साईराम एन्टरटेन्मेंट प्रस्तुत ‘वारी व्हाया बारी’ नाटकाचा शुभारंभ
साईराम एन्टरटेन्मेंट प्रस्तुत डॉ सुधीर निकम दिग्दर्शित ‘वारी व्हाया बारी ‘ ह्या नव्या मराठी नाट्याप्रयोगाचा शुभारंभ नुकताच पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात झाला महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपणारा विषय ह्या नाटकानिमित्ताने हाताळण्यात आला आहे .
अंशुमन विचारे, गायत्री चिघळीकर, विनिता संचेती व किशोर चौगुले ह्यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. शेकडो वर्षांची परंपरा असलेला पालखी सोहळा व महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेली लावणी या दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम साधतानाच दिग्दर्शकाने वारकऱ्यांचे प्रश्न व अडचणी उत्कृष्टपणे मांडल्या आहेत. वारकरी संप्रदाय सहिष्णू असून राष्ट्रीय समानतेचा व बंधूभावांचा संदेश वारकरी देतात. आगामी काळात मराठवाड्यासह राज्यभरात या नाटकाचे प्रयोग होणार असल्याचे निर्मात्यां कडून कळाले.