‘नजर’ – बॉंलीवूड स्टांयील ची साधारण सूडकथा
दर्जा: ★★ ½
प्रस्तुती: व्हिजन आर्ट्स निर्माते: अजय गुप्ता, दिलीप वाघ, डॉ. हरी कोकरे दिग्दर्शक: गोरख जोगदंडे कथा: गोरख जोगदंडे पटकथा: डॉ. हरी कोकरे, गोरख जोगदंडे संवाद: सन्ना मोरे सेन्सोर: U/A लांबी: १२८ मी. कलाकार: तेजा देवकर, स्वप्नील राजशेखर, रवि पटवर्धन, अरुण नलावडे, विजय गोखले, प्रदीप पटवर्धन, शोभा डांगे, माधुरी खान्देशे समीक्षा: उल्हास शिर्के |
मराठीत एक म्हण आहे, ‘करावे तसे भरावे’. या म्हणीच्या आधारे आतापर्यंत बॉंलीवूडचे बरेच चित्रपट येऊन गेले. एक असहाय स्त्री आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध काय करू शकते, हेही आपण बऱ्याच हिंदी आणि मराठी चित्रपटात पहिले आहे. त्यामुळे नुकताच प्रदर्शित झालेला विजन आर्ट्स ‘नजर ‘ हा मराठी चित्रपट वेगळे असे काही सांगत नाही.
औरन्गाबाद शहरापासून दूर असलेले एक गाव, जेथे हॉटेल किंवा खानावळीची काही व्यवस्था नाही, अश्या ठिकाणी, एका देखण्या तरुणाची पुष्कर (स्वप्नील राजशेखर) तलाठी म्हणून नियुक्ती होते. गावातील एक सुंदर दिसणारी पण अंध तरुणी फुलवा (तेजा देवकर) जी तिच्या वडिलांसोबत ( अरुण नलावडे) रहाते, ती त्याच्या घरी जावून दोन वेळचा स्वयंपाक करून देते. सुरुवातीस जंटलमन वाटणारा हा तरुण, फुलवाला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून शरीरसुख घेतो. सुरुवातीस त्याच्या घरात, तर नंतर शेतात हे प्रकार सुरु असतात. एक दिवस पुष्कर आपण घरी जावून आई वडिलांची लग्नासाठी परवानगी घेऊन येतो असे सांगून निघून जातो. आणि पुन्हा येत नाही. फुलवा चे वडील त्याचा शहरात जावून शोध घेतात.पण पुष्कर त्यांचा अपमान करून परत पाठवतो. प्रथम जीव देण्यासाठी निघालेली फुलवा, वडिलांच्या आणि गावकर्यांच्या सांगण्यानुसार विचार करून, सूड घ्यायचा ठरविते. आणि मग सुरु होतो तिचा शहराकाडचा प्रवास.
हे वेगळे सांगावयास नको, की फुलवा चे डोळ्यांचे ऑंपरेशन होऊन तिला दृष्टी मिळते. विशेष म्हणजे, जो डॉंक्टर तिच्यावर इलाज करतो, तोच डॉंक्टर, आपला कामधंदा सोडून, फुलवा चा मेक ओवर करून देण्यास मदत करतो. हे सर्व फिल्मी पद्धतीने चित्रपटाच्या पूर्वार्धात घडते, अगदी एखाद्या बॉंलीवूड चित्रपटाच्या स्टांयीलने. आणि मग, फुलवा पुष्कर ला धडा शिकवते. असा हा एक फोर्मुला चित्रपट पूर्वार्धात खूपच साधारण वाटतो. मात्र उत्तरार्धात हिंदी चित्रपटाच्या स्टांयीलने पुढे सरकतो. मात्र, या चित्रपटाचा शेवट, ‘करावे तसे भरावे’ नियमाप्रमाणे, पुष्करला धडा शिकविण्याचा नियतीचाच एक डाव आहे.
चित्रपटात स्वप्नील आणि तेजा यांनी आपापले अभिनय चोख वटवले आहेत. त्यांना अरुण नलावडे, रवी पटवर्धन, इ. कलाकारांची साथ मिळाली आहे. पण एकूण दिग्दर्शक गोरख जोगदंडे यांनी चित्रपट नाटकी पद्धतीने साकारला आहे. एका सुंदर पण अंध मुलीला तिचा बाप गावात नवीन आलेल्या आणि एकट्या राहणाऱ्या माणसाकडे दिवस-रात्र स्वयंपाक करण्यासाठी कसा पाठवतो ? जो डॉंक्टर फुलवा चे डोळ्यांचे ऑंपरेशन करतो, तोच तिचा संपूर्ण कायापालट करून देतो, हे पटत नाही. अश्या चित्रपटातील बऱ्याच घडामोडी, नाटकी पद्धतीने मांडल्या आहेत. बऱ्यापैकी पार्श्वसंगीत आणि चांगली फोटोग्राफी याच चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे, एक साधारण चित्रपट म्हणून ‘नजर ‘ कडे पहावे.