Television

‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ची विनोदीनटांना मानवंदना

Comedychi Bullet Train

Suhas Paranjape Shyam Rajput, Comedychi Bullet Train

कलर्स मराठीवरील महाराष्ट्राचा लाडका कॉमेडी शो ज्या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर बरीच वर्षे राज्य केले आणि प्रेक्षकांना हसवले ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन‘ या कार्यक्रमाचे ३२५ एपिसोड येत्या १९ जानेवारीला पूर्ण होणार आहेत. या कार्यक्रमाच्या ३२५ एपिसोडनिमित्त या कलाकारांनी प्रख्यात विनोदीनटांना मानवंदना दिली आहे. भारतामधील आणि भारताबाहेरील प्रख्यात विनोदवीर म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके ज्यांच्या विनोदशैलीचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत असे चार्ली चाप्लीन, तसेच संपूर्ण भारताला आपल्या विनोदाने वेड लावले असे दादा कोंडके, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे, आपल्या अनोख्या विनोदशैलीसाठी आणि आपल्या मालवणी बोलीसाठी सुप्रसिध्द असलेले मच्छीद्र कांबळी तसेच वगनाट्यासाठी प्रसिद्ध असलेले काळू बाळू या भावांची जोडी यांना ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन‘ मधील कलाकार मानवंदना देणार आहेत.

कॉमेडीची बुलेट ट्रेन‘ गेल्या वर्षी एका नव्या ढंगात, स्वरूपात आणि नवीन परीक्षकांना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्या बदलालाही प्रेक्षकांनी अगदी मोकळ्या मनाने स्वीकारले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे करत आहे तसेच सोनाली कुलकर्णी आणि महेश कोठारे तुम्हाला परीक्षण करतात. अरुण कदम, समीर चौगुले, पंढरीनाथ कांबळे, अंशुमन विचारे,विशाखा सुभेदार, योगेश शिरसाट, नम्रता आवटे, श्याम राजपूत, पूजा नायक, प्रभाकर मोरे, भक्ती रत्नपारखी, संदीप गायकवाड, प्रसाद, अनुपमा ताकमोघे या कलाकारांच्या विनोदांनी महाराष्ट्राला हसण्याचे आरक्षण दिले आणि आता याच कार्यक्रमाचा ३२५ विशेष भाग बघायला विसरू नका कलर्स मराठीवर १९ आणि २० जानेवारीला रात्री ९.३० वाजता.

Most Popular

To Top
  • News Alert Subscription
  •