२०१४ राजकारण’ चित्रपट येत्या १० जूनला प्रदर्शित.
निर्माते अभय पाठक यांना राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेची होणारी तगमग,घालमेल जाणवली आणि यातूनच निर्मिती झाली ‘२०१४ राजकारण’ या मराठी चित्रपटाची.येत्या १० जूनला हा चित्रपट राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ‘अभय पाठक प्रोडकशन’ च्या २०१४ राजकारण चित्रपटाची सह निर्मिती विनया पाठक यांनी केली आहे.प्रदीप भोरे दिग्दर्शित या चित्रपटात मराठीतील अनेक नवे-जुने कलाकार एकत्र आले आहेत. यात रमेश देव, प्रसाद ओक, दीपक शिर्के, संतोष जुवेकर, संदेश म्हशीलकर,दीपक करंजीकर, दर्शन पाठक आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
चित्रपटाचीकथासंकल्पनासागरपाठकयांचीअसूनसंवादसंतोषवाघमोडेयांनीलिहिले आहेत. गीतकार महेश कराडकर, भीमराव धुळबुळे,दिनकरशिर्केयांनीलिहिलेल्या गीतांना दिनकर शिर्के व महेश मुतालिक यांनी संगीत दिलं आहे.संगीतसंयोजनकमलेश भडकमकर, अमर हळदीपूर यांचे आहे. या चित्रपटातील गीते सुप्रसिद्ध गायक शान, अवधूत गुप्ते, रविंद्र साठे, राहुल सक्सेना व महेश मुतालिक यांनी गायली आहेत. सिनेमटोग्राफर नंदुकुमार पाटील यांनी आपल्या कमेर्यातून ‘२०१४ राजकारण’ चित्रित केला आहे. कला दिग्दर्शन – अरुण रहाणे, नृत्य दिग्दर्शन – दिपाली विचारे, संकलन – आशिष म्हात्रे, अपूर्व मोतीवाले यांचे आहे.