मालिका: आभाळमाया
पार्श्वगायक: देवकी पंडीत
संगीत: अशोक पत्की
गीत: मंगेश कुलकर्णी
वाहिनी: झी मराठी
जडतो तो जीव
लागते ती आस
बुडतो तो सूर्य
उरे तो आभास
कळे तोच अर्थ
उडे तोच रंग
ढळतो तो अश्रू
सुटतो तो संग
दाटते ती माया
सरे तोच काळ
ज्याला नाही ठाव
ते तर आभाळ
घननीळ डोह
पोटी गूढ माया
आभाळमाया …..
आभाळमाया …..