग्नाची सुपरफाईन गोष्ट – ‘शुभमंगल ऑनलाईन’ कलर्स मराठीवर

आपल्या संस्कृतीत जीवन म्हणजे अनंत उत्सवांनी नटलेला सोहळा आणि त्यामधील आनंदाचा परमोच्च क्षण म्हणजे ‘लग्न सोहळा’! सगळ्यांच्याच आयुष्यातील अविभाज्य भाग. त्यात लगीनघाई म्हणजे आपल्याकडे जिव्हाळ्याचा विषय. पण, सद्यस्थिति लक्षात घेता तरुण पिढी काय तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील डिजिटलचे महत्व काही औरच होऊनं बसले आहे.

Suyash Tilak, Sayali Pankaj in 'Shubh Mangal Online' Marathi Serial
Suyash Tilak, Sayali Pankaj in ‘Shubh Mangal Online’ Marathi Serial

शंतनू आणि शर्वरीचे व्हिडिओ कॉलवर भेटीगाठी, बोलण सुरू झालं आणि या दोघांचे हे गोड नातं ऑनलाईनच हळूहळू फुलू लागलं… यानंतर रंगलेला लॉकडाउन दरम्यानचा ऑनलाईन लग्नसोहळा आणि ऑनलाईन लग्नाची तारेवरची कसरत म्हणजे कलर्स मराठीवरील नवीन मालिका ‘शुभमंगल ऑनलाईन’. मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अशाप्रकारचा लग्नसोहळा रसिक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.  शंतनू आणि शर्वरीचा हा ऑनलाईन लग्न सोहळा कसा पार पडेल ? काय गंमती जमती होतील ? हे बघण्यासाठी तुम्ही देखील सहभागी व्हा या न्यू नॉर्मल, आगळया वेगळ्या लगीनघाईमध्ये… सुबोध भावे (कान्हाज् मॅजिक) निर्मित आणि वैभव चिंचाळकर दिग्दर्शित ‘शुभमंगल ऑनलाईन’ कलर्स मराठीवर २८ सप्टेंबरपासून रात्री ९.३० वा. सुरू होत आहे .

अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या सुकन्या कुलकर्णी – मोने, अमिता खोपकर, सायली संजीव, सुयश टिळक, आनंद इंगळे, मिलिंद फाटक, अंकिता पनवेलकर या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

२८ सप्टेंबरपासून ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिका रात्री १०.०० वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिध्दीचा वाढदिवस थाटामाटात साजरा

'Jiv Zala Yeda Pisa' Marathi Serial, Siddhi Birthday Celebration
‘Jiv Zala Yeda Pisa’ Marathi Serial, Siddhi Birthday Celebration

‘जीव झाला येडापिसा’ मालिकेमध्ये बर्‍याच घटना बघायला मिळत आहे. आत्याबाईंनी शिवाशी धरलेला अबोला कायम आहे. तर मालिकेमध्ये चंपा नावाचे नवे पात्र आल्याने एक वेगळीच कलाटणी मिळणार आहे असे दिसून येत आहे . हिच्या येण्याने सिद्धी – शिवाच्या आयुष्यात कोणते नवे वादळ येणार? हे कळेलच. हे सगळे घडत असतानाच शिवाच्या सोबतीने संपूर्ण कुटुंब सिद्धीला एक गोड सरप्राईझ देणार आहेत. लष्करे कुटुंबात आपल्या लाडक्या सिद्धीचा वाढदिवस थाटामाटात साजरा होणार आहे .

शिवा चंपाला लष्करेंच्या जेंव्हा घरी आणतो तेंव्हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो ही बाई नक्की कोण आहे ? आणि तिचा आत्याबाईंशी नक्की काय संबंध आहे. पण जेंव्हा सिद्धी या विषयाच्या खोलात जाते तेंव्हा शिवा तिला बाजावून सांगतो आत्याबाई ते बघून घेतील आपला याच्याशी काही एक संबंध नाही आहे. सिद्धी आणि मंगल या दोघींच्या मनात हाच प्रश्न आहे. सिद्धी या संदर्भात जलवाशी देखील बोलते. चंपाचे अचानक रुद्रायतमध्ये येण्याचे कारण काय आहे ? यामागे नक्की कोणत गूढ आहे ? हे सिध्दीला कळेल ? चंपा आत्याबाईंकडून बोलता बोलता सगळं सत्य काढून घेते ज्यामध्ये तिला कळते सरकार आत्याबाईंचा मुलगा नाहीये. अजून पुढे मालिकेमध्ये काय होईल ?
बघत रहा जीव झाला येडापिसा रात्री ८.०० वा. कलर्स मराठीवर.

‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेमध्ये संग्राम समेळची एंट्री

‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेमधील अनु – सिद्धार्थची केमिस्ट्री पुन्हाएकदा नव्याने प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. त्यांच निस्वार्थी नात, एकमेकांनमधील विश्वास आणि प्रेम, तसेच एकमेकांच्या मिळालेल्या खंबीर साथीमुळे संकटावर त्यांनी केलेली मात. हे सगळ एकदा पुन्हा अनुभवता येणार आहे नव्या घटनासोबत. अनु – सिद्धार्थच्या आयुष्यात गोड बातमी येता येता राहून गेली. अनुसमोर सत्य आले की ती कधीच आई होऊ शक्त नाही आणि यामध्ये आता अनुच्या मनात पुन्हा मातृत्वाची भावना जागवण्यासाठी सिद्धार्थ प्रयत्न करतो आहे.  हे सगळं सुरू असतानाच आता तत्ववादी कुटुंबात अजून एका सदस्याची एंट्री झाली आहे आणि ती म्हणजे सम्राट तत्ववादी. सम्राटची भूमिका संग्राम समेळ साकारत आहे..

Samgram Samle, sukhachya sarini he man baware Cast, Actress
Samgram Samle, sukhachya sarini he man baware Cast, Actress

सम्राटने अनु – सिद्धार्थ आणि संपूर्ण तत्ववादी कुटुंबाला एक धक्का दिला जेंव्हा त्याने सान्वीची ओळख त्याची बायको म्हणून करून दिली..सान्वी आणि सम्राटच्या येण्याने आता मालिकेमध्ये पुढे काय बघायला मिळणार आहे ? सान्वी बदली आहे का ? कुठली नवी खेळी ती खेळणार आहे ? अनु – सिद्धार्थ तिच्यावर पुन्हा विश्वास ठेऊ शकतील ? हे बघणे रंजक असणार आहे.

भूमिकेविषयी बोलताना संग्राम समेळ म्हणाला, “मला खूप वर्षांपासून मंदार देवस्थळी यांच्यासोबत काम करायची इच्छा होती… त्यांची काम करण्याची पध्दत अप्रतिम आहे. आणि ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेद्वारे ती संधी मिळाली. लॉकडाउननंतर चांगली सुरुवात आहे, चांगल काम करण्याचा प्रयत्न आहे आणि आशा आहे रसिक प्रेक्षकांना ते आवडेल”.

तेंव्हा बघायला विसरू नका बघा ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ सोम ते शनि रात्री ९.०० वा. कलर्स मराठीवर.

कलर्स मराठीवर ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेच्या विशेष भाग

गेलं वर्षभर अवघ्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ह्या मालिकेने ५०० भागांचा यशस्वी टप्पा पार केलाय. या मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. संत देवतावतारी बाळूमामा या नावच एक वेगळंच वलय आहे. याच थोर संताची कथा कलर्स मराठी वाहिनीच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रासमोर मांडण्याचं शिवधनुष्य उचललं संतोष अयाचित यांनी. ५०० भागाचा उत्सवपर्वचा हाच आनंदमयी सोहळा येत्या रविवारी म्हणजेच १ मार्च रोजी संध्या ७ वा. पासून आपल्या कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे

'Balumamachya Navan Changbhal' Marathi Serial
‘Balumamachya Navan Changbhal’ Marathi Serial

बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेच्या शीर्षक गीताने विशेष भागाची सुरुवात झाली आणि संपूर्ण वातावरण एकाएकी भक्तिमय झाले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या सगळ्यांच्या लाडक्या तात्याच्या भूमिकेतील अक्षय टाक यांनी केले ज्याने कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली.  हा उत्सव मोठ्या जल्लोषात आणि बाळूमामांच्या जयघोषात पार पडला यात शंका नाही. प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जाणारे बाळूमामा त्यांच्या लहानश्या भक्ताचा जीव कसा वाचवणार हे देखील बघायला मिळणार आहे.

‘जीव झाला येडापिसा': शिवादादा आणि सिद्धीमध्ये लवकरच फुलणार प्रेम!

