Television

ओंकार इंगवले ‘ढोलकी झाली बोलकी’चा विजेता

Omkar Ingawale,

Omkar Ingawale,

दूरदर्शन सह्याद्री चॅनेल प्रस्तुत “ढोलकी झाली बोलकी” या कार्यक्रमाचा अंतिम सोहळा 8 डिसेंबर रोजी पार पडला. ह्यात ओंकार चंद्रकांत इंगवले हा अंतिम विजेता ठरला असून ढोलकी सम्राट या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.   या स्पर्धेमध्ये एकूण 48 जण सहभागी झाले होते. अंतिम फेरीसाठी  4 जणांची  निवड करण्यात आली होती . अंतिम फेरी पार करत पुण्याचा ओंकार चंद्रकांत इंगवले यांनी ‘ढोलकी सम्राट ‘हा  पुरस्कार मिळविला.

तालसम्राट पं मुंकूंद पाटील यांचे शिष्य ओंकार इंगवले यांनी अरे वा शाब्बास (मी मराठी) ,मराठी पाऊल पडते पुढे अशा विविध कार्यक्रमामध्ये आपली कला सादर करून विजितेपद मिळविले आहे. कुटूंबातून चालत आलेला हा वारसा  त्यांना त्यांच्या वडिलांकडून (चंद्रकांत इंगवले) याच्यांकडून मिळालेला आहे .

Most Popular

To Top