एका ‘डोमा’च्या आयुष्याचा संघर्षपूर्ण धगधगता जीवनप्रवास
अनेकदा समाज व्यवस्थेकडून दुर्लक्षित केला जाणारा, माणसाच्या अंतिम क्षणांना मोक्ष देणारे काम करणारा महत्वाचा घटक म्हणजे ‘डोम’ समाज.एका डोमाच्या आयुष्याचा विस्मयकारक – संघर्षपूर्ण धगधगता जीवनप्रवास ‘डोम’ या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. प्री .आर. एल. तांबे ह्यांनी ‘सह्याद्री पिक्चर्स’ द्वारे ह्या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रदीप दळवी ह्यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
डोमाच्या संघर्षपूर्ण आयुष्यावर प्रकाश टाकणाऱ्या ह्या समाज प्रधान चित्रपटात वेगळी प्रेमकथा बरोबरच सहस्यमय पटकथासुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. चित्रपटात डॉ . विलास उजवणे, अंजली उजवणे व मोहन जोशी ह्यांच्या मुख्य भूमिका असून सोबत अनिता नाईक, प्रदीप दळवी, प्री .आर. एल. तांबे, दीपज्योती नाईक, गीतांजली कुलकर्णी,प्रदीप पटवर्धन हि कलाकार आहेत .
छायांकन राजू कडूर, संकलन सचिन नाटेकर ह्यांनी केले आहे. प्री .आर. एल. तांबे ह्यांनी लिहिलेल्या गीतांना स्वप्नील बांदोडकर, साधना सरगम, शकुंतला जाधव, वैशाली सामंत ह्यांच्या आवाजतील गाणी संदीप डांगे ह्यांनी संगीतबद्ध केले आहेत.ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षेकांच्या भेटीस आहे.