Tag Archives: Adish Vaidya

कोण आहे बिग बॉस मराठी रहिवाशी संघातील नविन सदस्य?

Adish Vaidya
Adish Vaidya


कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ह्या कार्यक्रमामधील  होणारे वेगवेगळे टास्क
घरातील सदस्यांमध्ये होणारे वाद – विवादभांडणमैत्री हे सगळचं चर्चेचे विषय आहेत. बिग बॉस मराठीचा मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना पसंत पडत असल्याचे दिसत आहे. प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एक सरप्राईझ मिळाले बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अजून एका सदस्याची एन्ट्री झाली. (Adish Vaidya) आदिश वैद्यच्या अचानक घरामध्ये झालेल्या वाइल्ड कार्ड एंट्रीमुळे आता घरातील रहिवाशी संघाची काय प्रतिक्रिया असेल घरामध्ये कोणते रंजक वळण येईल ? घरातील नाती त्याच्या एंट्रीमुळे बदलणार का ? कोणत्या गृपचा आदिश सदस्य होणार ? कि तो त्याचा गृप तयार करणार ? कि स्वत:चा खेळ स्वतंत्रपणे खेळणार हे बघणे रंजक असणार आहे. 

Actor Adish  Vaidya, bigg boss marathi
Actor Adish Vaidya, bigg boss marathi

 

आदिशने घरातील सदस्यांबद्दल बोलताना म्हणाला,  “बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येकजण आपल्या पध्दतीने खेळायचा प्रयत्न करतो आहे. माझा आवडता सदस्य विकास पाटील आहे. काही बाबतीत मी त्याला रिलेट करू शकतो. जय, विशाल (टास्कच्या बाबतीत) आणि मीनल हे तीन सदस्य स्ट्रॉंग प्रतिस्पर्धी आहेत असं मला वाटत. वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे घरामध्ये गेलेले स्पर्धक कधी जिंकले नाही पण मी घरामध्ये लवकर जात आहे तर ही चांगली गोष्ट आहे.”

गुढी पाडव्याच्या निमित्तावर सुरु होणार ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेचे दुसरे पर्व

Adish Vaidya in Marathi serial  'Ganapati Bappa Morya'
Adish Vaidya in Marathi serial ‘Ganapati Bappa Morya

कलर्स मराठीवर प्रसारीत होणाऱ्या ‘गणपती बाप्पा मोरया‘ ह्या मालिकेने गेल्या दीड वर्षात प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. आता हि मालिका एक वेगळं वळण घेते आहे. ब्रम्हवर्तात योगसाधनेसाठी गेलेला गणेश कित्येक वर्षांनी चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या घरी परतणार आहे. कारण गणपती बाप्पा मोरया ह्या मालिकेचे दुसरं पर्व सुरु होणार आहे. मालिकेमध्ये गणपती बाप्पा मोठा झाला असून, त्याच्याबरोबर रिद्धी – सिद्धीचे आगमन देखील या मालिकेत होणार आहे. मोठ्या गणेशाची भूमिका आदिश वैद्य साकारणार आहे.

गणपती बाप्पा म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं दैवत. कोणाला त्याच्या देवत्वाची प्रचिती येते तर कोणाला दिव्यत्वाची, दुष्टांच्या अहंकारचं निर्दालन देखील करतो. गणेशाची अशी कित्येक रूपं आपल्याला ह्या मालिकेत वेगवेगळ्या कथानकांच्या माध्यमातून पहायला मिळाली. आता लवकरच मोठ्या गणेशाचं कैलासावर आगमन होणार आहे. आगमनानंतर प्रेक्षकांना गणेशाच्या आयुष्यातील आणखी एक वेगळी बाजू बघायला मिळणार आहे, आणि ती म्हणजे गणेशाचं प्रापंचिक जीवन.

गणपतीच्या आयुष्यात रिद्धी आणि सिद्धीचं आगमन कसं होतं त्या दोघींचे स्वभाव कसे आहेत ? त्याचे गणपतीच्या आयुष्यावर कसे पडसाद उमटतील ? अन्नपूर्णा, आदिमाता म्हणजे पार्वती.. आता सासूबाईच्या नव्या भूमिकेत कशी वावरेल ? हे सगळे बघणे रंजक ठरणार आहे.

तेंव्हा बघायला विसरू नका ‘गणपती बाप्पा मोरया‘ २८ मार्च सोम ते शनि रात्री ८.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.