‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’ च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा

Sushant Shelar, Nitesh Rane

गेल्या वर्षी महराष्ट्र कलानिधीचे संस्थापक श्री. नितेश राणे आणि सचिव श्री. सुशांत शेलार यांनी एकत्र येत ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’ ची स्थापना केली आणि त्याचं पहिलं पर्व यशस्वीकरून दाखवलं. ‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’ च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा नुकतीच एका पत्रकार परिषदेत नितेश राणे, श्रेयस तळपदे , सुशांत शेलार ह्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

गेल्यावर्षी ८ गटांमध्ये हे सामने रंगले होते. यंदा ‘धडाकेबाज नवी मुंबई’ व ‘अजिंक्यतारा सातारा’ अशा दोन नव्या संघाच्या सहभागाची घोषणा करण्यात आली. ह्या प्रसंगी अभिनेता श्रेयस तळपदे यांनी दोन नव्या संघाच्या शिलेदारांचे स्वागत करत दुसरं पर्व आपणही एन्जॉय करणार असल्याचं सांगितलं.

सहभागी संघ:
1) शिलेदार ठाणे
2) कोहिनूर नागपूर
3) डॅशिंग मुंबई
4) रत्नागिरी टायगर्स
5) शूर कोल्हापूर
6) मस्त पुणे
7) क्लासिक नाशिक
8) फटाका औरंगाबाद
9) धडाकेबाज नवी मुंबई
10) अजिंक्यतारा सातारा

‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’चे दुसरं पर्व ८ मे ते १० मे दरम्यान पाचगणी येथे रंगणार आहे.