सोनी मराठीवर अनुभवा जिजा-शहाजीच्या लग्नाचा शाही थाट

हिंदवी स्वराज्य उभं करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र त्यांना घडवणाऱ्या माऊलीचा इतिहास तितकासा परिचयाचा नाही . अवघ्या ८ व्या वर्षी न्यायाच्या बाजूने उभी राहणारी जिजा लहानपणापासूनच कर्तबगार होती. शिवबांवर झालेल्या स्वराज्याच्या संस्कारांचा पाया जिजाच्या बालपणीच घातला गेला होता. स्वराज्याच्या मोहिमेचा मानबिंदू ठरला तो जिजा शहाजी यांचा विवाह सोहळा. जाधव आणि भोसले या राजघराण्यांमध्ये झालेली सोयरीक ही इतिहासातली खूप मोठी राजकीय घडामोड होती असे म्हणायला हरकत नाही. १५०० सालचा तो  काळ त्याकाळची अनिश्चित अशी परस्थिती आणि त्यात पार पडलेला एक ऐतिहासिक आणि अजरामर सोहळा.  सनई -चौघंड्यांचे सूर, केळीचे खांब आणि झेंडूच्या फुलांनी नटलेला दिव्य मंडप, शाही पक्वांन्नांनी सजलेलं ताट, दागिने, रोषणाई, सजावट, उंची वस्त्र असा शाही थाट होता जिजा-शहाजीच्या लग्नाचा.

Swarajya Janani Jijamata Serial on Sony Marathi
Swarajya Janani Jijamata Serial on Sony Marathi

या शाही सोहळ्याचं पान इतिहासात आपण  वाचलं  ही असेल पण  सोनी मराठीवर सुरू असलेल्या ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेच्यानिमित्ताने पहिल्यांदा पाहायला मिळणार आहे.

‘स्वराज्य जननी जिजामाता’ हा कार्यक्रम पाहताना तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा विवाह तर संपन्न होईल पण ही सप्दपदी ऐतिहासिक का ठरावी. तुमचं उत्तर मालिकेच्या शीर्षकातच आहे. महाराष्ट्राच्या सर्वश्रेष्ठ माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिजामाता यांचा हा विवाह सोहळा आहे. या विवाह सोहळ्यानंतरच महाराष्ट्राच्या त्या वैभवशालीन इतिहासाला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. त्यामुळे हा विवाहसोहळा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचा मानबिंदू ठरतो. तसेच ज्या आईने महाराष्ट्राच्या शौर्यवान मराठ्याला जन्म दिला. जिच्या संस्कारांचे गोडवे आजही पोवाड्यांतून गायले जातात त्या जिजामातेची मनस्थिती अवघ्या आठव्या वर्षी कशी बरं असेल हे पाहणे फारच रंजक आणि स्फूर्तीदायक ठरणार आहे.

अमोल कोल्हे निर्मित ‘स्वराज्य जननी जिजामताा’ विवाह सप्ताह  ४  नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता पहा सोनी मराठीवर.