Television

झी युवाने घेतलेल्या ‘संगीत सम्राट’च्या ऑडिशनला कलाकारांचा उस्फुर्त प्रतिसाद

zee yuva 'Sangeet Samrat' show's auditions

Zee Yuva ‘Sangeet Samrat’ show’s auditions

झी युवाने घेतलेल्या ‘संगीत सम्राट‘ महाराष्ट्र ऑडिशन मध्ये प्रत्येक शहरात कलाकारांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत उत्कृष्ट गायकांबरोबर अनेकांनी तबला, डमरू, ढोल ताशे, पेटी, सूरसोटा, एकतारी, रुद्रवीणा अशी अनेक निरनिराळी वाद्ये घेऊन येऊन, त्यांच्या साहाय्याने स्पर्धकांनी ऑडिशन्स गाजवल्या आहेत आता अश्या अतिशय उत्तमोत्तम कलाकारांमधून ते १५० कलाकार कोण असतील याची उत्सुकता नक्कीच असणार आहे.
संगीत सम्राट‘ हा कार्यक्रम अनेक कारणांमुळे वेगळा ठरणार आहे. छोट्या पडद्यावर अश्या प्रकारचा टॅलेंट हंट आजपर्यंत कोणीही पाहिला नसेल. ‘संगीत सम्राट‘ ही संकल्पना संपूर्णपणे झी युवा या वाहिनीची असून लवकरच महाराष्ट्रातील प्रेक्षकांना झी युवावर या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे . झी युवाच्या ‘संगीत सम्राट‘ या टॅलेन्ट हंट कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर आणि नावाजलेले गायक आदर्श शिंदे हे जज असणार आहेत.

Most Popular

To Top