कलर्स मराठीवरील ‘जीव झाला येडापिसा’ या लोकप्रिय  मालिकेमध्ये गौरवच्या परत येण्याने सिद्धी आणि शिवामध्ये दुरावा आला, भांडण झाली… दोघांमध्ये बरेच गैरसमज देखील झाले पण, प्रेमात खूप ताकद असते ते अगदी खरे आहे… याच प्रेमामुळे गौरवचं सत्य शिवासमोर आला आणि आता लवकरच शिवा गौरवचा खरा चेहरा सिध्दीसमोर आणणार आहे. शिवाला हे सत्य कसे कळाले ? तो सिध्दीसमोर ते कसे आणणार ? हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे.

Vidula Chougule, Ashok Phal Dessai in 'Jeev Jhala Yeda Pisa'
Vidula Chougule, Ashok Phal Dessai in ‘Jeev Jhala Yeda Pisa’

शिवाने सिद्धीसमोर गौरवचे पितळ उघडे करताच आणि त्याचा अश्या वागण्यामागचा हेतु कळताच सिध्दीला राग अनावर झाला… आणि ती गौरवच्या सणसणीत कानाखाली मारते. सिद्धी गौरवला त्यांच्या आयुष्यातून निघून जाण्यास सांगते इतकेच नसून तुझ्यावर प्रेम केले याची मला लाज वाटते, माझ्या मनामध्ये फक्त शिवा आहे आणि शेवटपर्यंत तोच राहील असे देखील त्याला बाजावून सांगते… सिद्धीचे मन शिवाने कधीच जिंकले आहे, आणि तिचे त्याच्यावर प्रेमदेखील आहे याची कबुली तिने दिली आहे…

येत्या आठवड्यामध्ये ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेत  शिवादादा आणि सिद्धीमध्ये प्रेम फुलताना पहायला  मिळणार आहे

‘सूर नवा ध्यास नवा’ च्या ‘बालदिन विशेष’ भागात गाणार मॉनिटर म्हणजेच हर्षद नायबळ

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रम सुर झाल्यापासून सुरवीर सादर करत असलेली गाण्यांना प्रेक्षकांच्या विशेष पंसतीस पडत आहेत. ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाच्या ‘बालदिन विशेष’ भागानिमित्त मॉनिटर म्हणजेच हर्षद नायबळ पुन्हा एकदा सूर नवाच्या मंचावर येणार आहे.  मॉनिटर सोबतच अंशिका, चैतन्य, सई हे छोटे सुरवीर देखील येणार आहेत. मंचावर थोडी मस्ती, थोडी कल्ला पुन्हा होणार आहे, स्पृहा आणि मॉनिटरची धम्माल मस्ती बघायला मिळणार आहे.

Spruha Joshi, Harshad Naybal (Monitor), 'Sur Nava Dyas Nava'
Spruha Joshi, Harshad Naybal (Monitor), ‘Sur Nava Dyas Nava’

आपल्या सगळ्यांचा लाडका मॉनिटर आता शाळेमध्ये जायला लागला आहे. त्यामुळे त्याचे शाळेतले काही किस्से मस्ती आपल्याला सांगणार आहे तसेच मॉनिटर बम बम बोले हे देखील गाणे सादर करणार आहे. आपल्या सगळ्यांच्याच बालपणीच्या काही आठवणी आहेत ज्या आपण विसरलो नाहीये.महेश काळे आणि अवधूत गुप्ते अश्याच काही आठवणी सांगणार आहेत. बालदिनानिमित्त आलेले छोटे सुरवीर त्यांची काही गाणी सादर करणार आहेत.

तेंव्हा नक्की बघा कलर्स मराठी ह्या वाहिनीवर  ‘सूर नवा ध्यास नवा’ चा ‘बालदिन विशेष’ भाग आपल्या लाडक्या मॉनिटरसोबत ह्या आठवड्यामध्ये सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वा.

Jitendra Joshi to present talk show ‘Don Special’ on Colors Marathi

Television Talk shows have always invited attention of the home viewers, especially in Marathi. And the reason is simple. People would always like to know the frank opinion expressed by the guest invitees in such shows. But, it is equally important to have the proper host, who should be able to extract the best from such celebrities. Jitendra Joshi, known for his frank and humour filled chat , he  will be hosting one such show ‘Don Special’, which will be telecast every Thursday and Friday at 9.30 pm on Colors Marathi channel.

