Tag Archives: मराठी

अजरामर मराठी नाटक ‘वस्त्रहरण’ झी मराठीवर

vastraharan-marathi-natak

गेल्या काही वर्षांपासून जुन्या मराठी नाटकांना नव्याने रंगमंचावर आणण्याचे प्रयोग होत आहेत. जुने नाटक नवीन कलाकारांना घेऊन, ते प्रेक्षकांपुढे मांडण्यात येत आहेत. आणि त्यातल्या काही नाटकांना प्रेकशकाचा चांगला प्रतिसादही मिळतोय, त्या निमित्ताने मराठीतील दिग्गजांची जुनी नाटके आजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचत आहेत. त्यातलचे एक नाटक म्हणजे ‘वस्त्रहरण’ मराठी नाटकांच्या इतिहासातलं एक मानाचं पान…. मराठी मानाचा मानबिंदू ….. मराठी रसिकांच्याच नव्हे तर मराठी कलावंतांच्याही जिव्हाळ्याचा खास विषय असलेलं…. मराठी रंगभूमीवरचं एक देदीप्यमान भरजरी लेणं…. अवतरणार आहे, येत्या रविवारी २८ एप्रिलला दुपारी १ वाजता आणि सायं. ७ वाजता महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीवर अर्थात झी मराठीवर !

१६ फेब्रुवारी १९८० या दिवशी खग्रास ग्रहणाच्या मुहूर्तावर मच्छिंद्र कांबळी या कलावंतांनं आपलं स्वप्न रंगमंच्यावर आणलं. भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या ‘वस्त्रहरण’ मालवणी भाषेतल्या पहिल्यावहिल्या नाटकाचा रंगमंच्यावर उदय झाला. महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणावर आधारित या फार्सिकल नाटकात तात्या सरपंचाच्या भूमिकेतील मच्छिंद्र कांबळी वगळता कुणीही कलाकार नावाजलेला नव्हता. मात्र या अदभुत फार्सला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि ‘वस्त्रहरण’ च्या पदरी भरपूर दान टाकले. या नाटकाचे धुवांधार प्रयोग सुरु झाले. अल्पावधीत या नाटकाने १०० चा आकडा ओलांडला आणि १७५ व्या प्रयोगाला महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी खास उपस्थिती लावली. पु. ल. नि या नाटकाचे वारेमाप कौतुक केले आणि ‘वस्त्रहरण’ ची गाडी भरधाव वेगाने धावू लागली.

यानंतर ‘वस्त्रहरण’ च्या प्रयोगाचा दौरा निर्माते दिग्दर्शक मच्छिंद्र कांबळी यांनी लंडनला आखला लंडनच्या या दौऱ्यात दोन प्रयोगासाठी त्यावेळचे मराठी रंगभूमीवरचे अनभिषिक्त सम्राट डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी तयारी दर्शविली. गाणकोकिळा लता मंगेशकर या प्रयोगाच्या वेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. लंडन दौऱ्याची जय्यत तयारी झाली आणि ‘वस्त्रहरण’ मधल्या अनेक कलाकारांना व्हिसा मिळणे कठीण झाले. तेव्हा बाळासाहेब ठाकरे मध्यस्थी करून या सर्व कलाकारांच्या व्हिसासाठी प्रयत्न केले आणि ‘वस्त्रहरण’ परदेशात पोहचले. परदेशातही रसिकांनी या नाटकाला अक्षरश: डोक्यावर घेतले. ‘वस्त्रहरण’ हे पुढे हज्जारो प्रयोगांचे मनोरे रचले. वस्त्रहरण नाटकाच्या लोकप्रियतेचे अनेक आघाडीच्या कलाकारांनाही अप्रूप वाटत रहिले. या नाटकात आपणही असावे, अशी अनेकांना उत्कंठा असे म्हणूनच वस्त्रहरणाच्या आठशेव्या आणि हजाराव्या प्रयोगात मच्छिंद्र कांबळी यांनी नाना पाटेकर (भीम), सचिन पिळगावकर (विदूर), अशोक सराफ (धर्म), लक्ष्मीकांत बेर्डे, मास्टर भगवानदादा सतीश पुळेकर यांसारख्या कलाकारांना एकत्र झळकावण्याचा अनोखा विक्रम केला. ‘वस्त्रहरण’ ने असे अनेक आगळे वेगळे विक्रम नोंदवले.

