‘फक्त मराठी वाहिनी’च्या ‘देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी’ तिसऱ्या पर्वाचे शतक पूर्ण!
‘अभिमान भाषेचा वारसा कलेचा’ हे ब्रीद असलेल्या ‘फक्त मराठी’ वाहिनीवर विविध नवनवे विषय असलेल्या मनोरंजक कार्यक्रमांची शृंखला सुरु आहे. ‘देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी’ या अनोख्या सामाजिक कार्यक्रमाची निर्मिती करून आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाने नुकतीच शंभरी पार केली आहे.
आजपर्यंत या कार्यक्रमात महाराष्ट्रातील संतपरंपरा, महाराष्ट्र संस्कृती, सण – उत्सव, स्त्री भ्रूण हत्या, वृक्षारोपण अश्या विविध विषयांना या कार्यक्रमात विशेष महत्व देण्यात आले आहे. पुढेही या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयांवर सादरीकरण होणार असून महाराष्ट्रातील अभिजात संत साहित्य, मौखिक, अध्यात्मिक कलागुणांनी संपन्न अश्या दिग्गज कीर्तनकारांचा सहभाग आणि त्यांचे बहारदार सादरीकरण यामुळे प्रेक्षकांचे सखोल ज्ञानार्जनही होणार आहे. दिग्गज कीर्तनकारांची मधुर वाणी, साधी सोप्पी बोलीभाषा यामुळे प्रेक्षक ‘देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी’ सोबत एकरूप होतात.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरभी हांडे करीत आहेत. या कार्यक्रमाचं दिग्दर्शन मंगेश खरात यांचे असून निर्मिती राजू पी. दियलानी यांच्या ‘न्यू टीआरपी’ या संस्थेची असून ‘न्यू टीआरपी’ साठी प्रोजेक्ट हेड निलेश पटवर्धन आहेत. ‘फक्त मराठी वाहिनी’वर आवर्जून पहा दररोज सकाळी ७:०० वाजता आणि पुनर्प्रक्षेपित सकाळी ६:०० वा.