Sumeet Raghavan, Subodh Bhave, Jitendra Joshi, '2 Special'
Sumeet Raghavan, Subodh Bhave, Jitendra Joshi, ‘2 Special’

Many renowned celebrities from Marathi stage, television and films will be part of this show and the very first episode will present Subodh Bhave and Sumeet Raghavan together. So, you can imagine, how Jitendra will handle them to speak out their frank opinion on different subjects. In the subsequent episodes there will be pairs like Guru Thakur- Kishore kadam, followed by participants from Big Boss-2 season and others.

Speaking about his show, Jitendra said,“The celebrities invited in this show will be all known celebrities in Marathi. And this programme will try to extract from them what the people are not aware. This being my programme, there will not be any kind of pretended show, but there will be more freedom offered to the guests.:

Is Neha Shitole moving close to winning ‘Big Boss 2’?

Bigg boss Marathi Contestant Neha Shitole
Bigg boss Marathi Contestant Neha Shitole

To think about Neha Shitole and a frank fiery character of a young woman comes before your eyes. So much has been her strength through every important character she has  played on television or films. Now, this Bold, Frank participant of ‘Big Boss 2′ is  today popularly as Task Queen is moving close to winning the Big Boss-2 crown. That’s  what her well wishers feel , looking at her popularity and performance in this reality  show so far. Neha has also been praised by host Mahesh Manjrekar on her performance to
complete her task successfully. Her ability to convincingly prove her point in front of  her opponents has also been highly appreciated by viewers.

Actress Neha Shitole
Actress Neha Shitole

Recently, after completing 60 days of the show, she lost one of her friend and well wishers in this show Madhav Devchake , who saw his exit from the show. Watching his exit  she had burst into tears. But, she had assured Madhav that she would complete full 100
days in this show . So much of confidence he has on herself. The show has also taken a  new turn after controversial participant Abhijeet Bichkule has returned back. It may be recalled that from the very first day, Neha couldn’t get well along with him, but somehow
managed to be friendly later.

Now that the show is heading towards the final stage, the family week task is set to  begin and Neha is expected to receive her husband Nachiket . And after his meeting Neha  is surely going to get a boost her confidence to make all possible attempts to win the
crown.

कलर्स मराठीवर पहा ‘लक्ष्मी नारायण’ यांचा अलौकिक विवाह सोहळा!

न भूतो न भविष्यति असा हा लक्ष्मीनारायणाचा विवाह सोहळा  “श्री लक्ष्मीनारायण” मालिकेमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे… “श्री लक्ष्मी – नारायण” यांची अद्भुत महागाथा पहिल्यांदाच कलर्स मराठीने प्रेक्षकांच्या भेटीला आणली… ज्यामध्ये प्रेक्षकांना नुकतेच समुद्रमंथन पहायला मिळाले. हे समुद्र मंथन विष्णु आणि लक्ष्मीच्या दृष्टीकोनातून प्रेक्षकांना बघायला मिळाले. नारायण आणि लक्ष्मी यांची भेट व्हावी आणि त्यांचा विवाह संपन्न होण्यासाठी समुद्रमंथन घडून येणे अत्यावश्यक होते.

Laxmi - Narayan Vivah Sohala, on Colors Marathi
Laxmi – Narayan Vivah Sohala, on Colors Marathi

लक्ष्मी नारायण यांचा विवाह विधीयुक्त पार पडणार असून यामध्ये सीमांत पूजन, गौरीहर या विधीसाठी साक्षात महादेव आणि पार्वती विष्णुलोकामध्ये अवतरणार आहेत, तर मंगलाष्टकांसाठी फुलांचा आंतरपाट, फुल- दिव्यांच्या रोषणाईमध्ये सजलेला दरबार आणि मंडप असा दिव्य सोहळा पार पडणार आहे … परंतू, या लग्नात अनेक विघ्ने येणार आहेत.. लक्ष्मी आणि नारायण यांच्या विवाहाच्या अलक्ष्मी मात्र विरोधात आहे. श्री विष्णुशी विवाह करण्याची अलक्ष्मीची असलेली इच्छा तिने व्यक्त देखील करून दाखविली होती, पण ती आता सत्यात उतरणे कठीण आहे हे समजताच अलक्ष्मीचा क्रोध अनावर झाला…  त्यामुळे लक्ष्मी नारायण यांच्या मंगलमय विवाह सोहळ्यामध्ये अलक्ष्मी कुठले विघ्न तर आणार नाही ना ?  हे बघणे रंजक असणार आहे… तेंव्हा नक्की बघा श्री लक्ष्मी – नारायण यांचा अलौकिक विवाह सोहळा २ ऑगस्ट संध्या ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.