या अजरामर नाटकाने मालवणी भाषेचा झेंडा विविध देशात फडकवला. मराठी रसिकांना मालवणीची खास गोडी लावली आणि मालवणी नाटकाचा ओघ सातत्याने मराठी रंगमाच्यावर सुरु ठेवला परंतु दुर्देवाने ‘वस्त्रहरण’ ची यशाची घोडदौड सुरु असतांना या नाटकाचे सर्वेसर्वा मच्छिंद्र कांबळी यांनी कायमची एक्झिट घेतली. मात्र त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव प्रसाद कांबळी यांनी या नाटकाच्या पाच हजाराव्या प्रयोगाचे मछिंद्र कांबळी यांचे स्वप्न मराठी चित्रपट आणि नाट्य वर्तुळातील प्रसिद्ध कलावंताना घेऊन पूर्ण केले. भरत जाधव, मकरंद अनासपुरे, प्रशांत दामले, संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, पंढरीनाथ कांबळे यांसारख्या कलावंकानी ‘वस्त्रहरण’ चा ५००० वा प्रयोग तितकाच गाजवला. मालवणी अभिनय सम्राट मछिंद्र कांबळी यांनी मराठी रंगभूमीला दिलेलं हे जरतारी लेणं झी मराठी येत्या रविवारी २८ एप्रिलला दुपारी १ वाजता आणि सायं ७ वाजता रसिकांच्या भेटीला आणत आहे.

२०१४ राजकारण’ चित्रपट येत्या १० जूनला प्रदर्शित.

Rajkaran

निर्माते अभय पाठक यांना राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेची होणारी तगमग,घालमेल जाणवली आणि यातूनच निर्मिती झाली ‘२०१४ राजकारण’ या मराठी चित्रपटाची.येत्या १० जूनला हा चित्रपट राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ‘अभय पाठक प्रोडकशन’ च्या २०१४ राजकारण चित्रपटाची सह निर्मिती विनया पाठक यांनी केली आहे.प्रदीप भोरे दिग्दर्शित या चित्रपटात मराठीतील अनेक नवे-जुने कलाकार एकत्र आले आहेत. यात रमेश देव, प्रसाद ओक, दीपक शिर्के, संतोष जुवेकर, संदेश म्हशीलकर,दीपक करंजीकर, दर्शन पाठक आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

चित्रपटाचीकथासंकल्पनासागरपाठकयांचीअसूनसंवादसंतोषवाघमोडेयांनीलिहिले आहेत. गीतकार महेश कराडकर, भीमराव धुळबुळे,दिनकरशिर्केयांनीलिहिलेल्या गीतांना दिनकर शिर्के व महेश मुतालिक यांनी संगीत दिलं आहे.संगीतसंयोजनकमलेश भडकमकर, अमर हळदीपूर यांचे आहे. या चित्रपटातील गीते सुप्रसिद्ध गायक शान, अवधूत गुप्ते, रविंद्र साठे, राहुल सक्सेना व महेश मुतालिक यांनी गायली आहेत. सिनेमटोग्राफर नंदुकुमार पाटील यांनी आपल्या कमेर्‍यातून ‘२०१४ राजकारण’ चित्रित केला आहे. कला दिग्दर्शन – अरुण रहाणे, नृत्य दिग्दर्शन – दिपाली विचारे, संकलन – आशिष म्हात्रे, अपूर्व मोतीवाले यांचे आहे.