झी युवा वाहिनीवर ‘शौर्य’ – गाथा अभिमानाची

Shaurya Gatha Abhimanachi Serial
‘शौर्य – गाथा अभिमानाची’

शौर्य म्हणजे असाधारण वीरता, शौर्य म्हणजे जाज्वल्य अभिमान, शौर्य म्हणजे अफाट शूरता, आणि म्हणूनच शौर्य म्हणजे महाराष्ट्र पोलीस. महाराष्ट्र पोलिसांची महिती खूप मोठी आहे आणि ती एवढ्या मोजक्या शब्दात वर्णन करता येणार नाही.

झी युवाशौर्य – गाथा अभिमानाची‘ या मालिकेद्वारे, सर्वच प्रेक्षकांच्या मनातला, निधड्या छातीचा पोलीस, पुन्हा एकदा अत्यंत गर्वाने उभा करीत आहे. महाराष्ट्र पोलिसांचे अकल्पनीय शौर्य, पोलिसांच्याच दृष्टीने आणि त्यांच्याच मदतीने सांगितले जाणार आहे.
विसरायचं जरी म्हंटल तरीही आपल्या मनावर आघात करणाऱ्या अनेक महत्वपूर्ण गुन्ह्यांच्या केसेस आहेत – केस २६ नोव्हेंबर आणि मन्या सुर्वे एन्काऊंटर, यावेळी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांचे दाखवलेले शौर्य, पहिल्या महिला डिटेक्शन अधिकारी हिरेमठ मॅडम यांची गुन्हेगारी विरोधातील कारकीर्द हे शौर्य खरंच उल्लेखनीय आहे. या आणि अशा अनेक शौर्य गाथा झी युवावर प्रेक्षकांना, पोलिसांच्या नजरेतून पुन्हा जगायला मिळतील.

शौर्य – गाथा अभिमानाची‘ या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंट चे सचिन मोहिते, तर लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे, कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे. ‘शौर्य – गाथा अभिमानाची‘ ही मालिका शुक्रवार आणि शनिवार रात्री ९:०० वाजता ‘झी युवा‘ ह्या वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

Leave a Reply