Television

‘बालपण देगा देवा’ मालिकेमध्ये आनंदी बनणार देवी

Balpan Dega Deva Marathi Serial

Marathi serial ‘Balpan Dega Deva

बालपण देगा देवा‘ मालिका नुकतीच कलर्स मराठीवर सुरु झाली आहे. मालिकेमध्ये अण्णा यांची व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांनी आपल्या दमदार आणि आनंदी म्हणजेच मैथिली हिने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळविण्यास सुरुवात केली आहे. वेगळ्या धाटणीची संकल्पना प्रेक्षकांना या ‘बालपण देगा देवा ‘ मालिकेतून बघायला मिळत आहे. या आठवड्यामध्ये मालिकेमध्ये प्रेक्षकांना ‘दशावतार‘ बघायला मिळणार आहे. या विशेष भागामध्ये आनंदी देवी बनणार आहे आणि मग पुढे काय होईल हे बघणे नक्कीच रंजक असणार आहे.

गावामध्ये उत्सव साजरा होणार आहे, त्यामुळे मदन गावातील लहान मुलांचं नाटक बसवत आहे ज्यामध्ये तो सूत्रधाराची भूमिका वठवणार आहे. आनंदी देवीचा रोल नाटकामध्ये करण्यास खूपच उत्सुक आहे, नाटकामध्ये आनंदी देवीचा रोल छान प्रकारे पार पाडते. आपलं इतक सगळे छान कौतुक करत आहेत, आपल्याला शाबासकी देत आहेत पण अण्णा मात्र आपल्याला काहीच बोलले नाही हे बघून आनंदी दु:खी होते. पण, अण्णाच्या मनामध्ये एकावेगळ्याच गोष्टीची चिंता आहे,  या सगळ्या प्रकारामध्ये आनंदीचे बालपण तर हरवणार नाही ना ? कारण पहिले वाड्यामधील देवीचा चेहरा आणि आनंदीच्या चेहऱ्यामधील साम्य आणि आता आनंदीची पूजा यामुळे अण्णा अजूनच चिंतेत आहेत.

Most Popular

To Top
  • News Alert Subscription
  •