जगण्याची नवी उर्मी देणारा ‘उंच माझा झोका’ पुरस्कार
विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच नव्हे तर त्याही पेक्षा एक पाऊल पुढे जात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणा-या आणि प्रसिद्धीचा सोस न बाळगता अव्याहतपणे आपले कार्य करणा-या कितीतरी महिला आपल्या आजुबाजूला आहेत. अशा कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याची नुसती दखल न घेता त्यांच्या कार्याचा य़थोचित सन्मान ‘उंच माझा झोका पुरस्कार’ द्वारे करण्यात येतो. यंदाच्या वर्षी देशात आणि जगात आपल्या कार्याचा ठसा उमटवणा-या दहा कर्तृत्वशालिनींचा गौरव नुकताच ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहात बुधवारी एका शानदार सोहळा करण्यात आला.
ह्या वर्षी ज्येष्ठ समाजसेवी मीराताई लाड ह्यांचा ‘उंच माझा झोका जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बरोबर रझिया सुलताना यांना सामाजिक कार्यासाठी, डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांना पर्यावरण जागृतीसाठी, आंतरराष्ट्रीय मैदान गाजवणा-या धावपटू कविता राऊत, ज्येष्ठ लेखिका कविता महाजन यांना साहित्य विभागासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
डॉ. सीमाताई साखरे, स्वीटी पाटेला, वैशाली बारये, वैशाली मोरे, पूजा घनसरवाड ह्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास ज्येष्ठ रंगकर्मी अरूण काकडे, धनराज पिल्ले व अनेक कलाकार मान्यवरांची उपस्थिती होती. अभिनेते अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी पुरस्कारांचे निवेदन केले.
येत्या १३ सप्टेंबरला सायंकाळी ७.०० वा. झी मराठीवर हा पुरस्कार सोहळा प्रसारित होईल.