‘जय मल्हार’ मध्ये रंगणार समुद्र मंथनाची भव्य दिव्य गाथा
झी मराठीवरील ‘जय मल्हार‘ या मालिकेमधून, महादेवानेकेलेले समुद्रमंथनाची भव्य दिव्य गाथा प्रेक्षेकांना पाहायला मिळणार आहे. अमृत प्राशन करण्याच्या सुर-असुरांच्या लढ्यात समुद्रातून बाहेर आलेल्या हलाहलाने पृथ्वीचा विनाश होऊ नये म्हणून महादेवाने ते विष प्राशन केल्याची गाथा आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हीच गाथा एका भव्य दिव्य स्वरूपात ५ मे (गुरुवार) रोजी झी मराठीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेमधून पुन्हा बघायला मिळणार आहे.
दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे या सृष्टीतून लक्ष्मीमाता समुद्रात लुप्त होतात आणि त्यांना परत मिळवण्यासाठी समुद्रमंथनाचा मार्ग पुढे येतो. यासाठी श्री विष्णू कुर्मावतार घेतात. या मंथनासाठी मेरू पर्वताचा रवी म्हणून तर वासुकीचा दोरी म्हणून वापर करण्यात येतो. या समुद्रमंथनातून बाहेरयेणारी रत्ने, ते मिळवण्यासाठी देव आणि दैत्यात होणारी लढाई यादरम्यान बाहेर येणारं हलाहल या सर्व गोष्टींचा प्रवास अतिशय रंजक पद्धतीने ह्या भागात आपणास पाहायला मिळणार आहे. हा विशेष भाग येत्या ५ मे (गुरुवार) पासून सायंकाळी ७ वा. झी मराठीवर दाखवला जाणार आहे