साईराम एन्टरटेन्मेंट प्रस्तुत ‘वारी व्हाया बारी’ नाटकाचा शुभारंभ

Anshuman Vichare Gayatri Chighalikar Kishore Chaughule
Gayatri Chighalikar, Kishore Chaughule and Anshuman Vichare in Marathi Play ‘Vari Via Bari’

साईराम एन्टरटेन्मेंट प्रस्तुत डॉ सुधीर निकम दिग्दर्शित  ‘वारी व्हाया बारी ‘ ह्या नव्या मराठी नाट्याप्रयोगाचा शुभारंभ नुकताच पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात  झाला   महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपणारा विषय ह्या नाटकानिमित्ताने हाताळण्यात आला आहे .

अंशुमन विचारे, गायत्री चिघळीकर, विनिता संचेती व किशोर चौगुले ह्यांच्या यात  मुख्य भूमिका आहेत.  शेकडो वर्षांची परंपरा असलेला पालखी सोहळा व महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेली लावणी या दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम साधतानाच दिग्दर्शकाने वारकऱ्यांचे प्रश्न व अडचणी उत्कृष्टपणे मांडल्या आहेत. वारकरी संप्रदाय सहिष्णू असून राष्ट्रीय समानतेचा व बंधूभावांचा संदेश वारकरी देतात. आगामी काळात मराठवाड्यासह राज्यभरात या नाटकाचे प्रयोग होणार असल्याचे निर्मात्यां कडून कळाले.

Leave a Reply